Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : उन्हाच्या कडाक्यानंतर पावसाची दमदार बॅटींग; अवकाळी गारांमुळे कोल्हापूरकरांची उडाली दाणादाण

गेल्या काही दिवसांपासून वाढत्या उष्म्यामुळे हैराण झालेल्या कोल्हापूरकरांना बुधवारी पावसाने सुखद दिलासा दिला.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 02, 2026 | 02:40 PM
Kolhapur News : उन्हाच्या कडाक्यानंतर पावसाची दमदार बॅटींग; अवकाळी गारांमुळे कोल्हापूरकरांची उडाली दाणादाण
Follow Us
Follow Us:
  • उन्हाच्या कडाक्यानंतर पावसाची दमदार बॅटींग
  • अवकाळी गारांमुळे कोल्हापूरकरांची उडाली दाणादाण
 कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून वाढत्या उष्म्यामुळे हैराण झालेल्या कोल्हापूरकरांना बुधवारी पावसाने सुखद दिलासा दिला. सकाळपासून कडक उन्हाचे चटके सहन करणाऱ्या जिल्ह्याला दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह पावसाने झोडपून काढले. विशेष म्हणजे, शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागांत पावसासोबत मोठ्या प्रमाणावर गारांचा वर्षाव झाला. या अचानक झालेल्या बदलामुळे तापमानात घट झाली असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा सातत्याने वाढत आहे. सकाळी 10 वाजेपासूनच सूर्याची प्रखरता जाणवत होती.

दुपारपर्यंत कमाल तापमान 37 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने अंगाची लाहीलाही होत होती. पावसात 40 झाडे पडली . कोल्हापूर शहरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. या पावसामध्ये गोखले कॉलेज समोर एक पत्र्याच्या घराची भिंत दुसऱ्या घरावर पडली आहे. यामध्ये जवळपास दीड लाखाचे नुकसान झाले आहे. तसेच पंचगंगा नदी घाट यासह – शहरातील विविध ठिकाणची 40 झाले पडली आहेत, अशी माहिती महापालिका अग्निशमन विभागाकडून देण्यात आली.

Satara News : काळ आलेला पण वेळ नव्हती आली ; स्फोटांच्या मालिकेने हादरला MIDC परिसर

हवामानात बदल अन् गारांचा पाऊस
दुपारी तीनच्या सुमारास हवामानात अचानक नाट्यमय बदल झाला. आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली आणि सोसाट्याचा वारा वाहू लागला. पाठोपाठ विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसाचा जोर इतका होता की, अवघ्या काही मिनिटांतच शहरासह ग्रामीण भागातही गारा पडण्यास सुरुवात झाली. रस्त्यावर आणि घराच्या छतावर पांढरेशुभ्र थर साचले होते. सुमारे पाऊण तास चाललेल्या या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले.

उष्म्याचा कडेलोट झाल्यानंतर बुधवारी सायंकाळी विजांच्या लखलखाट आणी वादळी वाऱ्यासह एक तास पाऊसाची जोरदार हजेरी लागल्याने उष्ण्यापासुन दिलासा मिळाला असला तरी ठिकठिकाणी झाडे व फांद्या तुटल्याने विज गायब झाली. पावसाची एक तासात 22 मि.मी. इतकी नोंद झाली. कोल्हापूर जिल्ह्याचे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या पन्हाळ्यावर गेले काही दिवस झाले नागरिक उष्म्याने हैराण झाले होते. उष्ण्याच्या त्रासाने गडावर पर्यटकांनी पाठ फिरवली होती.

सर्वजण उन्हाच्या झळांमुळे हैराण झाले होते. बुधवारी सकाळपासूनच वातावरणात बदल झाला होता. पाऊसाची सर्वजण प्रतीक्षा करत होते. अचानक सायंकाळी 4 वाजता सोसाट्याच्या वादळी वाऱ्याबरोबरच विजांच्या कडकडाटात एक तास पावसाने जोरदार हजेरी लावली. यात थोडावेळ गारा पण पडल्या. संपूर्ण शहरात पावसाने पाणी पाणी करुन टाकले. दरम्यान दुपारपासुनच विज मंडळाने विद्युत पुरवठा खंडित केला होता. तरीसुद्धा उन्मळून पडलेल्या झाडे व फांद्या विज तारांवर पडल्याने दिर्घकाळ विज गायब झाली होती. पडलेल्या जोरदार पावसामुळे नागरीकांना उष्म्यात थोडा दिलासा मिळाला आहे.

Kolhapur News : पश्चिम महाराष्ट्र जोरदार तापला! कोल्हापुरचा पारा थेट 36 अंशांवर; बाहेर पडाल तर घामाघूम व्हाल

 

 

 

Web Title: After the scorching heat of the summer the rains brought strong batting kolhapur players were left devastated by unseasonal hailstorms

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • kolhapur news
  • Marathi News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Nagpur Crime : चार ट्रकांना एकच नंबर; कर्जाच्या जाळ्यातून वाचण्यासाठी बनावट नंबरप्लेटचा फंडा
1

Nagpur Crime : चार ट्रकांना एकच नंबर; कर्जाच्या जाळ्यातून वाचण्यासाठी बनावट नंबरप्लेटचा फंडा

Jalgaon News: ‘तरुणांच्या जीवाशी खेळ नको!’ फैजपूरमधील दारूचे दुकान बंद करण्याची मागणी
2

Jalgaon News: ‘तरुणांच्या जीवाशी खेळ नको!’ फैजपूरमधील दारूचे दुकान बंद करण्याची मागणी

Nagpur News :चार उमेदवारांचे अर्ज दाखल; शक्तिप्रदर्शनाचा जोर, भाजपची रॅली मात्र रद्द
3

Nagpur News :चार उमेदवारांचे अर्ज दाखल; शक्तिप्रदर्शनाचा जोर, भाजपची रॅली मात्र रद्द

World Cerebral Palsy Day: सेरेब्रल पाल्सी असलेल्या मुलांसाठी ‘या’ 3 थेरपी का महत्त्वाच्या? तज्ञांनी सांगितल्या काही विशेष गोष्टी…
4

World Cerebral Palsy Day: सेरेब्रल पाल्सी असलेल्या मुलांसाठी ‘या’ 3 थेरपी का महत्त्वाच्या? तज्ञांनी सांगितल्या काही विशेष गोष्टी…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.