Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: घरकुल अनुदानात ५० हजारांची वाढ; पारनेरमध्ये विकासकामांच्या आढावा बैठकीत आमदार दाते यांची महत्त्वपूर्ण माहिती

पारनेर पंचायत समितीच्या बैठकीत आमदार दाते यांनी कामाच्या गुणवतेत तडजोड करू नका असे स्पष्ट निर्देश दिले आहे. या बैठकीत विविध मुद्द्यांवर भाष्य करण्यात आले.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 17, 2026 | 08:45 PM
Ahilyanagar News: घरकुल अनुदानात ५० हजारांची वाढ; पारनेरमध्ये विकासकामांच्या आढावा बैठकीत आमदार दाते यांची महत्त्वपूर्ण माहिती
Follow Us
Follow Us:

जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कामांबाबत आमदार दाते यांनी स्पष्टपणे सांगितले की, कोणत्याही परिस्थितीत कामाच्या गुणवत्तेत तडजोड होणार नाही. नागरिकांच्या तक्रारी आल्यास संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळी जाऊन तपासणी करून तत्काळ तोडगा काढावा, तसेच सर्व कामे वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. पारनेर पंचायत समितीच्या सभागृहात टंचाई व विविध विकासकामांची आढावा बैठक पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडली.

गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत तालुक्यातील विविध विभागांच्या कामांचा सखोल आढावा घेत प्रशासनाला अधिक गतिमान व लोकाभिमुख करण्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या. विविध लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ahilyanagar News: वाढत्या उष्णतेमुळे जिल्हा होरपळतोय! जिल्हा रुग्णालयात उष्मघात कक्षाची स्थापना

तक्रारी ग्रामस्थांच्या जाणून घेण्याचे आदेश

ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कामांचा आढावा घेताना जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या योजनांची प्रत्यक्ष पाहणी करून ग्रामस्थांच्या तक्रारी जाणून घेण्याचे आदेश देण्यात आले. अपूर्ण कामांना पूर्णत्वाचा दाखला देऊ नये, तसेच १ जूनपर्यंत संपूर्ण अहवाल सादर करण्याचे निर्देश देत योजनांची गुणवत्ता व पारदर्शकता राखण्यावर त्यांनी भर दिला. त्याचबरोबर लघु पाटबंधारेची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याबाबतही सूचना देण्यात आल्या.

लाभार्थीची कामे पूर्ण करण्याचे दिले निर्देश

घरकुल योजनांच्या आढाव्यात प्रधानमंत्री आवास, रमाई, शबरी आदी योजनांतील अपूर्ण घरे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. लाभार्थ्यांशी थेट संवाद साधून कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश देताना आमदार दाते यांनी नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनात त्यांनी मांडलेल्या मागणीचा उल्लेख केला आणि राज्य शासनाने घरकुल अनुदानात ५० हजार रुपयांची वाढ केल्याची महत्त्वाची माहिती दिली. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

Ahilyanagar : तारकपूर बस स्थानकात ज्येष्ठ नागरिकांचे हाल; स्मार्ट कार्डसाठी तासनतास रांगेत उभं राहण्याची वेळ

उपाययोजनांवर भर देण्याच्या दिल्या सूचना

‘लाडकी बहिण’ योजनेतील अपूर्ण ई-केवायसीसाठी विशेष शिबिरे आयोजित करण्याचे, आरोग्य विभागाने लसीकरण मोहिम वेळेत पूर्ण करण्याचे तसेच पशुसंवर्धन विभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित भरपाई देण्याचे निर्देश देण्यात आले. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करण्यासाठी ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

तालुक्यातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेल्या टँकर पाणीपुरवठ्याचा आढावा घेत कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर देण्याच्या सूचना करण्यात आल्या. रोजगार हमी योजनेतील कामांना गती देऊन अधिकाधिक नागरिकांना लाभमिळावा, यासाठी प्रशासनाने सक्रिय भूमिका घ्यावी असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Ahilyanagar parner meeting mla kashinath date announces rs 50000 hike in housing subsidy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 08:45 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Marathi News

संबंधित बातम्या

US – Iran करारानंतर भारताचं चित्र बदलणार… गोल्डमन सॅक्सने दिली Good News, सामान्यांना फायदा होणार?
1

US – Iran करारानंतर भारताचं चित्र बदलणार… गोल्डमन सॅक्सने दिली Good News, सामान्यांना फायदा होणार?

पालघरमधील शिक्षण व्यवस्थेचा कायापालट होणार! मोतीलाल ओसवाल फाउंडेशन आणि जिल्हा परिषदेमध्ये 3 वर्षांचा ऐतिहासिक करार
2

पालघरमधील शिक्षण व्यवस्थेचा कायापालट होणार! मोतीलाल ओसवाल फाउंडेशन आणि जिल्हा परिषदेमध्ये 3 वर्षांचा ऐतिहासिक करार

Varanasi सिनेमा थेट IMAX फॉरमॅटमध्ये! दिग्दर्शक राजामौली यांनी आगामी प्रोजेक्टबाबत केला मोठा खुलासा
3

Varanasi सिनेमा थेट IMAX फॉरमॅटमध्ये! दिग्दर्शक राजामौली यांनी आगामी प्रोजेक्टबाबत केला मोठा खुलासा

Rishabh Sawhney Birthday: ‘फायटर’मधील डेंजर्स खलनायकापासून ते ‘नागाबंधम’मधील मेगा व्हिलनपर्यंत, ऋषभ साहनीचा पडद्यावर दमदार अंदाज
4

Rishabh Sawhney Birthday: ‘फायटर’मधील डेंजर्स खलनायकापासून ते ‘नागाबंधम’मधील मेगा व्हिलनपर्यंत, ऋषभ साहनीचा पडद्यावर दमदार अंदाज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.