Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कार्यकारी अभियंत्यावर कारवाई होणार?; आमदार मानेंच्या आरोपांची जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतली नोंद

जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता दिपक कोळी यांच्यावर प्रशासकीय कारवाईची टांगती तलवार निर्माण झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात जलजीवन मिशन टेंडरवरून मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. आमदार यशवंत माने यांच्या आरोपांची विशेष नोंद जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 30, 2022 | 08:56 PM
कार्यकारी अभियंत्यावर कारवाई होणार?; आमदार मानेंच्या आरोपांची जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतली नोंद
Follow Us
Follow Us:

सोलापूर : जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता दिपक कोळी यांच्यावर प्रशासकीय कारवाईची टांगती तलवार निर्माण झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात जलजीवन मिशन टेंडरवरून मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. आमदार यशवंत माने यांच्या आरोपांची विशेष नोंद जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतली आहे.

केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत हर घर नल से जल या योजनेतून सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कामे सुरू असून, ३६ कोटींची टेंडर प्रक्रिया झाली आहे. या टेंडर प्रक्रीयेवर सध्या गोंधळ उडाला आहे. याच पार्श्वभूमीवर जलजीवन मिशनचा आढावा शुक्रवारी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी घेतला. या बैठकीला काही आमदार उपस्थित होते. या आढाव्यानंतर मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली.

ते म्हणाले, सोलापूर जिल्ह्यात सुमारे ९०० गावांमध्ये या योजनेची कामे होणार असून, एक हजार कोटींचा निधी सोलापूर जिल्हा परिषदेला आला आहे. या टेंडर प्रक्रियेत जिओ टॅगिंग हे महत्वाचे आहे मात्र मोहोळ तालुक्यातील वरकुटे आणि आढेगाव या गावांमध्ये जिओ टॅग न करता टेंडर दिले आहेत. या प्रक्रियेत टेंडर परस्पर रद्द केले जातात, त्यामुळे निश्चितच या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे स्पष्ट होते. जिल्हाधिकारी यांच्याकडे अनेक तक्रारी आल्या आहेत, त्यामुळे यात केवळ अधिकारी आणि मक्तेदारांना पोसण्याचे काम होत असल्याने म्हणून संबंधित ग्रामीण पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यास सक्तीच्या रजेवर पाठवून सर्व टेंडर रद्द करा आणि यात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करा, अशी मागणी आमदार माने यांनी केली.

गेल्या अनेक दिवसात ग्रामीण पाणीपुरवठा विभाग टेंडर प्रक्रियावरून चर्चित आला आहे. टेंडर प्रक्रिया ही बेकायदेशीर असल्याची ओरड जिल्हा परिषदेच्या माजी सदस्यांकडून होत आहे. ही ओरड सुरू असतानाच जिल्ह्यातील आमदारांनी या आरोपात उडी घेऊन भ्रष्टाचाराची पोलखोल जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यासमोर केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सीईओ दिलीप स्वामी यांची गैरहजेरी मोठी चर्चा घडवून गेली.

Web Title: Action will be taken against executive engineer the collectors office took note of mla manes allegations nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2022 | 08:56 PM

Topics:  

  • CEOSolapur
  • Cm Eknath Shinde
  • cmomaharashtra
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Ram Mandir CEO : राममंदिरचे नवे सीईओ जितेंद्र मिश्रा किती शिकलेत? पहा एका क्लिकवर
1

Ram Mandir CEO : राममंदिरचे नवे सीईओ जितेंद्र मिश्रा किती शिकलेत? पहा एका क्लिकवर

एसी लोकलच्या स्वयंचलित दरवाजांमुळे साध्या लोकलची कोंडी; प्रवाशांना फटका, मध्य रेल्वेची चिंता वाढली
2

एसी लोकलच्या स्वयंचलित दरवाजांमुळे साध्या लोकलची कोंडी; प्रवाशांना फटका, मध्य रेल्वेची चिंता वाढली

Bharat Gogawale: पोलादपूर बस स्थानकाला तानाजी मालुसरे यांचे नाव देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न
3

Bharat Gogawale: पोलादपूर बस स्थानकाला तानाजी मालुसरे यांचे नाव देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न

Chandrapur News: ४२ गावांचा भार, मात्र वैद्यकीय सुविधांचा अभाव; तळोधीत ग्रामीण रुग्णालयाची मागणी
4

Chandrapur News: ४२ गावांचा भार, मात्र वैद्यकीय सुविधांचा अभाव; तळोधीत ग्रामीण रुग्णालयाची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.