Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: राहुरीमध्ये पोटनिवडणुकीत उमेदवार देणे पवारांचे षडयंत्र! डॉ. सुजय विखे पाटील यांचा घणाघात

सध्या महाराष्ट्रात पोटनिवडणुकीचे वारे वेगाने वाहताना दिसत आहे. अशातच आता राहुरी पोटनिवडणुकीवरून डॉ. सुजय विखे पाटलांनी माविआवर टीका केली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 11, 2026 | 09:01 PM
राहुरीमध्ये पोटनिवडणुकीत उमेदवार देणे पवारांचे षडयंत्र!

राहुरीमध्ये पोटनिवडणुकीत उमेदवार देणे पवारांचे षडयंत्र!

Follow Us
Follow Us:

अहिल्यानगर महाविकास आघाडी बारामतीसाठी एक नियम आणि राहुरीसाठी दुसरा नियम लावत आहे. बारामतीमध्ये ते सामंजस्य दाखवू शकतात, तर राहुरीमध्ये का नाही? असा सवाल उपस्थित करून हे राजकारण जुने असून हे पवारांचे षडयंत्र असून विखे परिवाराने अशी अनेक राजकीय षडयंत्रे अनुभवली आहेत. आम्ही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण ताकदीने लढू, असा विश्वास भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी खा. डॉ. सुजय विखे यांनी केले.

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीतील प्रचाराच्या नियोजनासाठी भाजपची बैठक झाली. यावेळी आ. संग्राम जगताप उपस्थित होते. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना डॉ. विखे पाटील म्हणाले, स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांनी केलेले कार्य आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकासकामांच्या जोरावर अक्षय कर्डिले आमदार झालेले दिसतील.

Satara News : महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त नगरपालिकेचं अभिवादन; साताऱ्यात क्रांतीज्योतिंच्या विचारांचा जागर

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बारामती आणि राहुरी या दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र, महाविकास आघाडीने बारामतीमध्ये माघार घेतली असली तरी राहुरीमध्ये उमेदवार रिंगणात उतरवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यात चर्चा होऊनही महाविकास आघाडीने उमेदवार दिला, हे पवारांचेच षडयंत्र आहे. राहुरी पोटनिवडणूक न लढविण्याचा निर्णय माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी घेतल्याबद्दल डॉ. विखे यांनी त्यांचे कौतुक केले. ते म्हणाले, प्राजक्त तनपुरे यांनी मनाचा मोठेपणा दाखवला आहे. स्व. कर्डिले यांच्याबद्दलची भावना आणि त्यांचे संवेदनशील व्यक्तिमत्व या निर्णयातून दिसते.

कोणीही कार्यकर्त्यांनो, गाफील राहू नका

राहुरी पोटनिवडणूक ताकदीने लढवा, कोणीही गाफील राहू नका. सर्वांना सोबत घेऊन प्रचार यंत्रणा मजबूत करा. स्व. कर्डिले यांनी २५ ते ३० वर्षे नगर तालु‌का एकसंघ ठेवला. त्यांच्या जनसेवेची परंपरा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा आणि त्यांच्या विकास कामांवर मते मागा, असे आवाहन डॉ. विखे पाटील यांनी केले.

काँग्रेस भूमिकेवर ठाम, बारामतीतून उमेदवारी अर्ज माघारी घेतला पण…; हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितलं

एकजुटीने काम करा : आ. संग्राम जगताप

बारामती व राहुरी पोटनिवडणुकीत अनुक्रमे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले मोठ्या मताधिक्याने विजयी होतील. स्व. अजितदादा पवार आणि स्व. शिवाजीराव कर्डिले यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकजुटीने काम करावे, असे आवाहन आ. संग्राम जगताप यांनी केले.

Web Title: Ahilyanagar news rahuri bypoll sujay vikhe patil attack on pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 09:01 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Marathi News

संबंधित बातम्या

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर
1

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा
2

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत
3

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत

Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! IMDbवर 7.9 रेटिंग असलेली ‘ही’ सीरिज या विकेंडला नक्की पाहा….
4

Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! IMDbवर 7.9 रेटिंग असलेली ‘ही’ सीरिज या विकेंडला नक्की पाहा….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.