लोकशाही वाचवायची असेल तर..; मुंबईतील सत्याच्या मोर्चातून शरद पवारांचा एल्गार
“आजचा मोर्चा हा संयुक्त महाराष्ट्र लढ्याची आठवण करून देणारा आहे. त्या काळात काळा घोडा परिसरात मोठे आंदोलन झाले होते. आज तुम्ही दाखवलेली एकजूट त्याच काळातील ऐक्याची आठवण करून देते,” असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. “विधानसभा निवडणुकीनंतर घडलेल्या घटनांनी संसदीय लोकशाहीला धक्का बसल्याचे दिसले. उत्तमराव जानकर यांनी सत्तेचा गैरवापर कसा होतो हे स्पष्टपणे सांगितले. राजकीय मतभेद असू शकतात, पण आता ते बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र यायला हवे. लोकशाहीत नागरिकांचा मताचा अधिकार जपणे हे आपले कर्तव्य आहे.” असही त्यांनी स्पष्ट केलं.
“अनेक ठिकाणी बनावट आधारकार्ड तयार केल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. जेव्हा आम्ही पुरावे दाखवायला सांगितले, तेव्हा ज्यांनी हा प्रकार उघड केला, त्यांच्याविरुद्धच गुन्हा दाखल करण्यात आला,” अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. “जे पुरावे सादर करतात, त्यांच्यावरच कारवाई केली जाते, हे लोकशाहीसाठी धोकादायक आहे. आज आपल्याला ठाम निर्णय घ्यायचा आहे. मतभेद असले तरी लोकशाही टिकवण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे “सध्या जी मतचोरी सुरू आहे, ती थांबवली पाहिजे. विचारधारा वेगळी असली तरी लोकशाहीसाठी सगळ्यांनी एक होण्याची वेळ आली आहे.” असंही शरद पवार यांनी नमुद केलं.
Uddhav Thackeray Attacks On BJP: मतदार यादीतून नाव हटवण्याचा प्रयत्न?; उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दुबार मतदारांच्या प्रकरणावर तीव्र शब्दांत चिंता व्यक्त केली आणि मतदार यादीतील अयोग्य नोंदी हटवण्याची मागणी केली. “सगळेच बोलत आहेत — आम्ही बोलतोय, भाजपचे लोक बोलतायत, अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील लोकही बोलतायत. मग निवडणुका घ्यायची घाई का?” मतदार याद्या स्वच्छ आणि पारदर्शक केल्याशिवाय कोणतेही यश-अपयश स्पष्ट होणार नाही. यावेळी राज ठाकरे यांनी सभेत दुबार मतदारांचे पुरावेदेखील सादर केले. “आज मी इकडे पुरावा घेऊन आलो आहे. दुबार मतदारांची याद्या आणि त्यांची कागदपत्रे येथे आहेत,” असे ते म्हणाले. आता जेव्हा कधी निवडणुका होतील, तेव्हा याद्यांवर काम करावे आणि प्रत्येक चेहरा समाजाला दाखवावा. “दुबार-तिबार ज्या ठिकाणी आले आहेत, तिथेच त्यांना ओळखा, फोडून काढा आणि नंतर पोलिसांच्या ताब्यात द्या,” अशी सूचना ठाकरे यांनी केली.






