Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: अशा घटना घडतातच कशा? सहावीत शिकणाऱ्या मुलीवर ॲसिड हल्ला! ग्रामस्थ संतापले, कठोर कारवाईची मागणी

संगमनेर मधील वडगावपान येथील एका विद्यालयातील सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला झाला. या धकाकदायक घटनेमुळे ग्रामस्थ संतापले आहेत. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 19, 2026 | 08:51 PM
Ahilyanagar News: अशा घटना घडतातच कशा? सहावीत शिकणाऱ्या मुलीवर ॲसिड हल्ला! ग्रामस्थ संतापले, कठोर कारवाईची मागणी
Follow Us
Follow Us:
  • वडगावपान येथील सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला
  • ग्रामस्थ संतापले, कठोर कारवाईची मागणी
  • विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण
वडगावपान (ता. संगमनेर) येथील एका विद्यालयातील सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला करण्यात आल्याने आज संगमनेर तालुक्यासह जिल्ह्यात संताप व्यक्त होत आहे. घटनेच्या निषेधार्थ कोल्हार-घोटी राज्य महामार्गावरील वडगाव पान फाट्यावर सुमारे एक तास सर्वपक्षीय रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

आंदोलना दरम्यान ‘न्याय द्या न्याय द्या, आमच्या मुलीला न्याय द्या’ ‘ॲसिड हल्ला करणाऱ्याला फाशीची शिक्षा द्या’ अशा घोषणांनी परिसर दाणाणला होता. घटनेला २४ तास उलटूनही आरोपी मोकाट आहे. पोलिसांनी तत्काळ त्याला पकडून त्याच्यावर कठोरातील कठोर कारवाई करत फाशीची शिक्षा द्यावी, अशी एकमुखी मागणी रस्त्यावर उतरलेल्या महिला, शाळकरी मुली व सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी केली आहे. ॲसिड हल्ला करणाऱ्याचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी दहा पोलिस पथके रवाना केली आहेत. घटनास्थळाजवळ सीसीटीव्ही फुटेज नसल्यामुळे तपास कामात अडथळे येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. सुमारे एक तास रास्ता रोको आंदोलन सुरू असल्यामुळे लोणी व तळेगावच्या दिशेने येणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आंदोलन कर्त्यांच्या वतीने दिलेले निवेदन संगमनेर तालुक्याचे पोलिस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांनी स्वीकारले.

पलूसमध्ये शिक्षण संस्थेच्या संचालकाचा निर्घृण खून; अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह

उपचाराचा खर्च एसएमबीटी करणार

ॲसिड हल्ल्याचा ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी आ. डॉ. सुधीर तांबे, आ. सत्यजित तांबे आदींनी निषेध केला आहे. घटनेनंतर युवा नेत्या डॉ. जयश्रीताई थोरात व डॉ. तांबे यांनी प्रवरा हॉस्पिटलमध्ये जात मुलीची चौकशी केली. मुलीवरील उपचाराचा सर्व खर्च एसएमबीटी संस्था करणार असून त्या संदर्भात डॉ. जयश्रीताई थोरात यांनी मुंबई येथील वैद्यकीय तज्ज्ञांशी संपर्क केला आहे.

आम्हालाही आता भिती वाटत आहे…

आमच्याच मैत्रिणीवर एका विकृताने ॲसिड हल्ला केला आहे. या घटनेमुळे आता आम्हालाही शाळेत जाण्याची भीती वाटत आहे, अशी प्रतिक्रिया आंदोलनात सहभागी झालेल्या शाळकरी विद्यार्थिनींनी दिली.

Nashik Crime: आधी माझी प्रेयसी हो नाही तर…; तंत्र मंत्राने गंडा घालून महिलेसोबत नको ते केल! ए टू झेड स्टोरी जशीच्या तशी

ग्रामपंचायतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत

ॲसिड हल्ल्याची माहिती आ. अमोल खताळ यांना समजताच त्यांनी विधानसभा अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला. आरोपीवर कठोर कारवाई करतानाच जखमी मुलगी आणि तिच्या कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत देण्याची मागणी त्यांनी केली आहे. ग्रामीण भागात मुली आणि महिलांच्या सुरक्षेसाठी ग्रामपंचायतींनी महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, असे आवाहन नीलम खताळ यांनी केले आहे.

ग्रामीण भागातही मुलींसाठी रक्षक दल

संगमनेरच्या नगराध्यक्षा डॉ. मैथिलीताई तांबे म्हणाल्या, संगमनेर शहरात महिलांच्या व मुलींच्या सुरक्षिततेसाठी रक्षक दल निर्माण केले आहे. तसेच ग्रामीण भागातही रक्षक दल निर्माण करावे लागतील.

Web Title: Ahilyanagar news acid attack on class 6 girl in sangamner villagers demand strict action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 08:51 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Marathi News

संबंधित बातम्या

FSSAI Action On Pan Masala : पान मसाला खाणाऱ्यांना मोठा झटका! FSSAI कडून ‘या’ गोष्टीवर बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई
1

FSSAI Action On Pan Masala : पान मसाला खाणाऱ्यांना मोठा झटका! FSSAI कडून ‘या’ गोष्टीवर बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई

गादीसाठीच्या संघर्षात नव्या दावेदारांची एंट्री, Mirzapur The Movie चा ट्रेलर रिलीज; आता थेट थिएटरमध्ये होणार धुमाकूळ!
2

गादीसाठीच्या संघर्षात नव्या दावेदारांची एंट्री, Mirzapur The Movie चा ट्रेलर रिलीज; आता थेट थिएटरमध्ये होणार धुमाकूळ!

Plastic Currency : प्लास्टिकच्या 1 अब्ज नोटा बनणार… RBI चा मोठा निर्णय, 10 आणि 20 रुपयांच्या ट्रायल करंन्सीला मंजुरी
3

Plastic Currency : प्लास्टिकच्या 1 अब्ज नोटा बनणार… RBI चा मोठा निर्णय, 10 आणि 20 रुपयांच्या ट्रायल करंन्सीला मंजुरी

Tumbadchi Manjula: तुंबाडची मंजुळामधील गोंधळाला रंगत आणणारी ५ पात्रे
4

Tumbadchi Manjula: तुंबाडची मंजुळामधील गोंधळाला रंगत आणणारी ५ पात्रे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.