Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गादीसाठीच्या संघर्षात नव्या दावेदारांची एंट्री, Mirzapur The Movie चा ट्रेलर रिलीज; आता थेट थिएटरमध्ये होणार धुमाकूळ!

Mirzapur The Movie : ओटीटीवर तुफान लोकप्रिय ठरलेली 'मिर्झापूर' मालिका आता मोठ्या पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाली आहे. एक्सेल एंटरटेनमेंट आणि अमेझॉन एमजीएम स्टुडिओज निर्मित 'मिर्झापूर: द मूव्ही'चा बहुप्रतीक्षित ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 11, 2026 | 07:04 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ‘मिर्झापूर: द मूव्ही’चा धडाकेबाज ट्रेलर लाँच!
  • कालीन, मुन्ना अन् गुड्डू पंडितचा मोठ्या पडद्यावर
  • या तारखेला होणार रिलीज
Mirzapur The Movie : ‘मिर्झापूर द मूव्ही’च्या पहिल्या झलकच्या प्रतिक्षेत असणाऱ्या चाहत्यांची अखेर प्रतीक्षा संपली आहे. बहुप्रतीक्षित ‘मिर्झापूर: द मूव्ही’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांना ‘मिर्झापूर’च्या ( Mirzapur The Movie ) आयकॉनिक विश्वातील पुढील मोठ्या अध्यायाची पहिली झलक पाहायला मिळाली आहे. भारतातील सर्वात लोकप्रिय स्ट्रीमिंग फ्रँचायझींपैकी एक असलेली ‘मिर्झापूर’ आता मालिकेच्या विश्वातून बाहेर पडून थेट मोठ्या पडद्यावर येत आहे. यावेळी भौकाल अधिक मोठा, विश्व अधिक भव्य आणि संघर्षाचे दांव पूर्वीपेक्षा अधिक उंच असणार आहेत.

Tumbadchi Manjula: तुंबाडची मंजुळामधील गोंधळाला रंगत आणणारी ५ पात्रे

अनेक लोकप्रिय आणि आयकॉनिक पात्रे पुन्हा एकत्र

मिर्झापूरचा किंग, प्रिन्स आणि शेर पुन्हा एकदा परतले असून यावेळी ते आपला भौकाल मोठ्या पडद्यावर दाखवणार आहेत. सीझन १ नंतरची कथा पुढे नेत ‘मिर्झापूर: द मूव्ही’मध्ये फ्रँचायझीतील अनेक लोकप्रिय आणि आयकॉनिक पात्रे पुन्हा एकत्र दिसणार आहेत. त्यात कालीन भैया, मुन्ना भैया आणि गुड्डू पंडित यांचा समावेश आहे. ट्रेलर प्रेक्षकांना लगेचच त्या परिचित जगात परत नेतो, ज्यावर त्यांनी प्रेम केले आहे. फ्रँचायझीची ओळख बनलेली तीव्रता, डार्क ह्यूमर आणि लक्षात राहणारे संवाद कायम ठेवत यावेळी कथानकाचा स्केल अधिक भव्य वाटतो.

कथेत नव्या दावेदारांची एंट्री

या नव्या अध्यायाच्या केंद्रस्थानी पुन्हा एकदा गादीसाठीची लढाई आहे. कथेत नव्या दावेदारांची एंट्री होते आणि ते जुन्या सत्तासंघर्षाला आव्हान देतात. संघर्ष जसजसा वाढत जातो तसतसे ‘मिर्झापूर’चे विश्व पूर्वांचलाच्या पलीकडे विस्तारते आणि प्रेक्षकांना वाळवंटासह अधिक व्यापक आणि नव्या सिनेमॅटिक विश्वात घेऊन जाते.
चित्रपटात अनेक जुनी आणि प्रेक्षकप्रिय पात्रे परत येणार असून काही नवी पात्रेही या विश्वाचा भाग बनणार आहेत. त्यामुळे ‘मिर्झापूर’ फ्रँचायझी आणि तिच्या मोठ्या पडद्यावरील नव्या अध्यायातील नाते अधिक मजबूत होताना दिसते.

हे दिग्गज महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार

चित्रपटात पंकज त्रिपाठी, दिव्येंदू, अली फजल, जितेंद्र कुमार, रवि किशन, अभिषेक बॅनर्जी, रसिका दुग्गल, मोहित मलिक, शीबा चड्ढा, राजेश तैलंग, प्रमोद पाठक, श्रिया पिलगांवकर, हर्षिता शेखर गौर, श्वेता त्रिपाठी, सोनल एस. चौहान, अनंगशा बिस्वास, शाजी चौधरी, सतेंद्र सोनी, कुलभूषण खरबंदा आणि सुशांत सिंह महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत.

अमेझॉन एमजीएम स्टुडिओज आणि एक्सेल एंटरटेनमेंट प्रस्तुत

अमेझॉन एमजीएम स्टुडिओज आणि एक्सेल एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘मिर्झापूर: द मूव्ही’चे दिग्दर्शन गुरमीत सिंह यांनी केले असून कथा पुनीत कृष्णा यांनी लिहिली आहे. चित्रपटाची निर्मिती रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांनी एक्सेल एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली केली आहे, तर कासिम जगमगिया आणि विशाल रामचंदानी हे सहनिर्माते आहेत.

‘मिर्झापूर: द मूव्ही’ ४ सप्टेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी आणि तेलुगू भाषांमध्ये रिलीज होणार असून यंदाच्या सर्वात मोठ्या थिएट्रिकल इव्हेंट्सपैकी एक म्हणून त्याकडे पाहिले जात आहे.

Sukriti kakar Engagement : ‘कर गई चुल्ल’ फेम सुकृति कक्कड़चा साखरपुडा, रोमँटिक अंदाजात बॉयफ्रेंडने केलं प्रपोज

Web Title: Mirzapur movie trailer out release date and star cast

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 07:04 PM

Topics:  

  • amazon prime video
  • Bollywood
  • Hindi Movie
  • Marathi News
  • Mirzapur
  • Pankaj Tripathi
  • Web Series

संबंधित बातम्या

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
1

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
2

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!
3

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!

Inspector Manju Satya Manju Wedding: सत्या-मंजूच्या लग्नसोहळ्याची खास झलक! अंतरपाटावर उमटलं चाहत्यांचं प्रेम
4

Inspector Manju Satya Manju Wedding: सत्या-मंजूच्या लग्नसोहळ्याची खास झलक! अंतरपाटावर उमटलं चाहत्यांचं प्रेम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.