Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नाशिकनंतर आता रायगडमध्ये मोठा अपघात; ‘या’ कारणामुळं घडला अपघात? कार-ट्रकची समोरासमोर धडक आणि…

या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. वाहतूक पोलीस आणि इतर यंत्रणांनी अपघाताची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर बचावकार्याला सुरुवात झाली. कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की...

  • By Amrut Sutar
Updated On: Jan 19, 2023 | 08:26 AM
नाशिकनंतर आता रायगडमध्ये मोठा अपघात; ‘या’ कारणामुळं घडला अपघात? कार-ट्रकची समोरासमोर धडक आणि…
Follow Us
Follow Us:

रायगड– आज पहाटे पाचच्या सुमारास रायगडमधील गोरेगावमध्ये ट्रक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. तो विरुद्ध दिशेला जावून समोरून येणाऱ्या इको कारला धडकला. कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की, कारचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला, आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले. नवीन वर्षात अपघाताच्या (Accident) घटना काही कमी होताना नाव घेत नाहीत, मागील आठवड्यात नाशिक (Nashik) येथे मोठी अपघाताची घटना ताजी असतानाच, आज पहाटे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर (mumbai goa national highway) भीषण अपघात झाला आहे. रायगडमध्ये झालेल्या या अपघातात ९ जणांचा जागीच मृत्यू (Nine dead) झाला आहे. तर, अपघातात लहान मुल बचावलं आहेत. या मुलावर माणगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे.

[read_also content=”मोठी बातमी! रायगडमध्ये भीषण अपघात, ९ जणांचा जागीच मृत्यू तर अनेकजण जखमी; मृतांमध्ये चार महिलांचा समावेश, मदतकार्य सुरु… https://www.navarashtra.com/maharashtra/big-news-accident-on-mumbai-goa-national-highway-nine-people-died-on-the-spot-four-women-were-among-the-dead-362845.html”]

समोरासमोर धडक…

दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच गोरेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, मदतकार्य सुरु केले आहे. या अपघातात ४ महिला आणि ५ पुरुषांचा समावेश आहे. या अपघातामुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. वाहतूक पोलीस आणि इतर यंत्रणांनी अपघाताची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर बचावकार्याला सुरुवात झाली. कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की, कारचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे. त्यामुळे या कारमधील ९ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. तर अनेकजण जखमी असल्याची माहिती समोर येत आहे. सध्या जखमींवर उपचार सुरु आहे.

अर्धवट काम…

कारमधील ९ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याचे समजते. मृतांमध्ये चार महिलांचा समावेश आहे, तर एक लहान मुलगा गंभीररित्या जखमी झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर यापूर्वीही असंख्य अपघात झाले आहेत. या महामार्गावरील अपघातांची मालिका अजूनही थांबताना दिसत नाही. या महामार्गाच्या पहिल्या टप्प्प्याचं काम अजूनही अपूर्ण आहे. त्यामुळे या महामार्गावर अपघात होत असतात असं सांगितलं जातं.

कणकवलीत सुद्धा अपघात

दरम्यान, कणकवलीतही भीषण अपघात झाला आहे. कणकवलीत आरामबस उलटून 4 जणांचा मृत्यू तर 23 जण जखमी झाले आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली येथे वागदे पुलानजीक खासगी बसला भीषण अपघात झालाय. पहाटे 4 वाजता हा अपघात झाला असून या अपघातात 4 ठार तर 23 जण जखमी असल्याची माहिती मिळतेय. गडनदी पूलावर धोकादायक वळणावर चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला, ही बस मुंबई ते गोवाच्या दिशेने जात होती.

Web Title: After nashik now major accident in raigad accident occurred due to this reason car truck head on collision and

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2023 | 08:26 AM

Topics:  

  • Goa
  • Mumbai
  • रायगड

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: गणेशभक्तांसाठी दिलासा! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; गणेशोत्सवात लोकलच्या मेगाब्लॉकला ‘ब्रेक’
1

Ganeshotsav 2026: गणेशभक्तांसाठी दिलासा! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; गणेशोत्सवात लोकलच्या मेगाब्लॉकला ‘ब्रेक’

Rickshaw-Taxi Fare Hike: अरे देवा! रिक्षा-टॅक्सी प्रवास १ सप्टेंबरपासून महागणार, आता किती रुपये वाढणार? जाणून घ्या…
2

Rickshaw-Taxi Fare Hike: अरे देवा! रिक्षा-टॅक्सी प्रवास १ सप्टेंबरपासून महागणार, आता किती रुपये वाढणार? जाणून घ्या…

Manori Water Treatment Project: मनोरी जलशुद्धीकरण प्रकल्पाला मच्छीमारांचा तीव्र विरोध; ‘हजारो कुटुंबांच्या रोजगारावर संकट’
3

Manori Water Treatment Project: मनोरी जलशुद्धीकरण प्रकल्पाला मच्छीमारांचा तीव्र विरोध; ‘हजारो कुटुंबांच्या रोजगारावर संकट’

Home Credit India: महागडे शहर, पण आर्थिक नियोजन मजबूत! मुंबईकरांचा मासिक खर्च ₹२३ हजार; घरखरेदीला सर्वाधिक प्राधान्य
4

Home Credit India: महागडे शहर, पण आर्थिक नियोजन मजबूत! मुंबईकरांचा मासिक खर्च ₹२३ हजार; घरखरेदीला सर्वाधिक प्राधान्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.