रामचंद्र गुरव हे पोस्टात कामाला होते. ते पोस्टमास्तर होते त्यांच्या रिटायरमेंटला अवघे केवळ 13 महिने महिने राहिले होते अशातच त्यांचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आहे. पोस्टाच्याच कामासाठी निघालेले असतानाच त्यांचा चार दिवसांपूर्वी अपघात झाला होता. कळंबणी येथून खेड भरणे दिशेने जात असताना पाठीमागून येणाऱ्या कारने (एमएच 43 बीवाय 7512) त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने मोठा अपघात झाला. त्यात ते गंभीरित्या जखमी झाले होते. स्थानिकांच्या मदतीने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्यांच्यावर उपचार सुरू होते या उपचार दरम्यानच त्यांची आज प्राणज्योत मालवली. अपघातानंतर ते गेले चार दिवस बेशुद्ध अवस्थेत होते त्यांच्यावर उपचार सुरू होते.
खेड तालुक्यातील कळंबणी बुद्रुक गावचे पोस्ट मास्तर व गावातील देवस्थानचे पुजारी तसेच खजिनदार या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या रामचंद्र गुरव यांच्याकडे होत्या. कळंबणी बुद्रुक येथे अंत्यविधी दुपारी ठीक दोन वाजता करण्यात आले. त्यांच्या निधनाने गाव परिसरावर व गुरव कुटुंबीयांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुली,मुलगा,सून,भाऊ,भावजय असं एकत्र कुटुंब आहे.
या अपघातप्रकरणी चिपळूण तालुक्यातील खेर्डी परिसरातील असलेल्या कार चालकावर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामचंद्र गुरव हे दुचाकीवरून कळंबणी येथून भरणे दिशेने जात असताना पाठीमागून येणाऱ्या कारने ( एमएच 43 बीवाय 7512) त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात गुरव यांच्या डोक्यासह पायाला गंभीर दुखापत झाली असून दुचाकीचेही नुकसान झाले होते. या अपघात प्रकरणाचा तपास खेड पोलीस करत आहेत.






