Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: “समितीचा अहवाल आल्यानंतर…” कृषिमंत्र्यांचे कर्जमाफीबाबत महत्वाचे विधान

कोपरगाव येथे आयोजित कर्मवीर कृषी महोत्सव २०२५ कार्यक्रमात राज्याचे कृषिमंत्री दतात्रेय भरणे यांनी कर्जमाफीबाबत महत्वाचे विधान केले आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 08, 2025 | 05:08 PM
"समितीचा अहवाल आल्यानंतर..." कृषिमंत्र्यांचे कर्जमाफीबाबत महत्वाचे विधान

"समितीचा अहवाल आल्यानंतर..." कृषिमंत्र्यांचे कर्जमाफीबाबत महत्वाचे विधान

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘कर्मवीर कृषी महोत्सव २०२५’चे उद्घाटन मंत्री भरणे यांच्या हस्ते
  • कृषिमंत्री दतात्रेय भरणे यांचे कर्जमाफीबाबत महत्वाचे विधान

अहिल्यानगर मधील कोपरगाव परिसरात कधी दुष्काळ, कधी गारपीट तर कधी बाजारभाव पडण्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न अस्थिर राहते. कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकारात्मक भूमिका घेत आहेत. समितीचा अहवाल एप्रिलमध्ये आल्यानंतर सहकारी बँकांचे आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी, म्हणजे जूनपर्यंत कर्जमाफीचा निर्णय होईल, असा विश्वास कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी व्यक्त केला.

कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या १३व्या पुण्यस्मरणानिमित्त कोळपेवाडी (ता. कोपरगाव) येथे कर्मवीर काळे सहकारी साखर कारखाना आणि मित्रमंडळातर्फे आयोजित ‘कर्मवीर कृषी महोत्सव २०२५’चे उद्घाटन मंत्री भरणे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी माजी आमदार अशोकराव काळे होते.

मंत्री भरणे म्हणाले की, अधिक उत्पादनासाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञान आत्मसात करणे अत्यावश्यक आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिकचा न्याय देण्याचा प्रयत्न सुरू आहे.

‘भारताच्या विकासाचे प्रतीक…’, ‘या’ 4 मार्गांवर धावणार नवी Vande Bharat Express, पीएम मोदींनी दाखवला हिरवा झेंडा

आमदार आशुतोष काळे म्हणाले की बारामती, मोशी आणि नाशिक येथे होत असलेल्या मोठ्या कृषी प्रदर्शने सर्व शेतकऱ्यांना पाहणे शक्य नसते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागणीवरून ‘कर्मवीर कृषी महोत्सव २०२५’ आयोजित केला आहे. एआय तंत्रज्ञानाचा वापर ऊस शेती, दुग्धव्यवसाय आणि इतर कृषी क्षेत्रात वाढवून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधणे हा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

BJP New President News: भाजपला कधी मिळणार राष्ट्रीय अध्यक्ष? राजनाथ सिंहांनी स्पष्टच सांगितलं

पुढील वर्षीचे कृषी प्रदर्शन कोपरगावला

कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक कानडे, द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलासराव भोसले, कारभारी आगवन, प्रवीण शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार आशुतोष काळे यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेत महोत्सवाचे उत्कृष्ट नियोजन केल्याचे मंत्री भरणे यांनी गौरविले. पुढील वर्षी अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत कृषी प्रदर्शन कोपरगाव येथेच होईल, अशी घोषणा त्यांनी केली.

शेतकऱ्यांसाठी हक्काचे व्यासपीठ

कर्मवीर शंकरराव काळे कारखाना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर देऊन सहकार्य करत असल्याचे आ. काळे म्हणाले. दुग्धव्यवसायाकडे वळलेल्या शेतकऱ्यांसाठी तालुक्यात स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरू असून लवकरच सकारात्मक बातमी दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

“निधी मिळवण्यात मी त्यांचाच आदर्श घेतो”

२०१९ मध्ये निवडून आल्यानंतर मतदारसंघाच्या विकासासाठी तीन हजार कोटींपेक्षा जास्त निधी आणता आला. यामागे कृषिमंत्री भरणे यांची प्रेरणा असल्याचे आ. कालेंनी नमूद केले. राज्यात सर्वाधिक सव्वासहा हजार कोटींचा निधी आणण्याचा विक्रम भरणे यांनी केला असून त्यांचाच आदर्श आपण घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Ahilyanagar news dattatray bharne on farmer loan in krishi mahotsav 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2025 | 05:08 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Dattatray Bharne
  • Marathi News

संबंधित बातम्या

Amravati : भाजपने निवडणुकीचे रणशिंग फुंकले ; Chandrashekhar Bawankule यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
1

Amravati : भाजपने निवडणुकीचे रणशिंग फुंकले ; Chandrashekhar Bawankule यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

शाळेच्या भिंतीवर पाठ्यपुस्तकातील धडे! अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ शाळेचा प्रेरणादायी उपक्रम
2

शाळेच्या भिंतीवर पाठ्यपुस्तकातील धडे! अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ शाळेचा प्रेरणादायी उपक्रम

Navi Mumbai : ऐरोलीकरांना अनुभवता येणार रंगभूमीचे जग! नाट्यगृहाच्या बांधकामाची अभिनेते प्रशांत दामलेंकडून पाहणी
3

Navi Mumbai : ऐरोलीकरांना अनुभवता येणार रंगभूमीचे जग! नाट्यगृहाच्या बांधकामाची अभिनेते प्रशांत दामलेंकडून पाहणी

Navi Mumbai : नवी मुंबईत विकासकाशिवाय स्वयं पुनर्विकास शक्य ;आमदार प्रविण दरेकरांचे प्रतिपादन
4

Navi Mumbai : नवी मुंबईत विकासकाशिवाय स्वयं पुनर्विकास शक्य ;आमदार प्रविण दरेकरांचे प्रतिपादन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.