Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: अन्यथा अधिकाऱ्यांवर कारवाई नक्की! आढावा बैठकीत आमदार खताळांनी अधिकाऱ्याचे कान टोचले

जलजीवन मिशन योजनेची कामे सुरु असतानाच अधिकारी कागदोपत्री कामे पूर्ण झाल्याचे सांगत आहे. यावरूनच आमदार अमोल खताळ यांनी पंचायत समितीच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना धारेवर धरले आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 04, 2026 | 06:25 PM
आढावा बैठकीत आमदार खताळांनी अधिकाऱ्याचे कान टोचले

आढावा बैठकीत आमदार खताळांनी अधिकाऱ्याचे कान टोचले

Follow Us
Close
Follow Us:
  • पंचायत समितीची आढावा बैठक
  • आमदार अमोल खताळांनी अधिकाऱ्यांना झापले
  • आढावा बैठकीला पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
संगमनेर तालुक्यात नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून जलजीवन मिशन योजना राबवली जात आहे. मात्र, प्रत्यक्षात कामे अपूर्ण असतानाही कागदोपत्री योजना पूर्ण झाल्याचे दाखवले जात असल्याचा गंभीर आरोप आमदार अमोल खताळ यांनी केला आहे. पंचायत समिती सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडेबोल सुनावत, महिन्याभरात कामांमध्ये सुधारणा न झाल्यास कठोर कारवाईचा इशारा दिला.

Ahilyanagar News: जादूटोणाच्या नावाखाली लाखो रुपयांचा गंडा! पोटे पती-पत्नीवर गुन्हा दाखल

आमदार खताळ म्हणाले की, ग्रामीण भागातील नागरिक एखाद्या विषयावर चार-पाच वेळा तक्रारी करत असतील तर त्या तक्रारींमध्ये नक्कीच तथ्य असते. अशा वेळी तातडीने सुधारणा करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. कामे दर्जेदार झाली तर तक्रारी आपोआप कमी होतील. त्यामुळे प्रत्येक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांना विश्वासात घेऊन सौजन्याने व संवेदनशीलतेने वागावे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.

जलजीवन मिशन आणि घरकुल योजना या अतिशय संवेदनशील योजना असून, काम सुरू असलेल्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी स्वतः प्रत्यक्ष पाहणी करून त्रुटी तात्काळ दूर कराव्यात, असेही आ. खताळ यांनी सांगितले.

Ratnagiri News : मुंबई गोवा महामार्गावर होतोय मृत्यूचा सापळा; वाढत असलेल्या अपघातांना जबाबदार कोण?

विविध विभागांचा आढावा सादर

या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता हेमंत चव्हाण, आरोग्य विभागाचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घोलप, गटशिक्षण अधिकारी बाळासाहेब गुंड, घरकुल विभागाच्या भाग्यश्री शेळके, ग्रामपाणीपुरवठा विभागाचे प्रदीप संवत्सरकर, उमेदचे ब्लॉक मॅनेजर निलेश कोकाटे, बालविकास प्रकल्प अधिकारी निलेश राऊत, कृषी विभागाचे वाळीबा उघडे, स्वच्छता विभागाचे राजेंद्र कासार, पशुसंवर्धन विभागाचे डॉ. पुंडलिक येवले, लघु पाटबंधारे विभागाचे उपअभियंता संतोष दळवी यांनी आपापल्या विभागाचा आढावा सादर केला.

प्रशासन व नागरिकांमध्ये समन्वय आवश्यक

जलजीवन मिशन, घरकुल, आरोग्य, कृषी, पशुसंवर्धन, उमेद आदी विभागांबाबत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकामागोमाग एक तक्रारी मांडल्या. प्रशासन आणि नागरिकांमध्ये समन्वय असणे अत्यंत गरजेचे आहे. कोणत्याही गावात अधिकाऱ्यांना त्रास दिला जात असल्याचे आढळल्यास संबंधितांची नावे थेट माझ्यापर्यंत पोहोचवा, असे स्पष्ट निर्देश आ. खताळ यांनी दिले.

विकासकामांमध्ये ठेकेदारीपेक्षा अधिकाऱ्यांनी अधिक जबाबदारीने लक्ष घालावे. दर्जाहीन कामांचा फटका शासनाच्या प्रतिमेला बसतो, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

Web Title: Ahilyanagar news mla amol khatal criticize officers for jal jeevan mission yojana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2026 | 06:25 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Sangamner

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: नवराष्ट्रचा थेट इम्पॅक्ट! संगमनेरमध्ये तब्बल 3 लाखांचे गोमांस केले जप्त
1

Ahilyanagar News: नवराष्ट्रचा थेट इम्पॅक्ट! संगमनेरमध्ये तब्बल 3 लाखांचे गोमांस केले जप्त

Ahilyanagar News: पाण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक! टाळ-मृदंगाच्या निनादात शेतकरी उतरले थेट कालव्यात
2

Ahilyanagar News: पाण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक! टाळ-मृदंगाच्या निनादात शेतकरी उतरले थेट कालव्यात

Ahilyanagar News : भीमजयंतीचा ऐतिहासिक महाकुंभ; निळ्या अलोट जनसागराने अनुभवला ‘समतेचा सोहळा’
3

Ahilyanagar News : भीमजयंतीचा ऐतिहासिक महाकुंभ; निळ्या अलोट जनसागराने अनुभवला ‘समतेचा सोहळा’

Ahilyanagar News: राहत्यात अवैध्य व्यवसाय तेजीत, नागरिक कार्यक्षम पोलीस नेतृत्वाच्या प्रतीक्षेत
4

Ahilyanagar News: राहत्यात अवैध्य व्यवसाय तेजीत, नागरिक कार्यक्षम पोलीस नेतृत्वाच्या प्रतीक्षेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.