Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सातबारा कोरा करा’; रविकांत तुपकरांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाबाहेर शेतकऱ्यांचे आंदोलन, झाडावर चढून कार्यकर्त्यांचा अनोखा विरोध

सरसकट शेतकरी कर्जमाफी आणि 'सातबारा कोरा करा' या मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली विधानभवन परिसरात आक्रमक आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान काही कार्यकर्ते झाडावर चढले, तर परिसरात कापूस फेकून सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांनी रविकांत तुपकरांसह आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 09, 2026 | 01:08 PM
'सातबारा कोरा करा'; रविकांत तुपकरांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाबाहेर शेतकऱ्यांचे आक्रमक आंदोलन, झाडावर चढून कार्यकर्त्यांचा अनोखा विरोध

'सातबारा कोरा करा'; रविकांत तुपकरांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाबाहेर शेतकऱ्यांचे आक्रमक आंदोलन, झाडावर चढून कार्यकर्त्यांचा अनोखा विरोध

Follow Us
Follow Us:
  • विधानभवनाबाहेर रविकांत तुपकरांचे आंदोलन
  • झाडावर चढून कार्यकर्त्यांचा अनोखा विरोध
  • पोलिसांनी घेतले ताब्यात
Farmer Loan Waiver Protest : महाराष्ट्र विधानभवन परिसरात आज (9 जुलै 2026) शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी आक्रमक आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान काही कार्यकर्त्यांनी झाडांवर चढत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. या प्रकारामुळे विधानभवन परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असून आंदोलकांना खाली उतरवण्यासाठी प्रशासन आणि पोलिसांची मोठी कसरत करावी लागली.

झाडावर चढून अनोखे आंदोलन

क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालय आणि विधानभवन परिसरात झाडांवर चढून आंदोलन सुरू केले. काही आंदोलकांनी हातात फासाची दोरी घेतल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली. झाडांवरून खाली उतरण्यास आंदोलकांनी सुरुवातीला नकार दिल्याने प्रशासनाची धावपळ उडाली. अखेर पोलिसांनी समजूत काढून त्यांना सुरक्षितपणे खाली उतरवले.

बळीराजा सुखावणार… राज्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी …

‘सरसकट कर्जमाफी करा, सातबारा कोरा करा’ची मागणी

या आंदोलनामागील प्रमुख मागणी म्हणजे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी आणि ‘सातबारा कोरा करा’ ही होती. आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

विधानभवन परिसरात कापूस फेकून निषेध

आंदोलन अधिक तीव्र करत कार्यकर्त्यांनी विधानभवन परिसरात कापूस फेकून सरकारच्या कृषी धोरणांविरोधात निषेध नोंदवला. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य भाव, कर्जमाफी आणि आर्थिक दिलासा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

रविकांत तुपकरांसह आंदोलनकर्ते पोलिसांच्या ताब्यात

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला. त्यानंतर शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि आंदोलनात सहभागी झालेल्या अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईनंतर विधानभवन परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारने निर्णय घ्यावा

आंदोलकांचे म्हणणे आहे की, राज्यातील शेतकरी आर्थिक संकटातून जात असून वाढते कर्ज, उत्पादन खर्च आणि नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक शेतकरी अडचणीत आहेत. त्यामुळे सरकारने तातडीने सरसकट कर्जमाफीचा निर्णय घ्यावा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली. दरम्यान, या आंदोलनामुळे विधानभवन परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत कायदा व सुव्यवस्था कायम ठेवली असून पुढील कारवाई सुरू आहे.

बळीराजा सुखावणार… राज्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी …

Web Title: Ravikant tupkar farmer loan waiver protest vidhan bhavan mumbai news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 01:08 PM

Topics:  

  • Farmers
  • maharashtra
  • Ravikant Tupkar

संबंधित बातम्या

अवघ्या 20 महिन्यांत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला गळती; 2 कोटींच्या कामावर प्रश्नचिन्ह
1

अवघ्या 20 महिन्यांत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला गळती; 2 कोटींच्या कामावर प्रश्नचिन्ह

Pratap Sarnaik : महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; टॅक्सी, रिक्षा, बस चालकांना व्यवहारिक मराठीचे ज्ञान आवश्यक
2

Pratap Sarnaik : महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; टॅक्सी, रिक्षा, बस चालकांना व्यवहारिक मराठीचे ज्ञान आवश्यक

Ratnagiri Heavy Rain : खेड शहरावर पुन्हा पुराचे सावट; जगबुडी नदी ७.७० मीटरवर, बाजारपेठेत पाणी शिरले
3

Ratnagiri Heavy Rain : खेड शहरावर पुन्हा पुराचे सावट; जगबुडी नदी ७.७० मीटरवर, बाजारपेठेत पाणी शिरले

Satara Heavy Rain : १६ गावांचा संपर्क तुटला, दरडी, पूल खचले,नेटवर्क बंद…; साताऱ्यात मुसळधार पावसाचा कहर
4

Satara Heavy Rain : १६ गावांचा संपर्क तुटला, दरडी, पूल खचले,नेटवर्क बंद…; साताऱ्यात मुसळधार पावसाचा कहर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.