Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 20 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: रायगडच्या विकासासाठी ५९४ कोटींचा निधी; मार्चअखेर १०० टक्के खर्चाचे पालकमंत्र्यांचे निर्देश

२०२६-२७साठी रायगड जिल्ह्यासाठी एकूण ५९४.६६ कोटी रुपयांचा विकासनिधी मंजूर करण्यात आला आहे. विकासकामांचा दर्जा राखण्यासाठी अधिकाऱ्यांनी नियमित प्रत्यक्ष पाहणी करावी, असे निर्देश भरत गोगावले यांनी दिले.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 20, 2026 | 04:03 PM
Raigad News: रायगडच्या विकासासाठी ५९४ कोटींचा निधी; मार्चअखेर १०० टक्के खर्चाचे पालकमंत्र्यांचे निर्देश

Raigad News: रायगडच्या विकासासाठी ५९४ कोटींचा निधी; मार्चअखेर १०० टक्के खर्चाचे पालकमंत्र्यांचे निर्देश

Follow Us
Follow Us:
  • सन २०२६-२७साठी जिल्ह्याला एकूण ५९४.६६ कोटी रुपयांचा विकासनिधी मंजूर झाला
  • ग्रामीण विद्युतीकरण आणि सांडपाणी व्यवस्थापनाची कामांना प्राधान्य
  • विकासकामांचा दर्जा राखण्यासाठी अधिकाऱ्यांनी नियमित प्रत्यक्ष पाहणी करावी
अलिबाग: रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध होत असताना त्याचा विनियोग वेळेत आणि दर्जेदार कामांसाठी होणे आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री भरत गोगावले यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत प्रशासनाला निधी खर्चाबाबत स्पष्ट निर्देश दिले. मार्चअखेर कोणताही निधी अखर्चित राहू नये, मंजूर विकासकामांना तातडीने प्रशासकीय अ तांत्रिक मान्यता द्यावी आणि कामांच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड करू नये, असे त्यांनी बजावले. सन २०२६-२७साठी जिल्ह्याला एकूण ५९४.६६ कोटी रुपयांचा विकासनिधी मंजूर झाला असून, तो १०० टक्के खर्च करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

Nagpur News : दीक्षाभूमीवर अनुयायांचा महासागर! पुस्तक खरेदीसाठी प्रचंड गर्दी; धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर नगरी फुलली

निधीचे वितरण आणि प्रत्यक्ष विकासकामांची पूर्तता यामध्ये अंतर राहू नये, यासाठी प्रशासनाने नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे, अशी अपेक्षा या बैठकीत व्यक्त करण्यात आली. मंजूर कामांच्या निविदा वेळेत पूर्ण करून प्रशासकीय व तांत्रिक मान्यता तातडीने देण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.  (फोटो सौजन्य – AI Created) 

रस्ते, पाणी, आरोग्य आणि शिक्षणाला देणार प्राधान्य

जिल्ह्यातील रस्ते, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, ग्रामीण विद्युतीकरण आणि सांडपाणी व्यवस्थापनाची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, असे गोगावले यांनी सांगितले. प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील सुविधा सुधारणे, औषधांचा पुरेसा पुरवठा सुनिश्चित करणे आणि जिल्हा परिषद शाळांमधील भौतिक सुविधांसह शिक्षकांच्या उपस्थितीवर लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले. शेतक-यांसाठीच्या योजना, बंधारे, गाळमुक्त तलाव आणि सिंचन सुविधांची कामे वेळेत पूर्ण करावीत. जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देणाऱ्या पायाभूत सुविधा विकसित करण्याबरोबरच तरुणांसाठी स्वयंरोजगाराच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

चाऱ्याच्या उपलब्धतेवर भर

दरम्यान, राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाई टाळण्यासाठी तातडीच्या उपाययोजना राबविणे, नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करणे आणि ग्रामीण भागातील पशुधनासाठी पाणी व चारा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे. आता ५९४ कोटींच्या विकासनिध्याचा विनियोग किती वेगाने होतो आणि त्यातून रायगडच्या ग्रामीण भागासह शहरी क्षेत्रातील मूलभूत प्रश्न कितपत सुटतात, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.

सर्व विकासकामांबाबत गुणवत्तेवर तडजोड नको

विकासकामांचा दर्जा राखण्यासाठी अधिकाऱ्यांनी नियमित प्रत्यक्ष पाहणी करावी. वनविभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण आणि महसूल विभाग यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे कोणतेही काम रखडता कामा नये. आमदार, खासदार आणि स्थानिक लोकप्रतिनिधीनी सुचवलेल्या महत्त्वाच्या कामांना प्राधान्य देऊन ती वेळेत पूर्ण करावीत. नागरिकांच्या तक्रारीचे स्थानिक पातळीवरच जलद निवारण करण्यासाठी विशेष यंत्रणा राबवावी. – भरत गोगावले, पालकमंत्री

Thane Coastal Road: घोडबंदर रोडवरील वाहतूककोंडी कमी होणार? फ्लेमिंगो आणि खारफुटीच्या संरक्षणासाठी कठोर अटी

  • ५५४ कोटींचा आराखडा; ८७.४५ टक्के इतका खर्च
  • जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण घटकासाठी ४८१ कोटी रुपये
  • अनुसूचित जाती उपयोजनेसाठी- २८ कोटी रुपये
  • आदिवासी उपयोजनेसाठी ४५.०३ कोटी रुपये
  • एकूण ५५४.०३ कोटी रुपयांचा आराखडा
  • निधीचे वितरण – १०० टक्के
  • सप्टेंबर २०२६ अखेर प्रत्यक्ष खर्च ८७.४५ टक्के

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Raigad gets 594 crore development fund guardian minister bharat gogawale directs 100 percent utilisation by march end hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2026 | 04:03 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

Jalgaon News: वाहतूक पोलिसाने रोखताच व्यक्तीचा पारा चढला; थेट कॉलर पकडून घातली हुज्जत
1

Jalgaon News: वाहतूक पोलिसाने रोखताच व्यक्तीचा पारा चढला; थेट कॉलर पकडून घातली हुज्जत

Chandrapur News: चंद्रपुरात पावसाची मोठी तूट; रब्बी पिकांचे नियोजन कसे कराल? कृषी विभागाने सांगितला पर्याय
2

Chandrapur News: चंद्रपुरात पावसाची मोठी तूट; रब्बी पिकांचे नियोजन कसे कराल? कृषी विभागाने सांगितला पर्याय

Nagpur News : बाजारपेठा गजबजल्या, वाहतूक कोंडीने रस्ते गुदमरले! वाहनांच्या गर्दीत नागरिकांची कसरत
3

Nagpur News : बाजारपेठा गजबजल्या, वाहतूक कोंडीने रस्ते गुदमरले! वाहनांच्या गर्दीत नागरिकांची कसरत

Dasara 2026: दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर घरी आणा ‘या’ वस्तू; सुख-समृद्धीसाठी मानल्या जातात शुभ
4

Dasara 2026: दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर घरी आणा ‘या’ वस्तू; सुख-समृद्धीसाठी मानल्या जातात शुभ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.