Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ओबीसीमधून मराठा आरक्षण देण्याबाबत अजित पवार यांचा पाठिंबा आहे का? स्पष्ट केली भूमिका

मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यामध्ये तापला आहे. आगामी विधानसभा निवडणूकीवर देखील मराठा आरक्षणाचा परिणाम होणार आहे. ओबीसीमधून आरक्षण देण्यात यावे अशी मागणी जरांगे पाटील यांची आहे. त्यावर आता अजित पवार यांनी देखील भूमिका स्पष्ट केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Aug 11, 2024 | 05:08 PM
ajit pawar on reservation

ajit pawar on reservation

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यामध्ये सध्या आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. लवकरच विधानसभा निवडणूका होणार असल्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मागील महिन्यांमध्ये झालेल्या लोकसभा निवडणूकीवर देखील मराठा आरक्षणाचा परिणाम दिसून आला. यामुळे महायुतीला राज्यामध्ये मोठा फटका बसला. त्यानंतर आता महायुतीकडून सावधानगी बाळगली जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील मराठा आरक्षण ओबीसीमधून द्यावे का असा सवाल करण्यात आला आहे. यावर अजित पवार यांनी आरक्षणाबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

काय म्हणाले अजित पवार?

एका माध्यमांशी संवाद साधताना आरक्षणाबाबत अजित पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे. मराठा समाजात गरीब कुटुंबांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे त्यांनाही इतरांच्या बरोबरीला येण्यासाठी शिक्षण व नोकरीत आरक्षण मिळायला पाहिजे”. अशी भूमिका अजित पवार यांनी घेतली आहे. त्याचबरोबर मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत देखील अजित पवार यांनी मत मांडले आहे.

समंजस भूमिका घेऊन त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची भूमिका आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलं जावं, दुसऱ्या बाजूला ओबीसींचा त्यास विरोध आहे. याबाबत तुमची भूमिका काय? यावर अजित पवार म्हणाले, “सर्वपक्षीय बैठकीत यावर चर्चा करायला हवी. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. दुर्दैवाने काही पक्ष व काही पक्षांचे नेते त्या बैठकीला येऊ शकले नव्हते. आता लोकसभेचे अधिवेशन संपत आहे त्यामुळे विविध पक्षांचे खासदार व प्रमुख नेते या अधिवेशनातून मोकळे होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा ही बैठक आयोजित केली पाहिजे. या बैठकीत सर्व पक्षांचं नेत्यांचं मत जाणून घेऊन मराठा समाजावर अन्याय होणार नाही याची खबरदारी घेऊन निर्णय घेतला पाहिजे. समंजस भूमिका घेऊन त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करायला हवा. कारण हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. इतर राज्यांचा महाराष्ट्राकडे बघण्याचा दृष्टिकोनही तोच आहे, असे मत अजित पवार यांनी मांडले आहे.

Web Title: Ajit pawar clarified his stance on giving maratha reservation from obc nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2024 | 05:08 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Maratha Reservation
  • OBC Reservation

संबंधित बातम्या

देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी आरक्षण नाकारलं; राष्ट्रवादीचे ओबीसी नेते राज राजापूरकर यांचा आरोप
1

देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी आरक्षण नाकारलं; राष्ट्रवादीचे ओबीसी नेते राज राजापूरकर यांचा आरोप

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको
2

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

सरकारचं टेन्शन वाढणार! हातकणंगलेतून 25 हजार मराठा बांधव मुंबईला जाणार
3

सरकारचं टेन्शन वाढणार! हातकणंगलेतून 25 हजार मराठा बांधव मुंबईला जाणार

सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करू : उपमुख्यमंत्री अजित पवार
4

सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करू : उपमुख्यमंत्री अजित पवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.