
Baramati, APMC, Jowar Price, Urad, Agriculture News, Pune News, Crop Rates,
मुख्य बाजार आवारात ज्वारीची एकूण ६५० क्विंटल आवक झाली. चांगल्या दर्जाच्या ज्वारीला व्यापाऱ्यांकडून अधिक मागणी असल्याने उच्चांकी दर मिळत आहेत. गव्हाला प्रतिक्विंटल कमाल ४ हजार १५ रुपये, तर बाजरीला ४ हजार ७०१ रुपये दर मिळाला. हरभऱ्याची ९० क्विंटल आवक झाली असून, त्याला प्रतिक्विंटल ७ हजार ७७० रुपये भाव मिळाला.
दरम्यान, बारामती बाजार समितीच्या सुपे उपबाजार आवारातही शेतमालाला चांगले दर मिळत आहेत. सुपे येथे पांढऱ्या हरभऱ्याला प्रतिक्विंटल ८ हजार ८५० रुपये असा उच्चांकी भाव मिळाला. मुख्य बाजार आवारासह उपबाजारातही बाहेरील पेठांतील खरेदीदार सहभागी होत असल्याने लिलावात स्पर्धा निर्माण होत आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळत असल्याचे प्रभारी सचिव हौसेराव कोकरे यांनी सांगितले.
बाजार समितीचे सभापती विनायक गावडे आणि उपसभापती अरुण सकट यांनीही स्थानिक व बाहेरील बाजारपेठांतील मागणी वाढल्यामुळे चांगल्या प्रतीच्या ज्वारीला अधिक दर मिळत असल्याचे स्पष्ट केले.
बारामती मुख्य बाजार आवार आणि सुपे उपबाजारात विविध शेतमालाला चांगले दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी आपला शेतमाल स्वच्छ करून आणि योग्य प्रतवारी करून विक्रीस आणावा. तसेच शेतमालाच्या विक्रीसाठी बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवाराचा लाभ घ्यावा, असे आवाहन बाजार समिती प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.