Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amol Kolhe News: सत्ताधाऱ्यांकडून सोबत येण्याची ऑफर आली का? अमोल कोल्हेंनी स्पष्टच सांगितलं

Amol Kolhe News :अमोल कोल्हे यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "काहीही झालं तरी आमचे कोणतेही आमदार आणि खासदार फुटणार नाहीत, यावर आमचा विश्वास आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 02, 2026 | 10:16 AM
Amol Kolhe, Devendra Fadnavis, NCP, BJP,

Amol Kolhe, Devendra Fadnavis, NCP, BJP,

Follow Us
Follow Us:

Amol Kolhe News:  शिवसेना ठाकरे गटाला गळती लागल्यानंतर राज्यात ऑपरेशन तुतारीच्याही चर्चा सुरू झाल्या आहेत. अशातच खासदार अमोल कोल्हे यांच्या एका वक्तव्यावरुन सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे इन्फ्रामॅन म्हणून कौतुक केलं आहे. त्यांच्या या कौतुकानंतर सत्ताधारी पक्षाकडून ऑफर आली आहे का, असा सवाल त्यांना पत्रकारांनी विचारला असता, ” मला अजून ऑफर आलेली नाही, पण आल्यास विचार करू,” असं सूचक विधान अमोल कोल्हे यांनी केलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत बोलताना अमोल कोल्हे म्हणाले, “भविष्यात केंद्रीय पातळीवरील नेतृत्वासाठी ज्या नेत्यांची नावे घेतली जातात, त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याही नावाची दिल्लीच्या राजकीय वर्तुळात चर्चा होत असते. मराठी माणसाचे नाव राष्ट्रीय स्तरावर घेतले जात असेल, तर ती महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे.”

Beed Crime News : विलास घुले हत्या प्रकरणात कुटुंबीयांचे पाण्याच्या टाकीवर आंदोलन; पोलिसांचे कारवाई

ते पुढे म्हणाले, “केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव ज्या आदराने दिल्लीत घेतले जाते, त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांचीही ‘इन्फ्रामॅन’ म्हणून ओळख निर्माण झाली आहे. महाराष्ट्राचा लोकप्रतिनिधी म्हणून, पक्षीय राजकारण बाजूला ठेवून मी ही अपेक्षा व्यक्त करतो,” अशा शब्दांत अमोल कोल्हे यांनी फडणवीसांचे कौतुक केले.सत्ताधाऱ्यांची ऑफर आली का?

सत्ताधाऱ्यांकडून सोबत येण्याची ऑफर आली का  या प्रश्नावर बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की, “सध्या माझ्याकडे अशी ऑफर आलेली नाही. अशी काही ऑफर आली तर विचार करु. मी विचार करु असं म्हणालो आहे, जाऊ असं म्हणालेलो नाही”. आता कोल्हे यांच्या या वक्तव्यावर आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

धक्कादायक! युरोपमध्ये भीषण उष्णतेचा कहर, खेळताना महिला खेळाडूचे रॅकेटच वितळले; Video Viral

रोहित पवारांची प्रतिक्रिया

दरम्यान, अमोल कोल्हे यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “काहीही झालं तरी आमचे कोणतेही आमदार आणि खासदार फुटणार नाहीत, यावर आमचा विश्वास आहे. अमोल कोल्हे यांच्यावरही विश्वास आहे. त्यामुळे ते असं काही करणार नाहीत. कोणी चर्चा केली असावी किंवा भाजपमधून काही लोकं जाणीवपूर्वक अशा चर्चा पेरत असावेत. त्यामुळे आमचा पक्ष फुटेल असं मला तरी वाटत नाही”, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पाच खासदार सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना खासदार अमोल कोल्हे यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले आहे. पक्षातील एकजूट कायम असल्याचे त्यांनी नमुद केले. “शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण, ही राष्ट्रवादीच्या सर्व खासदारांची स्पष्ट भूमिका आहे. या विषयावर शरद पवार यांनी आधीच भूमिका मांडली असून, त्यापुढे अधिक चर्चा करण्याची गरज नाही.” गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात विविध पक्षांतील संभाव्य पक्षांतर आणि गटबाजीच्या चर्चांना उधाण आले आहे. अशा पार्श्वभूमीवर पाच खासदारांच्या संभाव्य पक्षांतराबाबतच्या चर्चांवर अमोल कोल्हे यांनी स्पष्टीकरण देत त्या अफवा असल्याचे स्पष्ट केले.

 

Web Title: Amol kolhe hints at thinking about ruling party offer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 10:14 AM

Topics:  

  • amol kolhe
  • BJP
  • devendra fadnavis
  • Maharashtra Politics
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश
2

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश

Pune Politics: नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांची पदे धोक्यात? राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
3

Pune Politics: नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांची पदे धोक्यात? राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा
4

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.