Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Navratri 2026: मुंबईत सर्वात मोठा गरबा महोत्सव; रंगणार ‘रंगीलो रे’चा जल्लोष, नवरात्रीचा उत्साह होणार डबल

Mumbai Garba Festival Rangilo Re 2026: मुंबईतील लोकप्रिय ‘रंगीलो रे’ गरबा महोत्सवाची ८वी आवृत्ती ११ ते १९ ऑक्टोबरदरम्यान नेस्को हॉल ६ येथे ९ रात्री रंगणार आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 08, 2026 | 07:11 PM
Mumbai Garba Festival

Mumbai Garba Festival

Follow Us
Follow Us:
  • गरबा प्रेमींसाठी मोठी बातमी
  • मुंबईत रंगणार ‘रंगीलो रे’चा उत्सव
  • पार्थिव गोहिल यांचे लाइव्ह परफॉर्मन्स
मुंबई: मुंबईतील भव्य इनडोअर गरबा महोत्सवांपैकी एक असलेला ‘रंगीलो रे’ आपल्या ८ व्या आवृत्तीसह पुन्हा एकदा सज्ज झाला असून, ११ ते १९ ऑक्टोबर दरम्यान नेस्को हॉल ६, मुंबई येथे ९ रात्रींचा सांस्कृतिक उत्सव रंगणार आहे. लाईव्ह एंटरटेनमेंटचा शोध आणि तिकीट बुकिंगसाठी भारतातील एआय-आधारित प्लॅटफॉर्म थम्पएन (thumpN) वर या महोत्सवाची तिकिटे आता उपलब्ध झाली आहेत.

निलंबित एपीआयच्या आलिशान गाड्यांवर हायकोर्टाचे सवाल; महिन्याला ९० हजार पगार, मग बीएमडब्ल्यू-मर्सिडीज कुठून आल्या?

देशभरातील सांस्कृतिक रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या मागील ७ आवृत्त्यांच्या अभूतपूर्व यशानंतर, ‘रंगीलो रे’ या वर्षी अधिक भव्य स्वरूपात सादर होत आहे. या ९ रात्रींच्या उत्सवात गरबा, दांडिया रास आणि गुजराती संस्कृतीचा मेळ पाहायला मिळणार आहे. यामध्ये गुजराती लोकसंगीत, भारतीय शास्त्रीय संगीत, बॉलीवूड, भक्ती आणि समकालीन संगीतातील उल्लेखनीय योगदानासह ‘देवदास’ व ‘सावरिया’ यांसारख्या प्रसिद्ध चित्रपटांसाठी ओळखले जाणारे प्रसिद्ध लोक-फ्यूजन संगीतकार पार्थिव गोहिल यांचे थेट सादरीकरण हे मुख्य आकर्षण असणार आहे.

थम्पएनचे सीईओ वरुण खरे म्हणाले, “अनेक लोकांसाठी नवरात्र हा केवळ एक सण नसून आठवणी, कुटुंब, मित्रपरिवार, समाज आणि वर्षभर ज्याची वाट पाहिली जाते असा एक सोहळा आहे. ‘रंगीलो रे’ हा ९ रात्रींच्या ऊर्जेद्वारे सर्व वयोगटातील लोकांना एकत्र आणून ही भावना जिवंत करतो. या आवृत्तीचा अनन्य (exclusive) टिकटिंग पार्टनर म्हणून, योग्य रात्रीची निवड करण्यापासून ते कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रवेश करेपर्यंतचा प्रवास तितकाच सुलभ व विचारपूर्वक व्हावा यावर आमचा भर आहे. याच प्रकारच्या खास क्षणांसाठी थम्पएन ची निर्मिती केली जात आहे.”

या महोत्सवात वातानुकूलित इनडोअर हॉल, पुरेशी पार्किंग व्यवस्था, नृत्यासाठी मोकळी जागा, उत्सवासाठी खास खाद्य व पेय पदार्थ आणि कुटुंबासाठी सुरक्षित वातावरण उपलब्ध करून दिले जाईल. या महोत्सवाच्या दैनंदिन तिकिटांची सुरुवातीची किंमत १,०९९ रुपये आहे, तर ९ दिवसांच्या ऑल-ॲक्सेस सीझन पासची किंमत ९,९९९ रुपयांपासून सुरू होते.

एलएमजी लाईव्हचे मुख्य कार्यकारी अधिकारी शाजू इग्नेशिअस म्हणाले, “एलएमजी लाईव्हच्या माध्यमातून आमचा नेहमीच असा थेट अनुभव देण्याचा प्रयत्न राहिला आहे, ज्याची मुळे आपल्या संस्कृतीत खोलवर रुजलेली आहेत आणि जे आजच्या प्रेक्षकांच्या पसंतीनुसार प्रगत होत आहे. गेल्या काही वर्षांत ‘रंगीलो रे’ हा संगीत, समुदाय आणि नवरात्रीचा उत्साह एकाच छताखाली आणणारा एक मोठा उत्सव बनला आहे. ८ व्या आवृत्तीच्या निमित्ताने, रंगीलो रे चे मूळ सौंदर्य जपत हा अनुभव एका नव्या उंचीवर नेण्याचा आमचा मानस आहे. पार्थिव गोहिल यांच्या संगीतमय मार्गदर्शनाखाली या अविस्मरणीय ९ रात्रींमध्ये गरबाचा उत्साह जिवंत करण्यासाठी आम्ही अत्यंत उत्सुक आहोत.”

लक्ष्य लाईव्ह एक्सपिरियन्सेसचे संचालक आणि सीईओ सौरभ खुराना म्हणाले, “रंगीलो रे हा अशा थेट अनुभवाचे प्रतिनिधित्व करतो ज्यावर आमचा विश्वास आहे. संस्कृतीत रुजलेला, परंतु आधुनिक थेट मनोरंजनासाठी आवश्यक असणारे भव्य स्वरूप, निर्मितीमूल्य आणि प्रेक्षकांच्या अनुभवाला प्राधान्य देणारा. ८ व्या आवृत्तीच्या सुरुवातीसोबतच, प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या गोष्टी अधिक मजबूत करणे आणि एकूण अनुभवाचा दर्जा उंचावणे हा आमचा प्रयत्न आहे. संगीत, गरबा आणि उत्सवाच्या या ९ रात्रींमध्ये प्रेक्षकांचे स्वागत करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”

Mulund Fire: मुलुंडमध्ये आगीचा भडका! पीएपी इमारत प्रकल्पाला भीषण आग, स्फोटाचा आवाज ऐकू आल्याने परिसरात खळबळ

Web Title: Mumbai navratri 2026 rangilo re garba festival pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 07:11 PM

Topics:  

  • garaba
  • Mumbai
  • Navaratri Outfits

संबंधित बातम्या

Mulund Fire: मुलुंडमध्ये आगीचा भडका! पीएपी इमारत प्रकल्पाला भीषण आग, स्फोटाचा आवाज ऐकू आल्याने परिसरात खळबळ
1

Mulund Fire: मुलुंडमध्ये आगीचा भडका! पीएपी इमारत प्रकल्पाला भीषण आग, स्फोटाचा आवाज ऐकू आल्याने परिसरात खळबळ

Mira-Bhayandar News: जलकुंभात पालिका कर्मचाऱ्यांची कथित मद्यपार्टी? ‘हुल्लड डान्स’नंतर दारू-मटन पार्टीच्या आरोपाने खळबळ
2

Mira-Bhayandar News: जलकुंभात पालिका कर्मचाऱ्यांची कथित मद्यपार्टी? ‘हुल्लड डान्स’नंतर दारू-मटन पार्टीच्या आरोपाने खळबळ

Virar Accident: भरधाव थार थेट घरात घुसली; भिंत कोसळून घरमालक जखमी, दोन दुचाकींचे नुकसान
3

Virar Accident: भरधाव थार थेट घरात घुसली; भिंत कोसळून घरमालक जखमी, दोन दुचाकींचे नुकसान

Mira Bhayandar News: फेरीवाला ओळखपत्र वाटपाचा अधिकार ठेकेदाराला कोणी दिला? समितीला अंधारात ठेवून कार्डांचे वाटप
4

Mira Bhayandar News: फेरीवाला ओळखपत्र वाटपाचा अधिकार ठेकेदाराला कोणी दिला? समितीला अंधारात ठेवून कार्डांचे वाटप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.