Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajit Pawar Plane Crash: एकाच पक्षातून राजकीय प्रवासाला सुरुवात… नंतर पडली फूट, असं होतं काका- पुतण्याचं नातं!

Ajit Pawar And Sharad Pawar: अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये 2023 साली फूट पडली. अजित पवार यांनी शरद पवार यांच्यापासून वेगळे होतं भाजप–शिंदे गटासोबत सरकारमध्ये करण्याचा निर्णय घेतला.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 28, 2026 | 10:27 AM
NCP Merger News, Ajit Pawar NCP, NCP Politics, Maharashtra Politics,

NCP Merger News, Ajit Pawar NCP, NCP Politics, Maharashtra Politics,

Follow Us
Close
Follow Us:
  • अजित पवार यांच्या विमानाला मोठा अपघात
  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 6 जणांचा मृत्यू
  • महाराष्ट्राचे लाडके काका – पुतणे अशी शरद पवार आणि अजित पवार यांची ओळख
Ajit Pawar Death: महाराष्ट्राचे लाडके दादा आणि उपमुख्यंमंत्री अजित पवार यांच्या विमानाला आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास मोठा अपघात झाल्याचे समोर आले. लँडिंग करताना विमान अचानक क्रॅश झाले. हा अपघात इतका भिषण होता की या अपघातामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 6 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. अजित पवार यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण राज्याला धक्का बसला आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण पवार कुटूंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Breaking: बारामतीत अजित पवारांच्या विमानाला मोठा अपघात, लँडिंगदरम्यान जमिनीवर कोसळले विमान

शरद पवार आणि अजित पवार यांचे नाते

महाराष्ट्राचे लाडके काका – पुतणे अशी शरद पवार आणि अजित पवार यांची ओळख होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अजित पवार यांनी त्यांचे काका म्हणजेच शरद पवार यांच्यासोबत राजकीय प्रवास सुरु केला. राजकीयदृष्ट्या दोघेही अनेक वर्षे एकाच कुटुंबातून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून पुढे आले. काका आणि पुतण्या यांच्या भाषणाला नेहमीच लोकांची गर्दी होती. मात्र 2023 मध्ये असं काही झालं की या लाडत्या काका – पुतण्यामध्ये दुरावा निर्माण झाला. (फोटो सौजन्य – Pinterest)

राजकारणात मतभेद आणि सत्ता संघर्षामुळे 2023 चे वर्ष पवार कुटूंबियांसाठी अत्यंत धक्कादायक ठरले होते. कारण यावर्षी काका – पुतण्यामध्ये फूट पडली. दोघांनी वेगळ्या राजकीय वाटेवर चालण्याचे ठरवले. राजकारणात मतभेद आणि सत्ता संघर्षामुळे 2023 नंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला. अजित पवारांनी वेगळा राजकीय मार्ग स्वीकारला आणि पक्षांच्या काही कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत त्यांनी वेगळा मार्ग निवडला. खरं तर नेहमीच एकत्र दिसणाऱ्या काका – पुतण्यामध्ये फूट कशी पडली, त्यांच्यामध्ये दुरावा का आणि कसा निर्माण झाला असा प्रश्न नेहमीच अनेकांच्या मनात होता. याबाबात थोडक्यात जाणून घेऊ.

Ajit Pawar Plane Crash : अजित पवार यांचा अपघाती दुर्दैवी मृत्यू; दिवसभरात चार सभा होत्या नियोजित

शरद पवार गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेते होते. मात्र अजित पवार यांची अशी इच्छा होती की, नव्या पिढीला संधी मिळणं गरजेचं आहे, यासाठी त्यांनी अनेकवेळा प्रयत्न देखील केले होते. यानंतर मतभेद सुरु झाला आणि सत्तेची अस्वस्थता निर्माण झाला. 2019 नंतर राष्ट्रवादी काँग्रेसला वारंवार सत्ता मिळाली होती, मात्र तरी देखील अजित पवारांना मुख्यमंत्रीपद मिळालं नाही. याचीच नाराजी त्यांच्या मनात होती. याच नाराजीमुळे अजित पवार यांनी शरद पवार यांच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. 2023 मध्ये अजित पवार यांनी भाजप–शिंदे गटासोबत सरकारमध्ये प्रवेश केला. हा निर्णय शरद पवारांसाठी मोठा धक्का ठरला. याच पद्धतीने महाराष्ट्राचे लाडके काका – पुतणे यांच्यामध्ये फूट पडली.

Web Title: Ajit pawar death how was the deputy chief minister ajit pawar and sharad pawar relation know about their political journey

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2026 | 10:27 AM

Topics:  

  • ajit pawar
  • ajit pawar plane crash
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात ‘अजित पवारां’चं कनेक्शन? अमोल मिटकरीचा खळबळजनक दावा; अघोरी पूजेचाही उल्लेख
1

Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात ‘अजित पवारां’चं कनेक्शन? अमोल मिटकरीचा खळबळजनक दावा; अघोरी पूजेचाही उल्लेख

Baramati By Election : बारामती पोटनिवडणुकीत तिरंगी लढत होणार; काँग्रेसही उमेदवार देणार?
2

Baramati By Election : बारामती पोटनिवडणुकीत तिरंगी लढत होणार; काँग्रेसही उमेदवार देणार?

Baramati By Election : बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही; ‘या’ नेत्याने केला तीव्र विरोध
3

Baramati By Election : बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही; ‘या’ नेत्याने केला तीव्र विरोध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.