Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याला कवडीमोल भाव! हलक्या कापसाने बळीराजाचे टेन्शन वाढवले

काबाडकष्ट करून पिकवलेल्या कापसाला बाजारात कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 01, 2025 | 07:02 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Close
Follow Us:

शेवगाव तालुक्याच्या दक्षिण भागातील ढोरजळगांव, मलकापूर, आखतवाडे, आपेगांव, आव्हाने, माळेगाव, गरडवाडी, भातकुडगांव, परिसरात शेतकऱ्यांनी यावर्षी कपाशी पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. परंतु, निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि झालेल्या अतिवृष्टीमुळे या भागातील कपाशी पिके लावलेल्या शेतात मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साचून पुर्णपणे वाया गेली आहेत. तसेच जे काही थोड्या प्रमाणात राहिलेल्या कपाशी पिकावर लाल्या रोग, बोंडे सडणे, पाते गळ, पीक उन्मळून पडणे, पिकांची वाढ खुंटने, फकडी पडणे व्यासह आदी रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने यंदा कापसाच्या उत्पन्नात कमालीची घट होण्याची शक्यता आहे.

सध्या स्थितीत व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांनी पिकविलेल्या या पांढऱ्या सोन्याची खरेदी तुटपुंज्या व कवडीमोल दरात केली जात आहे. परिणामी शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे. कापसाला चांगला भाव नसल्याने या भागातील शेतकरी हवालदिल झाला असून किमान कापसाला यंदा दहा ते पंधरा हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळायला हवा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Nanded News: भ्रष्टाचार थांबता थांबेना! केवळ कागदोपत्री कामे दाखवत सरपंच आणि ग्रामसेवकाने गिळले १५ लाख रुपये

शेतकऱ्यांनी कष्ट करून कपाशीचे पीक जगविले

शेतकऱ्यांनी मोठे कष्ट करून आणि घाम गाळून कपाशीचे पीक जगविले मात्र आता शेतकऱ्याऱ्यांना कापसाचा योग्य तो मोबदला मिळत नसल्याने जो भाव येईल त्या भावाने शेतकरी कापसाची विक्री करताना दिसत आहे. दरवर्षी कापसाचा श्री गणेशा दसऱ्याला व्यापाऱ्यांकडून केला जातो. त्यामुळे दसरा, दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर काही शेतकऱ्यानी कापूस काढून विकायला सुरुवात केली. कापूस खरेदी केंद्र सुरू होण्याची वाट न बघता थेट व्यापाऱ्यांना कापूस हा कवडीमोल भावात विकावा लागत आहे. कापसाला साधारण १० हजार पासून ते १५ हजार रुपयेच्या प्रति क्विंटल दर मिळणे अपेक्षित आहे. मात्र खाजगी व्यवसायीक चांगल्या दर्जाचा कापूसही ६००० ते ७००० रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी केला जात आहे.

Sharad Pawar at Satyacha Morcha: लोकशाही वाचवायची असेल तर..; मुंबईतील सत्याच्या मोर्चातून शरद पवारांचा एल्गार

शासकीय कापूस खरेदी करण्याची शेतकऱ्यांची मागणी!

परतीच्या पावसाने कापूस अगोदरच खराब झालेला असून जो काही राहिलेला कापूस आहे तो पण शेतकऱ्यांनी सर्व कापूस व्यापाऱ्यांना विकल्यावर शासकीय कापूस खरेदी सुरु होणार का असा प्रश्न कापूस उत्पादक शेतकरी संभाजी फसले यांच्यासह अनेक शेतकऱ्यांना पडला आहे.

Web Title: Ahilyanagar news cotton rates decrease farmers getting 5 to 6 thousand rupees for cotton

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2025 | 06:56 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Farmers
  • maharashtra news

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: अन्यथा वाळूचे डंपर पेटवून देऊ! नगर-कल्याण महामार्गावर तीन तास आंदोलन
1

Ahilyanagar News: अन्यथा वाळूचे डंपर पेटवून देऊ! नगर-कल्याण महामार्गावर तीन तास आंदोलन

Ahilyanagar News: उंबरे परिसरात रिक्षा-मिनीबसचा अपघात! 3 जणांचा जागीच मृत्यू
2

Ahilyanagar News: उंबरे परिसरात रिक्षा-मिनीबसचा अपघात! 3 जणांचा जागीच मृत्यू

“… हा गैरसमज दूर होतोय”; Chiplun मधील कृषीप्रदर्शनाला मिळतोय उदंड प्रतिसाद
3

“… हा गैरसमज दूर होतोय”; Chiplun मधील कृषीप्रदर्शनाला मिळतोय उदंड प्रतिसाद

Ratnagiri News: मनुष्यबळाची कमतरता; मात्र भातशेतीची ओढ कायम
4

Ratnagiri News: मनुष्यबळाची कमतरता; मात्र भातशेतीची ओढ कायम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.