Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: निष्काळजीपणा नाडला आणि डोंगर जाळून खाक झाला! फोन करून देखील अधिकाऱ्यांनी दाखवली पाठ

अहिल्यानगरमध्ये वन विभागाच्या निष्काळजीपणामुळे संपूर्ण डोंगर जाळून खाक झाला आहे. यामुळे केवळ केवळ वृक्षसंपदाच नव्हे, तर दुर्मिळ प्राणी आणि कीटकही जळून खाक झाले आहेत.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 18, 2026 | 08:49 PM
Ahilyanagar News: निष्काळजीपणा नाडला आणि डोंगर जाळून खाक झाला! फोन करून देखील अधिकाऱ्यांनी दाखवली पाठ
Follow Us
Follow Us:

एकीकडे सरकार ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असा नारा देत कोट्यवधी रुपये खर्च करत असताना, दुसरीकडे वन विभागाच्या निष्काळजीपणामुळे कोल्हार आणि परिसरातील हजारो एकर वनक्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे केवळ वृक्षसंपदाच नव्हे, तर दुर्मिळ प्राणी आणि कीटकही जळून खाक झाले आहेत.

कोल्हार (ता. पाथर्डी) परिसरात वन विभागाचे सुमारे २००० एकर क्षेत्र आहे. हे क्षेत्र काही पाथर्डी तालुक्यात तर काही शेजारी असलेल्या नगर तालुक्यात येत आहे. नियमानुसार, उन्हाळा सुरू होण्यापूर्वी जंगलात आग पसरू नये म्हणून ‘जाळ रेषा’ आखणे अनिवार्य असते. मात्र, कोल्हार वन परिक्षेत्रात ही जाळ रेषाच मारली गेली नाही. परिणामी, एका ठिकाणी लागलेली आग वाऱ्याच्या वेगाने संपूर्ण डोंगरपट्टयात पसरली आणि सलग तीन दिवस वनसंपदा धुमसत राहिली. स्थानिक कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिकांनी वेळोवेळी वन विभागाला जाळ रेषा आखण्याबाबत सूचित केले होते. अनेकांनी तशी विनंतीही केली. मात्र, आमच्याकडे निधी नाही, पैसे उपलब्ध नाहीत अशी थातूर-मातूर उत्तरे देऊन अधिकाऱ्यांनी जबाबदारी झटकली.

चीनमध्ये तयार होणारी कार चीनच्याच कंपनीला टक्कर देणार! 751 किमीची रेंज आणि बरंच काही

धक्कादायक बाब म्हणजे दरवर्षी नवीन वृक्षारोपणासाठी खड्डे खोदण्यास निधी मिळतो. रोपांना पाणी घालण्याच्या नावाखाली गैरप्रकार होत असल्याचे आरोप झाले आहेत. मात्र, तीच झाडे आगीपासून वाचवण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी वन विभागाकडे इच्छाशक्तीचा अभाव दिसून येतो.

अधिकाऱ्यांनी द्यावीत प्रश्नांची उत्तरे

या संपूर्ण प्रकाराला जबाबदार कोण? या दुर्घटनेला जबाबदार असणा-या वन कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होणार का? अजूनही काही भागातील जंगल सुरक्षित आहे, तिथे तातडीने जाळ रेषा आखल्या जातील का ? वृक्षारोपणाच्या नावाखाली खर्च होणारा निधी प्रत्यक्ष जमिनीवर का दिसत नाही? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत.

डोळ्यादेखत ऱ्हास पहावा लागला…

जळालेली झाडे आणि मुक्या प्राण्यांना गमवावा लागलेला जीव यामुळे परिसरातील वनप्रेमी नागरिक प्रचंड अस्वस्थ आहेत. ‘आम्ही वन विभागाला फोन करून आगीची माहिती दिली. सलग तीन दिवस एकही कर्मचारी या आगीकडे फिरकला नाही. स्थानिक तरुणांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण पुरेशी साधनसामग्री नसल्याने निसर्गाचा हा ऱ्हास डोळ्यादेखत पहावा लागला’ अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिक व पर्यावरण प्रेमीनी व्यक्त केली.

‘वीजनिर्मिती व पुरवठा सुरळीत राहण्यासाठी AI चा…’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुक्या प्राण्यांचा आक्रोश

या आगीत केवळ झाडेच जळाली नाहीत, तर सरपटणारे शेकडो प्राणी, दुर्मिळ कीटक आणि पक्षांची घरटी जळून खाक झाली आहेत. कोल्हार परिसरातील हा डोंगरपट्टा गेल्या ४-५ वर्षांपासून दरवर्षी आगीच्या विळख्यात सापडत आहे. तरीही वन विभाग नियमावर बोट ठेवून गप्प बसण्याचे काम करत आहे.

डोंगर हिरवागार करण्याची मागणी

वन विभागाच्या बोगस कारभारामुळे सामान्य जनतेत मोठा रोष आहे. वरिष्ठानी या प्रकरणाची सखोल चौकशी करून कोल्हारचा डोंगर पुन्हा हिरवागार करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.

Web Title: Ahilyanagar kolhar hill fire forest department negligence pathardi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 08:49 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Fire News
  • Pathardi

संबंधित बातम्या

Farmers News : शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट; मका-तुरीची विक्रमी पेरणी, मात्र पावसाची दांडी ठरतेय चिंतेचे कारण!
1

Farmers News : शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट; मका-तुरीची विक्रमी पेरणी, मात्र पावसाची दांडी ठरतेय चिंतेचे कारण!

AHILYANAGAR : विद्यार्थी आंदोलन दडपण्यासाठी सरकारकडून दडपशाही, किरण काळेंचा गंभीर आरोप
2

AHILYANAGAR : विद्यार्थी आंदोलन दडपण्यासाठी सरकारकडून दडपशाही, किरण काळेंचा गंभीर आरोप

Ahilyanagar News: श्रीरामपूरमध्ये शेतकरी संघटनेचा मोठा विजय; आंदोलनाचा खटला अखेर मागे
3

Ahilyanagar News: श्रीरामपूरमध्ये शेतकरी संघटनेचा मोठा विजय; आंदोलनाचा खटला अखेर मागे

Canada Wildfires : कॅनडामध्ये 850 ठिकाणी आगीने घातले थैमान; हजारो घरे जळून खाक; विषारी धूर थेट अमेरिकेपर्यंत पोहोचला
4

Canada Wildfires : कॅनडामध्ये 850 ठिकाणी आगीने घातले थैमान; हजारो घरे जळून खाक; विषारी धूर थेट अमेरिकेपर्यंत पोहोचला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.