
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
रक्षाबंधनाच्या काळात राख्यांची मागणीही झपाट्याने वाढत आहे. डिझायनर, कार्टून आणि लहान मुलांच्या राख्या विशेषतः लोकप्रिय आहेत. मात्र, या व्यवसायासाठी मोठ्या यंत्रसामग्रीची किंवा दुकानाची आवश्यकता नसते. त्यामुळे, तुम्ही अगदी कमी खर्चातही हा व्यवसाय सुरू करू शकता.
राखी बनवण्यासाठी रेशीम धागा, मोती, मणी, खडे, कुंदन, रिबन, गोंद आणि पॅकेजिंग साहित्य लागते. कच्चा माल अंदाजे ₹5,000-₹6,000 मध्ये खरेदी करता येतो. कात्री, ग्लू गन, सुया, धागा आणि इतर लहान वस्तूंसाठी अंदाजे ₹1,000-₹2,000 खर्च येऊ शकतो. उरलेली रक्कम पॅकेजिंग, वाहतूक आणि इतर लहान खर्चांसाठी वापरता येते. पण सुरुवातीला मशीनशिवाय घरी हाताने राख्या बनवता येतात. यामध्ये तुमच्या विचारांनी थोडी कल्पकता वापरली तर वेगळ्या आणि सुंदर डिझाईन बाजारात आल्या तर ते ग्राहकांचं लक्ष्य वेधून घेऊ शकतात. त्यामुळे तुमचा वेगळा असा ट्रेन्ड बनेल.
तुम्ही फक्त साध्या धाग्याच्या राख्या बनवण्याऐवजी, वेगवेगळ्या डिझाइनच्या राख्या बनवल्यास, तुम्ही अधिक ग्राहकांना आकर्षित करू शकता.
लहान प्रमाणात सुरुवात करा आणि बाजारातील मागणी समजून घ्या.
कच्चा माल मोठ्या प्रमाणात खरेदी करून खर्च कमी करण्याचा प्रयत्न करा.
डिझाइन आणि पॅकेजिंग आकर्षक बनवा.
एकाच प्रकारची राखी बनवण्याऐवजी, विविध प्रकारच्या राख्या तयार करा.
विक्री करण्यापूर्वी सर्व खर्चाचा हिशोब करा आणि मग किंमत ठरवा.
Income Tax Notice Reasons : वेळेत ITR भरूनही Income Tax ची नोटीस? या’ चुका पडू शकतात महागात