Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pimpri News : अभय योजनेला मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद; 29 दिवसांत 157 कोटींची विक्रमी वसुली

थकबाकीदार मालमत्ताधारकांना दिलासा देण्यासाठी महापालिकेने १ मार्च २०२६ पासून अभय योजना लागू केली होती. या योजनेंतर्गत विलंब दंडावर ९० टक्के सवलत देण्यात आल्याने नागरिकांनी पुढाकार घेत थकबाकी भरल्याचे दिसून आले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 31, 2026 | 03:38 PM
पिंपरी-चिंचवडमध्ये अतिक्रमण कारवाई जोरात; अडीच महिन्यांत 820 ठिकाणं अतिक्रमणमुक्त

पिंपरी-चिंचवडमध्ये अतिक्रमण कारवाई जोरात; अडीच महिन्यांत 820 ठिकाणं अतिक्रमणमुक्त

Follow Us
Follow Us:

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या अभय योजनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, २९ मार्चपर्यंत तब्बल ५५ हजार ७३१ थकबाकीदारांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. अवघ्या २९ दिवसांत १५७ कोटी २१ लाख ५३ हजार रुपयांची विक्रमी मालमत्ता कर वसुली झाली असून, महापालिकेच्या महसुलात मोठी भर पडली आहे.

थकबाकीदार मालमत्ताधारकांना दिलासा देण्यासाठी महापालिकेने १ मार्च २०२६ पासून अभय योजना लागू केली होती. या योजनेंतर्गत विलंब दंडावर ९० टक्के सवलत देण्यात आल्याने नागरिकांनी पुढाकार घेत थकबाकी भरल्याचे दिसून आले. यामुळे कर वसुलीत लक्षणीय वाढ झाली आहे. महापालिकेच्या आकडेवारीनुसार, गेल्या २९ दिवसांत एकूण ६८ हजार ४८८ मालमत्ताधारकांनी कर भरला असून, त्यापैकी ५५ हजार ७३१ जणांनी अभय योजनेचा लाभ घेतला आहे. या लाभार्थ्यांना एकूण ३८ कोटी ८१ लाख रुपयांची दंडावरील सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना आर्थिक दिलासा मिळाल्याबरोबरच महापालिकेच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे.

या योजनेचा कालावधी ३१ मार्च २०२६ रोजी मध्यरात्रीपर्यंत मर्यादित असल्याने उर्वरित थकबाकीदारांसाठी ही अंतिम संधी ठरणार आहे. अद्याप थकबाकी असलेल्या नागरिकांनी तातडीने कर भरून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपायुक्त सचिन पवार यांनी केले आहे.

नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेच्या १८ विभागीय कार्यालयांमार्फत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. समक्ष भेटींद्वारे जनजागृती केली जात असून, ऑनलाइन, धनादेश आणि कॅश काउंटरद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शेवटच्या दिवशी गैरसोय टाळण्यासाठी ३१ मार्च रोजी सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत कॅश काउंटर सुरू ठेवण्यात येणार आहेत.

महापौर रवि लांडगे यांनी अभय योजना ही नागरिकांना दिलासा देणारी आणि महापालिकेच्या आर्थिक शिस्तीस बळकटी देणारी ठरल्याचे सांगितले. तर आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी या योजनेमुळे कर वसुलीत वाढ झाल्याचे नमूद करत नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने कर भरण्याचे आवाहन केले.

पुणे महापालिकेतही योजनेला चांगला प्रतिसाद

महापालिकेच्या मिळकत कराची थकबाकी वसूल होण्यासाठी १५ नोव्हेंबर ते १५ मार्च या चार महिन्यात राबविण्यात आलेल्या अभय योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. या चार महिन्यात १ लाख ६४ हजार ६६५ मिळकतधारकांनी या योजनेतुन ९५४ कोटी ७८ लाख ६४ रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा केले आहेत.

हे सुद्धा वाचा : भाजपा सरकार शेतकरी विरोधी, जाहीर केलेली कर्जमाफी म्हणजे ‘लबाडाघरचे जेवण; काँग्रेसची टीका

Web Title: Abhay yojana receives overwhelming response record recovery of 157 crore in 29 days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 03:38 PM

Topics:  

  • PCMC News
  • Pimpri News

संबंधित बातम्या

Ashadhi Wari Sohla 2026: पिंपरी-चिंचवड आयुक्तांकडून पालखी मार्गाची पाहणी; मेट्रोचे अडथळे दूर करण्याचे निर्देश
1

Ashadhi Wari Sohla 2026: पिंपरी-चिंचवड आयुक्तांकडून पालखी मार्गाची पाहणी; मेट्रोचे अडथळे दूर करण्याचे निर्देश

धक्कादायक ! चोरीच्या संशयावरून बेदम मारहाण; गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा अखेर मृत्यू
2

धक्कादायक ! चोरीच्या संशयावरून बेदम मारहाण; गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा अखेर मृत्यू

Maval News: पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प तब्बल १५ वर्षांनंतर पुन्हा सुरू होणार? मावळात नव्या राजकीय संघर्षाची चिन्हे
3

Maval News: पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प तब्बल १५ वर्षांनंतर पुन्हा सुरू होणार? मावळात नव्या राजकीय संघर्षाची चिन्हे

पुण्यातील वाकड चौकातून आता रस्ता ओलांडता येणार; मेट्रो 60 मीटरचा पादचारी पूल बांधणार
4

पुण्यातील वाकड चौकातून आता रस्ता ओलांडता येणार; मेट्रो 60 मीटरचा पादचारी पूल बांधणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.