Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: माळीवाडा वेशीचा मुद्दा चिघळण्याची शक्यता; सत्ताधाऱ्यांच्या पत्राला विरोधकांचा आरोप

अहिल्यानगर शहरातील माळीवाडा वेस पाडण्याच्या निर्णयाविरोधात अनेक इतिहासप्रेमी नागरिक आणि खासदार निलेश लंके यांनी विरोध केला होता.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 30, 2026 | 06:41 PM
माळीवाडा वेशीचा मुद्दा चिघळण्याची शक्यता; सत्ताधाऱ्यांच्या पत्राला विरोधकांचा आरोप

माळीवाडा वेशीचा मुद्दा चिघळण्याची शक्यता; सत्ताधाऱ्यांच्या पत्राला विरोधकांचा आरोप

Follow Us
Follow Us:
  • अहिल्यानगर शहरातील माळीवाडा वेस म्हणजे ऐतिहासिक वारसा
  • वेस पडण्याच्या निर्णयाला इतिहास प्रेमींचा विरोध
  • वाद चिघळण्याची शक्यता
अहिल्यानगर माळीवाडा वेस पाडण्याच्या मुद्दा आता चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खासदार निलेश लंके यांच्यासह इतिहासप्रेमी नागरिक, काही संस्था व महापालिकेतील विरोधी नगरसेवकांनी ही वेस पाडण्यास विरोध दर्शविला असताना महापालिकेतील सर्व सत्ताधारी नगरसेवकांनी वेस पाडण्याबाबत पत्र दिले आहे. महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभारण्याठी जागा अपुरी पडत असल्याने ही वेस पाडण्याची मागणी फुले दाम्पत्य स्मारक समितीने सर्वप्रथम केली. तसे पत्र महापालिकेला देण्यात आले. तेंव्हापासून हा विषय ऐरणीवर आला.

‘या’ कारने TATA Sierra ला दिली धोबी पछाड! क्रॅश टेस्टमध्ये मिळवली 5 स्टार सेफ्टी रेटिंग; ग्राहकांच्या केसाला सुद्धा धक्का लागणार न

सुमारे चारशे वर्षापूर्वीची वास्तू म्हणून ही माळीवाडा वेस ऐतिहासिक ठेवा आहे, असे सांगत ही वेस पाडण्यास विरोध करण्यात आला आहे. मात्र या वेशीला मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाचा विळखा आहे. शिवाय वेस जुनाट आणि पडायला झाली असल्याने भविष्यात तो धोका होऊ शकतो. याला पर्याय म्हणजे वेस पाडणे नव्हे, असे इतिहासप्रेमींचे म्हणणे आहे. काही संस्थांनी या वादात उडी घेत आपले इतिहासप्रेम आक्रमकतेने मांडले आहे. तसेच शिवसेनेच्या नगरसेवकांनीही वेस पाडण्यास विरोध केला आहे. तसेच पुरातत्त्व खात्यास पत्र देऊन ही वेस वाचविण्याचे साकडे घातले होते. पुरातत्त्व खात्याने या संदर्भात पत्र देत ही इतिहासाचा ठेवा असून, तो जतन करण्याचे सांगितले आहे.

एकीकडे हे सुरू असतानाच दुसरीकडे महापालिकेतील सत्तारूढ राष्ट्रवादी, भाजप व त्यांना पाठिंबा देणाऱ्या नगरसेवकांनी महापौर ज्योती गाडे यांना पत्र देत ही वेस पाडण्यास सहमती दर्शविली आहे. फुले दाम्पत्याचे स्मारक उभारतानाच तेथे विद्यतू रोषणाई, सुशोभीकरण करावे, संपूर्ण जागेला संरक्षक भिंत उभारावी, अशी मागणी केली आहे. तसेच या विषयासाठी स्वतंत्र विशेष महासभा घेण्याची मागणीही करण्यात आली आहे. हे पत्र देताच शिवसेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम यांनी नगरसेवकांनी दिलेले पत्र रद्द करण्याची मागणी करणारे पत्र दिले आहे.

गाडी चालवताना ‘ही’ 5 कामं अजिबात करू नका! अन्यथा पोलीस मामा स्वतःच करतील तुमचं Driving License सस्पेंड

कदम यांचे आयुक्तांना पत्र

शिवसेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम यांनी पत्रात म्हटले आहे, की माळीवाडा वेस ४०० वर्षांपूर्वीची ऐतिहासिक वास्तू असून, तिचे जतन करण्याचे पत्र पुरातत्त्व विभागाने दिले आहे. तसेच १० नोव्हेंबर २०१० मध्ये वेस पाडण्यास जिल्हा न्यायालयाने मनाई हुकूम दिला आहे. काही नगरसेवकांनी वेस पाडण्याबाबत पत्र दिले आहे. तसे घडल्यास आम्ही कायद्यानुसार गुन्हे दाखल करू.

 

Web Title: Ahilyanagar maliwada gate controversy ruling party letter opposition allegations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 06:41 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Marathi News

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही
2

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा
3

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा
4

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.