Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: वाढत्या उष्णतेमुळे जिल्हा होरपळतोय! जिल्हा रुग्णालयात उष्मघात कक्षाची स्थापना

अहिल्यानगर जिल्ह्याला उन्हाचा चांगलाच तडाखा बसताना दिसत आहे. याच पाश्वभूमीवर जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 17, 2026 | 08:16 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:

अहिल्यानगर जिल्ह्यात तापनान ४० अंश सेल्सियसला खेटायला आल्यानंतरच लाहीलाही होऊ लागली असून, हवामान खात्याने दिलेल्या अंदाजाप्रमाणे आकडा वाढल्यास या होईल, या धास्तीने नगरकर हवालदील झाले आहेत. जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. राज्यासह अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या उन्हाचा तडाखा प्रचंड वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील पारा ३९ अंश सेल्सिअसपर्यंत आलेला आहे.

वाढत्या उष्णतेमुळे जिल्ह्याभरातील जनजीवन अक्षरशः होरपळून निघाले आहे. दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. या भीषण उष्णतेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य प्रशासन सतर्क झाले असून, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी जिल्हा रुग्णालयात विशेष उष्माघात कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. गेले काही दिवस झाले सकाळी १० वाजल्यापासूनच उन्हाच्या झळा लागण्यास सुरुवात होते. दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हाची तीव्रता जास्त असते. यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळल्याने शहरातील प्रमुख बाजारपेठा आणि रस्ते ओस पडत आहेत. शेतीकामांवरही याचा मोठा परिणाम झाला असून, मजूर आणि शेतकरी पहाटे किंवा रात्री कामाला प्राधान्य देत आहेत. अनेक भागात रात्री विजेच्या झोतात शेतीचे कामे सुरू असल्याचे चित्र आहे.

Mumbai: ड्रग्ज’ मृत्यू प्रकरणाने मुंबई हादरली! मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी बोलावली तातडीची बैठक; ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाचा इशारा

जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांचे आवाहन

वाढती उष्णता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जिल्ह्यातील जनतेला सतर्कतेचे आवाहन केले आहे. दुपारी उन्हात घराबाहेर न पडणे, जवळ पाण्याची बाटली ठेवणे, डोक्यात टोपी किंवा पांढरा रुमाल घालणे आदी बाबी सांगून प्रत्येकाने आपली स्वतःची, वृद्ध व गरोदर माताची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

तज्ज्ञांचा सल्ला आणि खबरदारीचे उपाय

  • अत्यंत आवश्यक काम नसल्यास दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हात जाणे टाळावे
  • तहान लागली नसली तरी भरपूर पाणी प्यावे.
  • शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी ताक, लिंबू सरबत, नारळ पाणी आदी पेयांचा वापर करावा
  • बाहेर पडताना फिकट रंगाचे, सैल सुती कपडे वापरावेत, डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करावा
  • पचनास जड असलेले किंवा तेलकट पदार्थ खाणे टाळावे
८ जिल्ह्यातील वाढती उष्णता पाहता आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत, उष्माघात कक्षात थंड हवा, पुरेशी औषधे, ओआरएस (ORS) पाकिटे आणि आयव्ही फ्लुइड़ सचा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. तातडीच्या उपचारांसाठी डॉक्टरांचे विशेष पथकही तैनात करण्यात आले आहे, अशी माहिती अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयातील डॉ. श्रीकांत पाठक यांनी दिली.

Web Title: Ahilyanagar heatwave district hospital sets up heatstroke ward amid rising temperatures

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 08:16 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Marathi News

संबंधित बातम्या

National Award: योगेश देशपांडेला मिळाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय पुरस्कार, ‘स्वर्गंधर्व सुधीर फडके’साठी सन्मान
1

National Award: योगेश देशपांडेला मिळाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय पुरस्कार, ‘स्वर्गंधर्व सुधीर फडके’साठी सन्मान

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
2

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
3

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
4

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.