Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pimpri News : नऊ महिन्यांच्या गर्भवतीसह बाळाचा मृत्यू; तळेगावच्या मायमर रुग्णालयातील घटना

मायमर रुग्णालयातील गर्भवती महिला आणि बाळाच्या मृत्यूप्रकरणी नातेवाईकांनी उपचारात हलगर्जीपणाचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय निष्काळजीपणा झाला की नाही, याबाबत ससून रुग्णालयातील तज्ज्ञ समितीकडून वैद्यकीय अभिप्राय घेतला जाणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 20, 2026 | 11:45 AM
Pimpri News : नऊ महिन्यांच्या गर्भवतीसह बाळाचा मृत्यू; तळेगावच्या मायमर रुग्णालयातील घटना

Pimpri News : नऊ महिन्यांच्या गर्भवतीसह बाळाचा मृत्यू; तळेगावच्या मायमर रुग्णालयातील घटना

Follow Us
Follow Us:

पिंपरी : नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर पोटातील बाळाला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी तातडीने सिझेरियन केले. काही तासातच बाळाची प्रकृती खालावल्याने त्याला पुण्यातील ससून रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र, डॉक्टरांनी बाळाला मृत घोषित केले. तळेगाव दाभाडे येथील यशवंतनगरमधील मायमर रुग्णालयात ही घटना घडली. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच आई आणि बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात संताप व्यक्त केला.

रूपाली सोमनाथ इंदलकर (वय ३८, रा. कुसगाव, मावळ) असे मृत महिलेचे नाव आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, रूपाली या नऊ महिन्यांच्या गर्भवती होत्या. मंगळवारी सायंकाळी चारच्या सुमारास त्यांना त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी तळेगाव दाभाडे येथील मायमर रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचा रक्तदाब अचानक वाढला. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी डॉक्टरांकडून उपचार सुरू करण्यात आले. उपचार सुरू असतानाच सायंकाळी सहा ते साडेसहाच्या सुमारास रूपाली यांना स्ट्रोक आला. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.

त्यानंतर पोटातील बाळाला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी तातडीने सिझेरियन शस्त्रक्रिया करून बाळाला बाहेर काढले. सुरुवातीला बाळावर मायमर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, रात्री नऊच्या सुमारास बाळाची प्रकृती खालावली. त्यामुळे पुढील उपचारासाठी त्याला तातडीने पुणे येथील ससून रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून बाळाचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले.

आईपाठोपाठ बाळाचाही मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर इंदलकर यांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. उपचारात हलगर्जीपणा झाल्यामुळेच रूपाली आणि त्यांच्या बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. संबंधित डॉक्टरांवर कारवाई करावी, अशी मागणी करत त्यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यामुळे काही काळ रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

खळबळजनक ! 3 वर्षांच्या मुलाची सावत्र बापाने केली हत्या; पलंगावरून पडून मृत्यू झाल्याचा केला बनाव

घटनेची माहिती मिळताच तळेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बुधवारी (दि. १९) सकाळी स्थानिक लोकप्रतिनिधींनीही रुग्णालयात धाव घेतली. पोलिस आणि लोकप्रतिनिधींनी नातेवाईकांशी चर्चा करून त्यांची समजूत काढली. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. याप्रकरणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. तपास तळेगाव दाभाडे पोलिस करत आहेत.

नातेवाईकांनी उपचारात केला हलगर्जीपणाचा आरोप

मायमर रुग्णालयातील गर्भवती महिला आणि बाळाच्या मृत्यूप्रकरणी नातेवाईकांनी उपचारात हलगर्जीपणाचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय निष्काळजीपणा झाला की नाही, याबाबत ससून रुग्णालयातील तज्ज्ञ समितीकडून वैद्यकीय अभिप्राय घेतला जाणार आहे. उपचारांची कागदपत्रे, तपासणी अहवाल आणि अन्य वैद्यकीय नोंदींची समितीकडून छाननी केली जाईल. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यातील निष्कर्षांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

– किशोर पाटील, वरिष्ठ निरीक्षक, तळेगाव पोलिस ठाणे.

Web Title: Death of nine month pregnant woman and her baby

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2026 | 11:45 AM

Topics:  

  • crime news
  • Pimpri News
  • pune news

संबंधित बातम्या

अघोरी पूजेच्या आमिषाने भक्तांची आर्थिक लूट; भोंदू बाबा मनोहरच्या टोळीवर मोक्का कारवाई
1

अघोरी पूजेच्या आमिषाने भक्तांची आर्थिक लूट; भोंदू बाबा मनोहरच्या टोळीवर मोक्का कारवाई

Nana Patekar: ‘नटसम्राट’ हरपला! ‘नाना गरिबांची कायम…’; फार्महाऊसवरील जाधव झाले भावूक
2

Nana Patekar: ‘नटसम्राट’ हरपला! ‘नाना गरिबांची कायम…’; फार्महाऊसवरील जाधव झाले भावूक

शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून गिरीश गुरनानी यांच्यावर मोठी जबाबदारी; कोथरूड विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती
3

शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून गिरीश गुरनानी यांच्यावर मोठी जबाबदारी; कोथरूड विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती

सहा वर्षांपासून फरार आरोपीला अखेर ठोकल्या बेड्या; गुन्हे शाखेच्या युनिट तीनची मोठी कारवाई
4

सहा वर्षांपासून फरार आरोपीला अखेर ठोकल्या बेड्या; गुन्हे शाखेच्या युनिट तीनची मोठी कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.