Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar मध्ये पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकणार! अनिल भय्या राठोडांच्या कार्यालयाला भेट देत अर्जुन खोतकरांचा मोठा दावा

Ahilyanagar News: अहिल्यानगरच्या राजकीय वर्तुळात शिवसेनेच्या पुनरागमनाची चर्चा रंगली आहे. शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी दिवंगत माजी मंत्री व आमदार अनिल भैय्या राठोड यांच्या कार्यालयाला भेट देत अहिल्यानगरमध्ये पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 08, 2026 | 11:05 AM
अहिल्यानगरमध्ये पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकणार! अनिल भय्या राठोडांच्या कार्यालयाला भेट देत अर्जुन खोतकरांचा मोठा दावा

अहिल्यानगरमध्ये पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकणार! अनिल भय्या राठोडांच्या कार्यालयाला भेट देत अर्जुन खोतकरांचा मोठा दावा

Follow Us
Follow Us:
  • अहिल्यानगरमध्ये पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकणार!
  • अनिल भय्या राठोडांच्या कार्यालयाला भेट देत अर्जुन खोतकरांचा मोठा दावा
  • आगामी विधानसभेवर शिवसेनेचाच दावा!
 

पोपट पिटेकर,अहिल्यानगर : विधानमंडळ समितीचे अध्यक्ष तथा शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांच्या अहिल्यानगर दौऱ्यामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडींना उधाण आले आहे. तीन दिवसांच्या दौऱ्यावर आलेल्या खोतकर यांनी आज शहरातील प्रसिद्ध विशाल गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर थेट स्व. माजी आमदार अनिल भय्या राठोड यांच्या जनसंपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी अनिल भय्या राठोड यांच्या स्मृतींना उजाळा देत अहिल्यानगर विधानसभेवर पुन्हा एकदा शिवसेनेचाच आमदार निवडून येईल, असा ठाम विश्वास व्यक्त केला.

Ahilyanagar news: अहिल्यानगरच्या कर्जतमध्ये पर्यावरणपूरक उपक्रम; आईच्या नावाने लावली ७० झाडे

हिंदुत्वाचा बुलंद आवाज आजही जनतेच्या मनात कायम

अनिल भय्या राठोड यांचे स्मरण करताना अर्जुन खोतकर भावूक झाले होते. “अहिल्यानगर जिल्ह्यातील पहिले हिंदुत्ववादी आमदार म्हणून अनिल भय्यांनी निर्माण केलेली प्रतिमा आजही जनतेच्या मनात घर करून आहे. राजकारणात अनेक चढ-उतार येत असतात, परंतु त्यांनी रुजवलेले हिंदुत्वाचे विचार आणि जनसेवेचे व्रत आजच तितकेच जिवंत आहे,” असे प्रतिपादन खोतकर यांनी केले.

आगामी विधानसभेवर शिवसेनेचाच दावा!

नगर शहर विधानसभा मतदारसंघाच्या आगामी समीकरणांवर भाष्य करताना खोतकर म्हणाले की, “या मतदारसंघाशी शिवसेनेचे आणि अनिल भय्यांचे रक्ताचे नाते राहिले आहे. येत्या काळात अहिल्यानगर शहरात शिवसेनेचाच भगवा फडकेल आणि पक्षाचाच आमदार विधानसभेत जाईल.” खोतकर यांच्या या दाव्यामुळे स्थानिक शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य पसरले आहे.

“नगर जिल्ह्यातील हिंदुत्वाचा पहिला बुलंद आवाज म्हणजे स्वर्गीय अनिल भय्या राठोड. राजकारणात जय-पराजयाचे चक्र सुरूच असते, पण भय्यांचे विचार आणि नगरकरांच्या मनातील त्यांचे स्थान अबाधित आहे. अहिल्यानगर शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे आणि येणाऱ्या काळात इथे शिवसेनेचाच आमदार निवडून येईल, यात शंका नसल्याचं अर्जुन खोतकर यांनी सांगितली.

मात्र, “अहिल्यानगरमध्ये पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकणार” हा अर्जुन खोतकरांचा राजकीय दावा आहे; त्याला आगामी निवडणुकीतील प्रत्यक्ष निकालाची हमी म्हणून मांडता येणार नाही. अंतिम चित्र निवडणुकीतील उमेदवार, स्थानिक आघाड्या, संघटनात्मक ताकद आणि मतदारांचा कौल यावर अवलंबून असेल.

Ahilyanagar News: ‘लेडी सिंघम’ची जोरदार कारवाई: हुकूमशाही आणि अडथळ्यांना न जुमानता कारवाईचा धडाका!

Web Title: Ahilyanagar shiv sena bhagwa arjun khotkar visit anil rathod office big claim

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 11:05 AM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Maharashtra Politics
  • Shiv Sena

संबंधित बातम्या

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजेत’; महायुतीतील नेत्याच्या विधानाने राजकीय चर्चेला उधाण, मुख्यमंत्रीपदावरून पुन्हा धुसफूस?
1

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजेत’; महायुतीतील नेत्याच्या विधानाने राजकीय चर्चेला उधाण, मुख्यमंत्रीपदावरून पुन्हा धुसफूस?

Baramati Politics: ‘अजितदादा, बघताय ना सोमेश्वरकडे?’; पार्थ पवारांना  इशारा देणारे पत्र बारामतीत व्हायरल!
2

Baramati Politics: ‘अजितदादा, बघताय ना सोमेश्वरकडे?’; पार्थ पवारांना इशारा देणारे पत्र बारामतीत व्हायरल!

Maharashtra MLC Election 2026: मोठी बातमी! राज्यातील ५  शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर, वाचा सविस्तर
3

Maharashtra MLC Election 2026: मोठी बातमी! राज्यातील ५ शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर, वाचा सविस्तर

Maharashtra Today’s Live News in Marathi: मान्सूनचा परतीचा प्रवास, एशियन गेम्समधील भारतीय महिला संघाची मुसंडी
4

Maharashtra Today’s Live News in Marathi: मान्सूनचा परतीचा प्रवास, एशियन गेम्समधील भारतीय महिला संघाची मुसंडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.