Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आरोग्य व्यवस्था डिजिटल करण्यावर प्रशासनाचा भर! उपतक्रारी, जन्म-मृत्यू नोंदी आणि खरेदी प्रक्रियेवर असणार डॅशबोर्डची नजर

Mumbai News: मनुष्यबळ भरती, डॉक्टरांची उपस्थिती, नागरिकांच्या तक्रारी, रुग्णालयांचे खरेदी प्रक्रिया आणि डिजिटलायझेशन, रक्तपेढ्यांच्या दर्जावाढीपर्यंत विविध बदल केले जाणार आहेत. आरोग्यव्यस्थेत बदल केल्यास रुग्णांना त्याचे फायदे होतील.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 09, 2026 | 09:30 AM
आरोग्य व्यवस्था डिजिटल करण्यावर प्रशासनाचा भर! उपतक्रारी, जन्म-मृत्यू नोंदी आणि खरेदी प्रक्रियेवर असणार डॅशबोर्डची नजर

आरोग्य व्यवस्था डिजिटल करण्यावर प्रशासनाचा भर! उपतक्रारी, जन्म-मृत्यू नोंदी आणि खरेदी प्रक्रियेवर असणार डॅशबोर्डची नजर

Follow Us
Follow Us:

Mumbai News: मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात डॉक्टर वेळेवर आहेत का, नागरिकाची तक्रार किती दिवस प्रलंबित आहे, जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी अर्ज कुठे अडकला आहे किंवा औषध व उपकरणांची खरेदी कोणत्या टप्प्यावर रखडली आहे, याचा आता अधिक प्रभावी आणि डिजिटल पद्धतीने मागोवा घेण्याची तयारी पालिका प्रशासनाने सुरू केली आहे. आरोग्य सेवा केवळ रुग्णालयापुरती मर्यादित न ठेवता प्रत्येक टप्प्यावर उत्तरदायित्व निश्चित करणारी आणि नागरिक आणि रुग्णाभिमुख व्यवस्था उभारण्यावर भर असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी सायन येथील लो. टिळक सार्वजनिक रुग्णालयात दिली.(फोटो सौजन्य – AI)

Mumbai Ganesh Murti Collapse : गणेशोत्सवाला पुन्हा एकदा गालबोट! कुर्ल्यात स्पीड ब्रेकरवर तोल गेला अन् गणेशमूर्ती रस्त्यावर कोसळली

महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेतील जुन्या आणि दीर्घकाळ प्रलंबित प्रश्नांवर तात्पुरते उपाय करण्याऐवजी कायमस्वरूपी ‘सिस्टम’ उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मनुष्यबळ भरती, डॉक्टरांची उपस्थिती, नागरिकांच्या तक्रारी, रुग्णालयांचे खरेदी प्रक्रिया आणि डिजिटलायझेशन, रक्तपेढ्यांच्या दर्जावाढीपर्यंत विविध बदल केले जाणार आहेत.

आरोग्यविषयक तक्रारींसाठी ‘मार्ग’ प्रणालीचा विस्तार

जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांसाठी नागरिकांना कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत, यासाठी’ सेतू’ पद्धतीनुसार सेवा अधिक सुलभ करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अर्ज, प्रलंबित प्रकरणे आणि वॉर्डनिहाय कामगिरीवर डॅशबोर्डद्वारे देखरेख ठेवली जाणार असून प्रमाणपत्र तयार झाल्यानंतर नागरिकांना एसएमएसद्वारे माहिती देण्याचे नियोजन आहे. नागरिकांच्या आरोग्यविषयक तक्रारींसाठी ‘मार्ग’ प्रणालीचा विस्तार करण्यात येणार आहे. निश्चित कालावधीत तक्रार निकाली न निघाल्यास ती आपोआप वरिष्ठ अधिका-यांकडे वर्ग करण्याची व्यवस्था तयार केली जाणार असल्याचे वर्मा-लवंगारे म्हणाल्या.

Mumbai News : रेल्वे रूळ ओलांडण्याची बेफिकिरी वाढली; सात महिन्यांत ८,४११ प्रकरणांची विक्रमी नोंद

आकृतिबंधतेचा सदुपयोग

दुसरीकडे, महापालिका रुग्णालयांतील डॉक्टरांच्या उपस्थितीवरही प्रशासनाची अधिक काटेकोर नजर राहणार आहे. बायोमेट्रिक हजेरी प्रभावी करत अनियमित उपस्थितीबाबत चौकशी आणि नियमानुसार कारवाई केली जाईल. रिक्त पदे भरणे, नवीन डॉक्टरांसाठी प्रशिक्षण, बदलत्या वैद्यकीय गरजांनुसार नव्या पदरचनेचा ‘आकृतीबंध’, रुग्णकेंद्रित पीपीपी मॉडेल आणि २०२८ पर्यंत सुरू होणाऱ्या नवीन रुग्णालयांसाठी आगाऊ मनुष्यबळ नियोजनावरही प्रशासनाचा भर आहे. रक्तपेढ्यांना पुढील वर्षभरात एनएबीएल मानांकन मिळवून देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असून रुग्णालयांची स्वच्छता आणि कंत्राटी सेवांची गुणवत्ता तपासण्यासाठी भविष्यात तृतीय पक्षाकडून परीक्षण करण्याचे नियोजन आहे. औषचे आणि उपकरणांच्या खरेदीपासून रुग्णसेवेपर्यंत प्रत्येक प्रक्रियेतील विलंब शोधून तो कमी करण्यासाठी डिजिटल डॅशबोर्ड यवस्था विकसित करण्याचा प्रयत्न आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Administration focuses on digitizing the healthcare system dashboards to monitor grievance redressal birth and death records and procurement processes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • Brihanmumbai Municipal Corporation
  • Health Updates
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Today 2026: उत्तर भारतातील पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे, युपी, बंगालसह दोन राज्यांना पुराचा इशारा
1

Maharashtra Breaking News Today 2026: उत्तर भारतातील पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे, युपी, बंगालसह दोन राज्यांना पुराचा इशारा

Mumbai Ganesh Murti Collapse : गणेशोत्सवाला पुन्हा एकदा गालबोट! कुर्ल्यात स्पीड ब्रेकरवर तोल गेला अन् गणेशमूर्ती रस्त्यावर कोसळली
2

Mumbai Ganesh Murti Collapse : गणेशोत्सवाला पुन्हा एकदा गालबोट! कुर्ल्यात स्पीड ब्रेकरवर तोल गेला अन् गणेशमूर्ती रस्त्यावर कोसळली

Mumbai : मूर्धा गावात महापुरुषांची छायाचित्रे कचऱ्यात, मोदींसह राष्ट्रनायकांची चित्रे आढळल्याने खळबळ
3

Mumbai : मूर्धा गावात महापुरुषांची छायाचित्रे कचऱ्यात, मोदींसह राष्ट्रनायकांची चित्रे आढळल्याने खळबळ

PM Modi Security Breach : मोदींच्या कार्यक्रमात मोठी खळबळ; बनावट PMO ID, बंदुकधारी बॉडीगार्डसह दोघे ताब्यात
4

PM Modi Security Breach : मोदींच्या कार्यक्रमात मोठी खळबळ; बनावट PMO ID, बंदुकधारी बॉडीगार्डसह दोघे ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.