Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Updates Today: राज्यावर मोठं संकट; घराबाहेर जाणं टाळा

Maharashtra Breaking News: मुंबईसह उपनगरात कालपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. जोरदार पावसाचा परिणाम मुंबईच्या वाहतुकीवरही झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक सखल भागात पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांनी महत्वाचे काम असेल तरच शक्यतो घराबाहेर पडावे असे आवाहन करण्यात आले आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 02, 2026 | 10:00 AM
LIVE
Maharashtra Breaking News Updates Today:

Maharashtra Breaking News Updates Today:

Follow Us
Follow Us:
  • 02 Jul 2026 10:00 AM (IST)

    02 Jul 2026 10:00 AM (IST)

    मुंबईच्या पावसात चिंब भिजली तमन्ना भाटिया; अभिनेत्रीचा पावसाळी अंदाज व्हायरल

    मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून पावसाला जोरदार सुरूवात झाली असून बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया हिचा मुंबईतील पावसाचा आनंद लुटतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तमन्ना बाल्कनीत उभी राहून मुसळधार पावसात चिंब भिजताना आणि पावसाचा मनमुराद आनंद घेताना दिसत आहे. मात्र, तिचा हा व्हिडिओ पाहून तिची मैत्रीण आणि अभिनेत्री रवीना टंडन यांची मुलगी राशा थडानी हिने मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.

    तमन्नाने बुधवारी तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला. पावसाच्या सरी पाहून ती उत्साहाने बाहेर येते आणि पावसात भिजत आनंद लुटताना दिसते. काही वेळानंतर ती कॅमेऱ्याकडे पाहून हसत म्हणते, “आता मला थंडी वाजत आहे. मी हे फक्त मजेसाठी केलं.” पोस्टच्या कॅप्शनमध्येही तिने लिहिले, “आता मलाही थंडी वाजत आहे.”

  • 02 Jul 2026 09:30 AM (IST)

    02 Jul 2026 09:30 AM (IST)

     Pune Airport Metro:  कल्याणीनगर ते विमानतळ  मेट्रोने जोडणारा नवा मेट्रो मार्गांनर शिक्कामोर्तब  

    Pune Airport Metro:  पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला मेट्रोने जोडणारा नवा मेट्रो मार्ग अखेर अंतिम करण्यात आला असून, कल्याणीनगर ते पुणे विमानतळ या मार्गाच्या आराखड्यावर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मेट्रो अधिकाऱ्यांसमवेत घेतलेल्या बैठकीत मंजुरीचे शिक्कामोर्तब केले आहे. या नव्या निर्णयामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सर्व मेट्रो मार्ग आता थेट विमानतळाला जोडले जाणार असल्याने प्रवाशांचा प्रवास अत्यंत सुलभ होणार आहे; तसेच वनाज ते चांदणी चौक या विस्तारित मेट्रो मार्गावरील पौड रस्त्याची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी कचरा डेपोपासूनच दुहेरी उड्डाणपूल उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, मंत्री मोहोळ यांनी या संपूर्ण मार्गाचा सुधारित आराखडा तातडीने तयार करण्याचे निर्देश संबंधित प्रशासनाला दिले आहेत.

  • 02 Jul 2026 09:25 AM (IST)

    02 Jul 2026 09:25 AM (IST)

    Beed Crime Protest : केज तालुक्यातील विलास घुले  कुटुंबीयांचे 'पाण्याच्या टाकीवर' आंदोलन 

    Beed Crime Protest : जिल्ह्यातील केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी घुले कुटुंबीयांनी आज सकाळपासून पाण्याच्या टाकीवर चढून सुरू केलेले तीव्र आंदोलन पोलीस अधिकाऱ्यांच्या मध्यस्थी आणि आश्वासनानंतर अखेर स्थगित केले आहे. या आंदोलनात मृत विलास घुले यांचे भाऊ रमेश घुले यांच्यासह कुटुंबातील महिलांनी पाण्याच्या टाकीवर चढून प्रशासनाचा निषेध केला, तर दुसरीकडे संतप्त गावकऱ्यांनी पाण्याच्या टाकीजवळच ठिय्या आंदोलन सुरू केले होते. अखेर, घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत दोषींवर तात्काळ आणि कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर कुटुंबीयांनी आपले आंदोलन मागे घेतले.

  • 02 Jul 2026 09:20 AM (IST)

    02 Jul 2026 09:20 AM (IST)

    Petrol Diesel Rates:  मुंबईत पेट्रोल १११ रुपयांच्या पार, दिल्ली-नोएडातही दरांमध्ये वाढ

    Petrol Diesel Rates: आज गुरुवारी देशातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झाल्याचे पाहायला मिळत असून, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत इंधनाचे दर सर्वाधिक पातळीवर पोहोचले आहेत. मुंबईत आज एक लिटर पेट्रोलसाठी १११.२१ रुपये, तर एक लिटर डिझेलसाठी ९७.८३ रुपये मोजावे लागत आहेत; तर दुसरीकडे राजधानी दिल्लीत पेट्रोल १०२.१२ रुपये आणि डिझेल ९५.२० रुपये प्रति लिटर झाले आहे. दिल्लीला लागून असलेल्या नोएडात पेट्रोलचा भाव १०१.९६ रुपयांवर पोहोचला असून, गुडगावमध्ये पेट्रोलसाठी १०२.९७ रुपये आणि डिझेलसाठी ९५.६४ रुपये मोजावे लागत असल्याने सर्वसामान्य वाहनधारकांच्या खिशाला मोठी कात्री लागत आहे.

  • 02 Jul 2026 09:15 AM (IST)

    02 Jul 2026 09:15 AM (IST)

    Gold Price Hikeजागतिक मंदीच्या पार्श्वभूमीवर सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम १.४० लाखांच्या पार

    Gold Price Hike : जागतिक बाजारपेठेतील मंदी आणि डॉलरमधील मजबुतीमुळे सोन्याचे भाव दबावाखाली राहिले असले, तरी २ जुलै रोजी देशभरात सोन्याच्या किमतीत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. राजधानी दिल्लीमध्ये आज २४ कॅरेट सोन्याची किंमत वाढून ती १,४०,९२० रुपये प्रति १० ग्रॅम इतकी झाली आहे, तर मुंबईत १० ग्रॅम सोन्याचे दर १,४०,७७० रुपयांवर पोहोचले आहेत. याआधीच्या दिवशी दिल्लीच्या सराफा बाजारात ९९.९ टक्के शुद्ध सोन्याचा भाव १३०० रुपयांनी घसरून प्रति १० ग्रॅमसाठी १,४४,५०० रुपये झाला होता; दरम्यान, सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात 'स्पॉट गोल्ड'चा व्यवहार प्रति औंस ३,९८६.०७ डॉलर्सवर सुरू असून बहुतांश शहरांमध्ये आज सोन्याचे भाव चढेच असल्याचे चित्र आहे.

  • 02 Jul 2026 09:10 AM (IST)

    02 Jul 2026 09:10 AM (IST)

    Helicopter Crash : अमेरिकन लष्कराचे MH60 हेलिकॉप्टर क्रॅश

    वॉशिंग्टन : अमेरिकन सैन्याच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला. अरबी समुद्रात आपत्कालीन लँडिंग करताना अमेरिकी नौदलाचे MH-60S सी हॉक हेलिकॉप्टर कोसळले. अमेरिकी नौदलाच्या ५ व्या फ्लीटनुसार, ही घटना कोणत्याही शत्रू राष्ट्राच्या हल्ल्याचा परिणाम नव्हती. हे हेलिकॉप्टर ‘यूएसएस जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश’ या विमानवाहू जहाजावर तैनात होते. हा अपघात १ जुलै रोजी पहाटे ३:३० वाजता (स्थानिक वेळेनुसार) झाला. हेलिकॉप्टरमध्ये चार कर्मचारी होते.  वाचा सविस्तर- 

  • 02 Jul 2026 09:05 AM (IST)

    02 Jul 2026 09:05 AM (IST)

    Vaibhav Sooryavanshi वरून रवी शास्त्रींचा टीम इंडियाला घरचा आहेर

    India Vs England: काल भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील टी 20 सिरिजमधील पहिला सामना खेळवण्यात आला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हर्समध्ये 189 रन्स केल्या. कर्णधार श्रेयस अय्यर आणि अभिषेक शर्माने शानदार अर्धशतक लगावले. मात्र पावसामुळे हा सामना रद्द करावा लागला. मात्र कालच्या सामन्यात देखील वैभव सूर्यवंशीला स्थान देण्यात आले नव्हते. आता यावरून भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारतीय टीम मॅनेजमेंटला (Gautam Gambhir) एक महत्वाचा सल्ला दिला आहे.

     

  • 02 Jul 2026 08:58 AM (IST)

    02 Jul 2026 08:58 AM (IST)

    Crime News: चुकीचे इंजेक्शन दिल्याने गर्भवती महिलेचा प्रसूतीदरम्यान मृत्यू

    नवी मुंबई / सिद्धेश प्रधान : ऐरोली येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या राजमाता जिजाऊ रूग्णालयात रिचा मिश्रा आणि सोनम डोंगरे या दोन गर्भवती महिला प्रसूतीसाठी सोमवारी (दि.30) दाखल झाल्या होत्या. या दोन्ही महिला आठ महिन्यांच्या गर्भवती असल्याने त्यांचा गर्भधारणेचा कालावधी पूर्ण होण्याआधीच प्रिमॅच्युअर प्रसूती होऊन त्यांच्या अर्भकाच्या प्रकृतीमध्ये दोष राहू नये याकरिता सर्वसाधारणपणे अशा गर्भवती महिलांना देण्यात येणारे इंजेक्शन त्यांना देण्यात आले होते. वाचा सविस्तर - 

Maharashtra to National And International Breaking News:

Maharashtra Rain Update: हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार राज्यात मुसळधार पाऊस कोसळण्यास सुरुवात झाली आहे. गेले अनेक दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. राज्यातील पाणीसाठा कमी झपाट्याने कमी होत होता. मात्र आता पावसाने जोर पकडला असून अनेक जिल्ह्यांमध्ये प्रचंड पाऊस सुरू झाला आहे. अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कालपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई, ठाणे , पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यात शाळा, महाविद्यालये आज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

 

 

Web Title: 2 july 2026 live breaking news marathi maharashtra politics national international politics crime sports monsoon petrol diesel price news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 08:52 AM

Topics:  

  • maharashtra breaking news
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Raj Thackeray on BJP: ‘भाजपचा हा राजकीय जुगार अंगलट येणार, सत्तेचा बंगला कोसळणार’; फोडाफोडीच्या राजकारणावर राज ठाकरेंचा हल्लबोल
1

Raj Thackeray on BJP: ‘भाजपचा हा राजकीय जुगार अंगलट येणार, सत्तेचा बंगला कोसळणार’; फोडाफोडीच्या राजकारणावर राज ठाकरेंचा हल्लबोल

Maharashtra Politics: सचिन अहिर नंतर आता ‘हा’ आमदार फुटण्याची चर्चा, ठाकरेसेनेचं टेन्शन वाढलं, आदित्यंचं काय होणार?
2

Maharashtra Politics: सचिन अहिर नंतर आता ‘हा’ आमदार फुटण्याची चर्चा, ठाकरेसेनेचं टेन्शन वाढलं, आदित्यंचं काय होणार?

Sanjay Raut News: ‘जे शरद पवारांचे झाले नाहीत, ते आमचे काय होणार?’ सचिन अहिर यांच्या पक्षबदलावर संजय राऊतांची जहरी टीका
3

Sanjay Raut News: ‘जे शरद पवारांचे झाले नाहीत, ते आमचे काय होणार?’ सचिन अहिर यांच्या पक्षबदलावर संजय राऊतांची जहरी टीका

Sachin Ahir News: ‘मी पक्ष सोडलेला नाही…’ सचिन अहिरांच्या विधानाने राजकीय पेच वाढला; आमदारकी राहणार की जाणार?
4

Sachin Ahir News: ‘मी पक्ष सोडलेला नाही…’ सचिन अहिरांच्या विधानाने राजकीय पेच वाढला; आमदारकी राहणार की जाणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.