Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी ! साताऱ्यातील ‘हा’ बडा नेता करणार अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

2014 च्या निवडणुकीत त्यांना कॉग्रेस पक्षांतर्गतच संघर्ष करावा लागला. तरीही त्यांनी राजकारणातील तत्व जोपासत सामान्य माणसाची नाळ शेवटपर्यंत सोडली नाही.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 16, 2025 | 08:53 AM
मोठी बातमी ! साताऱ्यातील 'हा' बडा नेता करणार अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मोठी बातमी ! साताऱ्यातील 'हा' बडा नेता करणार अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

Follow Us
Follow Us:

कराड : राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि.19) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रवेश सोहळा व कार्यकर्त्याचा मेळावा आयोजित करण्यात आला आहो. यामध्ये काँग्रेस नेते आणि रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे.

पक्षप्रवेशाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी रयत संघटनेचे प्राध्यापक शरद काटकर, यांच्यासह संघटनेचे जेष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. शनिवारी दुपारी चार वाजता शामराव पाटील फळे, फुले, भाजीपाला मार्केटच्या मैदानावर पक्षप्रवेश कार्यक्रम होणार आहे. या प्रवेश सोहळ्यासाठी भव्य मंडप उभारण्यात आला असून, सुमारे दहा हजार लोकांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी रयत संघटनेच्या या कार्यकर्त्यांचाही एकप्रकारे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे.

या कार्यक्रमास मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीनकाका पाटील, फलटणचे आमदार सचिन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सोनाली पोळ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

अॅड. उंडाळकर म्हणाले, ‘ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्याकडून राजकारणाचे धडे घेऊन ज्येष्ठ नेते (कै.) उंडाळकर यांनी समाजातील सामान्य जनतेचे नेतृत्व करत सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम आयुष्याच्या अखेरपर्यत केले. तसेच कऱ्हाड दक्षिण मतदार संघाचे त्यांनी सलग 35 वर्षे आमदार म्हणून प्रतिनिधीत्व करताना मतदार संघाचा त्यांनी चेहरामोहरा बदलला. विशेषतः मतदारसंघातील मूलभूत समस्यांची सोडवून करताना जलसिंचनाचा कराड दक्षिण पॅटर्न राबवून वारणेचे पाणी कृष्णा नदीला मिळवून पहिला नदीजोड प्रकल्प साकारला’.

काकांनी निर्माण केलेले प्राबल्य कायम ठेवण्यासाठी प्रयत्न

तालुक्याबरोबर सातारा जिल्ह्यातील सामान्य जनतेला सत्तेशी दारे खुली करण्याचे काम त्यांनी सातत्याने केले. 2014 च्या निवडणुकीत त्यांना कॉग्रेस पक्षांतर्गतच संघर्ष करावा लागला. तरीही त्यांनी राजकारणातील तत्व जोपासत सामान्य माणसाची नाळ शेवटपर्यंत सोडली नाही. त्याच्यानंतर राजकीय सामाजिक वारसा सर्व रयत संघटनेतील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आम्ही पुढे चालवत आहोत. कराड तालुक्यातील सामान्य माणसाचे काकांनी निर्माण केलेले प्राबल्य कायम ठेवण्यासाठी आपले प्रयत्न असून त्यास यशही आले आहे.

महाराष्ट्रातील राजकारणात होतोय बदल

ते पुढे म्हणाले, ‘राज्याच्या राजकारणात सातत्याने बदल होत आहेत. सध्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉग्रेसची सत्ता राज्यात आहे. त्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांचे तालुका, जिल्ह्यात उभे केलेले संघटन, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी, त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांना राजकीय ताकद मिळण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या विचारांशी साधर्म्य असलेल्या आणि सत्तेतील पक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे’.

Web Title: Adv udaysinh patil undalkar will join ncp on saturday

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2025 | 08:53 AM

Topics:  

  • ajit pawar
  • Maharashtra Politics
  • political news

संबंधित बातम्या

‘२०१९ मध्ये प्रेमभंग झाला, त्यानंतर आम्ही दुसरं लग्न केलं’; उद्धव ठाकरेंबाबत देवेंद्र फडणवीस यांची मिश्कील टिप्पणी
1

‘२०१९ मध्ये प्रेमभंग झाला, त्यानंतर आम्ही दुसरं लग्न केलं’; उद्धव ठाकरेंबाबत देवेंद्र फडणवीस यांची मिश्कील टिप्पणी

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’
2

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’

Amol Kolhe News:  सत्ताधाऱ्यांकडून सोबत येण्याची ऑफर आली का? अमोल कोल्हेंनी स्पष्टच सांगितलं
3

Amol Kolhe News: सत्ताधाऱ्यांकडून सोबत येण्याची ऑफर आली का? अमोल कोल्हेंनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Breaking News Updates Today:  राज्यावर मोठं संकट; घराबाहेर जाणं टाळा
4

Maharashtra Breaking News Updates Today: राज्यावर मोठं संकट; घराबाहेर जाणं टाळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.