Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 23 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुकाराम मुंडे यांच्या धडक कारवायांचे वारे राज्यभर; मात्र वाईत अजूनही ‘सब कुछ ठीक है’चे चित्र?

राज्यभर धडक कारवायांचा गाजावाजा होत असताना वाईत मात्र अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या गैरप्रकारांवर प्रभावी कारवाई का झाली नाही, असा थेट प्रश्न नागरिक विचारत आहेत.

  • By विवेक
Updated On: Jun 06, 2026 | 08:50 PM
तुकाराम मुंढे यांच्या आदेशाला कोर्टात आव्हान; मनमानी कारभाराचा केला गेला आरोप

तुकाराम मुंढे यांच्या आदेशाला कोर्टात आव्हान; मनमानी कारभाराचा केला गेला आरोप

Follow Us
Follow Us:

वाई/सचिन ननावरे : वाई शहर आणि तालुक्यात भेसळयुक्त अन्नपदार्थ, अस्वच्छ खाद्यव्यवसाय, निकृष्ट दर्जाच्या दुग्धजन्य पदार्थांचा वापर, अवैध गुटखा विक्री आणि नियमबाह्य खाद्यव्यवसायांचे जाळे दिवसेंदिवस वाढत असताना अन्न व औषध प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. राज्यभर धडक कारवायांचा गाजावाजा होत असताना वाईत मात्र अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या गैरप्रकारांवर प्रभावी कारवाई का झाली नाही, असा थेट प्रश्न नागरिक विचारत आहेत.

शहरातील हातगाड्या, चायनीज स्टॉल, फास्टफूड सेंटर, फळ विक्रेते, ज्यूस सेंटर, मिठाई दुकाने तसेच हॉटेल व्यवसायांमध्ये स्वच्छतेचे निकष कितपत पाळले जातात, याची नियमित तपासणी होत असल्याचे चित्र दिसत नाही. अनेक ठिकाणी उघड्यावर खाद्यपदार्थांची विक्री, दूषित पाण्याचा वापर, अनेक दिवस वापरलेले तेल आणि अस्वच्छ भांड्यांमध्ये अन्न तयार होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत.

विशेष म्हणजे वाई शहरातील हॉटेल्स, मंगल कार्यालये आणि मोठ्या समारंभांमध्ये एकावेळी हजारो लोकांसाठी जेवण तयार केले जाते. या स्वयंपाकात वापरले जाणारे पनीर, खवा, दूध, तूप, तेल आणि इतर दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता कोण तपासते? वापरले जाणारे पनीर खरोखरच दर्जेदार आहे का? दूध आणि खवा भेसळमुक्त आहेत का? स्वयंपाकगृहांची स्वच्छता, साठवणूक व्यवस्था आणि अन्नसुरक्षा नियमांची अंमलबजावणी तपासण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने किती वेळा प्रत्यक्ष भेटी दिल्या? या प्रश्नांची स्पष्ट उत्तरे नागरिकांना मिळत नाहीत.

मिठाई व्यवसायावरही प्रश्नचिन्ह

सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणावर मिठाईची विक्री होते. मात्र मिठाई बनवण्यासाठी वापरला जाणारा खवा, दूध, कृत्रिम रंग, स्वादवर्धक रसायने आणि इतर घटकांची तपासणी कितपत केली जाते? गेल्या पाच वर्षांत वाई शहरातून किती नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले? त्यापैकी किती नमुने निकृष्ट किंवा भेसळयुक्त आढळले? दोषींवर किती कारवाई झाली? ही माहिती सार्वजनिक करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

गुटखा बंदी फक्त कागदावर?

राज्यात गुटखाबंदी लागू असताना वाई शहरातील अनेक भागांत आजही खुलेआम गुटखा विक्री सुरू असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. काही किराणा दुकाने, पानटपऱ्या आणि इतर माध्यमांतून गुटखा सहज उपलब्ध होत असल्याचे वास्तव आहे. शालेय विद्यार्थी आणि तरुण व्यसनाच्या विळख्यात अडकत असताना प्रशासनाची कारवाई मात्र अपुरी असल्याची भावना व्यक्त होत आहे.

अलीकडे करण्यात आलेल्या काही कारवाया केवळ आकडेवारीसाठी आणि वरिष्ठांना अहवाल सादर करण्यापुरत्याच मर्यादित असल्याची चर्चा शहरात रंगत आहे. जर गुटख्याचा पुरवठा पूर्णपणे बंद झाला असेल, तर शहरात तो आजही सहज उपलब्ध कसा होतो, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही संशय

वाई शहरात सुरू असलेल्या काही अवैध धंद्यांना संबंधित विभागातील काही घटकांचे अप्रत्यक्ष संरक्षण मिळत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये उघडपणे होत आहे. या चर्चेत तथ्य किती आहे, याचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशीची आवश्यकता असल्याची मागणी पुढे येत आहे. कारण कारवाईच्या नावाखाली छोटे विक्रेते लक्ष्य होत असताना मोठ्या साखळ्यांपर्यंत प्रशासनाचा हात पोहोचत नसल्याचा आरोप केला जात आहे.

ॲड. मिलिंद थोबडे यांचा ‘हॅट्ट्रिक’ विजय! बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा निवडणुकीत सोलापूरचा डंका

तुकाराम मुंडे यांच्या धर्तीवर विशेष मोहीम राबविणार का?

राज्यात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी भेसळखोर, गुटखा माफिया आणि नियमभंग करणाऱ्यांविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर छापे, नमुना तपासण्या आणि कठोर कारवाया करण्यात आल्या आहेत. मग वाई तालुका आणि सातारा जिल्ह्यात अशाच व्यापक आणि संयुक्त मोहिमा का राबविल्या जात नाहीत, असा सवाल उपस्थित होत आहे.

नागरिकांचा थेट सवाल

वाईकर जनतेचा प्रश्न सरळ आहे – जर शहरात इतक्या वर्षांपासून भेसळयुक्त अन्नपदार्थ, अस्वच्छ खाद्यव्यवसाय आणि गुटख्याचा अवैध व्यापार सुरू होता, तर अन्न व औषध प्रशासनाला हे दिसले नाही का? की जाणूनबुजून डोळेझाक करण्यात आली?

Satara News : शिवराज्याभिषेक दिनानिमित्त साताऱ्यात शिवभक्तांचा उत्साह; उदयनराजे भोसले यांनी शिवरायांना वाहिली आदरांजली

Web Title: Adulteration unsanitary conditions and the rampant business of gutkha in wai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 08:50 PM

Topics:  

  • Satara
  • Tukaram Mundhe
  • Wai

संबंधित बातम्या

Satara News: सातारा नगरपरिषदेची उद्या सर्वसाधारण सभा; मालमत्ता कर, रस्ते दुरुस्तीसह तब्बल ४० महत्त्वाच्या विषयांवर होणार निर्णय
1

Satara News: सातारा नगरपरिषदेची उद्या सर्वसाधारण सभा; मालमत्ता कर, रस्ते दुरुस्तीसह तब्बल ४० महत्त्वाच्या विषयांवर होणार निर्णय

लाडकी बहीण योजनेचा लाभ पुन्हा सुरू करा; महिला काँग्रेसचा साताऱ्यात मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारला निवेदन
2

लाडकी बहीण योजनेचा लाभ पुन्हा सुरू करा; महिला काँग्रेसचा साताऱ्यात मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारला निवेदन

विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर! महाविकास आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकतेची मागणी
3

विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर! महाविकास आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकतेची मागणी

मलम कागदावर, औषध रिकाम्या बाटल्यांमध्ये; FDA च्या तापासातून दवाखान्यांतील धक्कादायक प्रकार उघड
4

मलम कागदावर, औषध रिकाम्या बाटल्यांमध्ये; FDA च्या तापासातून दवाखान्यांतील धक्कादायक प्रकार उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.