Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बालेघर-आनंदपूर जोडरस्त्याच्या निधीसाठी अ‍ॅड. पिसाळ यांचा शिवेंद्रसिंहराजेंकडे पाठपुरावा; मांढरदेव भाविकांची अडचण दूर होणार

सध्या पुणे-बंगलोर महामार्गापासून मांढरदेव येथे जाण्यास सुमारे ३० किलोमीटर अंतर पार करावे लागते; मात्र, बालेघर-आनंदपूर मार्ग तयार झाल्यास हे अंतर केवळ ५ ते ६ किलोमीटरपर्यंत कमी होणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 26, 2026 | 12:03 PM
बालेघर-आनंदपूर जोडरस्त्याच्या निधीसाठी अ‍ॅड. पिसाळ यांचा शिवेंद्रसिंहराजेंकडे पाठपुरावा; मांढरदेव भाविकांची अडचण दूर होणार

बालेघर-आनंदपूर जोडरस्त्याच्या निधीसाठी अ‍ॅड. पिसाळ यांचा शिवेंद्रसिंहराजेंकडे पाठपुरावा; मांढरदेव भाविकांची अडचण दूर होणार

Follow Us
Follow Us:

वाई : मौजे बालेघर ते मौजे आनंदपूर या जोडरस्त्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, हा रस्ता तातडीने मंजूर करून पूर्ण करावा, अशी मागणी बावधन गटाच्या नेत्या अ‍ॅड. दिप्ती पिसाळ यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे केली. या रस्त्यामुळे मांढरदेव देवस्थान येथे येणाऱ्या भाविकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय टळणार आहे.

सध्या पुणे-बंगलोर महामार्गापासून मांढरदेव येथे जाण्यास सुमारे ३० किलोमीटर अंतर पार करावे लागते; मात्र, बालेघर-आनंदपूर मार्ग तयार झाल्यास हे अंतर केवळ ५ ते ६ किलोमीटरपर्यंत कमी होणार आहे. यामुळे भाविकांचा वेळ व इंधनाची मोठी बचत होणार आहे. सदर मार्गातील सुमारे २ किलोमीटर कच्चा रस्ता सध्या अस्तित्वात असून, उर्वरित ४ किलोमीटरचा रस्ता तयार करणे अत्यंत गरजेचे आहे. हा रस्ता पूर्ण झाल्यास मांढरदेव देवस्थानासह पंचक्रोशीतील गावांच्या सांस्कृतिक आणि आर्थिक विकासाला चालना मिळणार असल्याचे अ‍ॅड. दिप्ती पिसाळ यांनी व्यक्त केले.

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या रस्त्याच्या निधीबाबत सकरात्मकता दर्शवली असून, हा रस्ता पूर्ण झाल्यास मांढरदेवला एनएच ४ वरून येणाऱ्या भाविकांचे मोठे अंतर वाचणार आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजू भोसले, जेष्ठ जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे, जावळी पंचायत समितीचे सभापती सौरभ शिंदे, जितू पिसाळ, रोहित वाडकर आदी मान्यवर उपस्थित होते. अ‍ॅड. दिप्ती पिसाळ यांनी वाई शहर आणि तालुक्यातील अंतर्गत रस्त्यांसाठीही निधीची मागणी केली.

जावली तालुक्यात पाणी प्रश्नावरून बैठक

दुसरीकडे, जावली तालुक्यातील वाढत्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभागृहात महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत तालुक्यातील विविध गावांतील पाणी टंचाईची सविस्तर चर्चा करण्यात आली असून, प्रशासनाला तात्काळ आणि प्रभावी उपाययोजना राबविण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले. शिवेंद्रराजेंनी प्रशासनाला विलंब न करता ठोस उपाययोजना करण्याचे आदेश दिले. विशेषतः ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची समस्या तीव्र होत असल्याने नवीन विंधन विहिरी खोदण्याचे काम खाजगी ठेकेदारांमार्फत तातडीने सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले.

जावलीतील पाणी टंचाईवर मंत्र्यांची तातडीची ‘अ‍ॅक्शन’; शिवेंद्रराजेंच्या बैठकीत कठोर निर्देश

Web Title: Adv pisal follows up with shivendrasinha raje for funding for the baleghar anandpur link road

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 12:03 PM

Topics:  

  • Satara News
  • Shivendrasinharaje Bhosale

संबंधित बातम्या

Satara Water Crisis: साताऱ्याच्या दुष्काळी भागात पाण्यासाठी वणवण!; माण, खटाव अन् फलटणमध्ये ३५ टँकर सुरू
1

Satara Water Crisis: साताऱ्याच्या दुष्काळी भागात पाण्यासाठी वणवण!; माण, खटाव अन् फलटणमध्ये ३५ टँकर सुरू

Satara Drought: पावसाअभावी उभी पिके करपली; वाई तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची काँग्रेसची मागणी
2

Satara Drought: पावसाअभावी उभी पिके करपली; वाई तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची काँग्रेसची मागणी

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर
3

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर

भैरवनाथाच्या देवस्थानात ‘विकासा’च्या नावाखाली सिमेंटचा मारा? काँक्रीटीकरणावर ठाकरे गटाचा सवाल; ठेकेदारावर कारवाईची मागणी
4

भैरवनाथाच्या देवस्थानात ‘विकासा’च्या नावाखाली सिमेंटचा मारा? काँक्रीटीकरणावर ठाकरे गटाचा सवाल; ठेकेदारावर कारवाईची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.