Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोल्हापूर हादरलं! कोयत्याने सपासप वार करुन तरुणाचा खून, कारण काय तर…

गांधीनगर (ता. करवीर) येथे रात्री उशिरा विठ्ठल सुभाष शिंदे (वय २४, मूळ गाव परभणी, सध्या रा. कोयना वसाहत, गांधीनगर) या तरुणाचा तलवार आणि कोयत्याने वार करुन निर्घृण खून केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 11, 2025 | 02:45 PM
कोल्हापूर हादरलं! कोयत्याने सपासप वार करुन तरुणाचा खून, कारण काय तर...

कोल्हापूर हादरलं! कोयत्याने सपासप वार करुन तरुणाचा खून, कारण काय तर...

Follow Us
Follow Us:

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आली आहे. गांधीनगर (ता. करवीर) येथे रात्री उशिरा विठ्ठल सुभाष शिंदे (वय २४, मूळ गाव परभणी, सध्या रा. कोयना वसाहत, गांधीनगर) या तरुणाचा तलवार आणि कोयत्याने वार करुन निर्घृण खून केला आहे. सुमारे पाच ते सहा संशयित मारेकरी हे येथील इंदिरानगर झोपडपट्टीतील असल्याचे समजते. रात्री उशिरा घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, विठ्ठल हा आपल्या आई, वडिल, बहिण आणि भावासोबत येथे भाड्याच्या घरात राहत होता. रात्री साडेअकराच्या दरम्यान ही घटना घडली. येथील गांधी मैदानाच्या मागील बाजूस असणाऱ्या पान शॉपपासून मारेकऱ्यांनी विठ्ठल याला तलवार आणि कोयत्याचे वार करत बाजूच्या जीपी ग्रुपपर्यंत आणले त्याठिकाणी त्याला मारुन टाकून मारेकरी पळून गेले. मारेकऱ्यांनी विठ्ठलच्या हातावर तसेच चेहऱ्यावर तलवार आणि कोयत्याने वार केले होते.

विठ्ठल आणि मारेकरी हे गांजेकस, व्यसनी असल्याचे समजते. विठ्ठल हा येथील एका दुकानात नोकरी करत होता. खुनाचे नेमके कारण समजू शकले नाही. दरम्यान घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, पोलीस उपअधीक्षक सुजितकुमार क्षीरसागर, स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी भेट दिली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ करत आहेत.

हे सुद्धा वाचा : धनंजय मुंडे मंत्रिपदाचा राजीनामा देणार? चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान

राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले

राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसाखाली छत्रपती संभाजीनगरमध्ये जुन्या भांडणाच्या कारणातून 26 वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. ही घटना सोमवारी (दि.2) सायंकाळी हसूल परिसरातील कारागृहाच्या बाजूच्या मैदानावर घडली. दिनेश उर्फ बबलू परमानंद मोरे (वय 26, रा. चेतनानगर, हसूल) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी अनिकेत गायकवाड व गणेश सोनवणे यांची नावे समोर आली असून, शोधासाठी चार पथके रवाना झाली. या हत्येप्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

दगडाने ठेचून मुलाचा खून

दरम्यान गेल्या काही दिवसाखाली नगर रस्त्यावरील वाघोली भागात वाघेश्वरनगर येथे एका अल्पवयीन मुलाचा लोखंडी रॉड तसेच दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीला बोलत असल्याच्या रागातून हा खून झाल्याचे सांगण्यात आले आहे. प्रेमप्रकरणातून खून झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. गणेश वाघू तांडे (१७) असे हत्या झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. याप्रकरणी लक्ष्मण पेटकर (वय ६०), नितीन पेटकर (वय ३१) आणि सुधीर पेटकर (वय ३२) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास घडली आहे.

Web Title: A young man has been killed by a coyote in kolhapur nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2025 | 02:44 PM

Topics:  

  • crime news
  • kolhapur news
  • maharashtra

संबंधित बातम्या

मुंबईत साकारणार जगातील सर्वात मोठा ‘Water Metro’ प्रोजेक्ट! 6066 कोटी खर्चून बदलणार मुंबईचं रूप, कसा असेल रुट?
1

मुंबईत साकारणार जगातील सर्वात मोठा ‘Water Metro’ प्रोजेक्ट! 6066 कोटी खर्चून बदलणार मुंबईचं रूप, कसा असेल रुट?

मुसळधार पावसाने शाळेला धोका! दरड कोसळल्यानंतर संरक्षणासाठी 15 लाखांचा निधी मंजूर
2

मुसळधार पावसाने शाळेला धोका! दरड कोसळल्यानंतर संरक्षणासाठी 15 लाखांचा निधी मंजूर

सूर्याभोवती तेजस्वी वलय! बारामतीमध्ये दुर्मीळ ‘सोलर हेलो’चे अद्भुत दर्शन, नागरिकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण
3

सूर्याभोवती तेजस्वी वलय! बारामतीमध्ये दुर्मीळ ‘सोलर हेलो’चे अद्भुत दर्शन, नागरिकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण

Mumbai Crime : मुंबईत सिया-केतन हत्याकांडाची पुनरावृत्ती! डिलिव्हरी बाॅयने अल्पवयीन प्रेयसीला कड्यावरुन ढकलले
4

Mumbai Crime : मुंबईत सिया-केतन हत्याकांडाची पुनरावृत्ती! डिलिव्हरी बाॅयने अल्पवयीन प्रेयसीला कड्यावरुन ढकलले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.