Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अजित पवारांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी; अधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ सूचना

बारामती व इंदापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या भागाला उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 26, 2025 | 04:03 PM
अजित पवारांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी

अजित पवारांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी

Follow Us
Follow Us:

बारामती : बारामती व इंदापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या भागाला उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधला. आपत्तीच्या काळात नागरिकांना मदत करणे राज्य शासनाचे कर्तव्य असून, झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, एनडीआरएफच्या निकषानुसार बाधित नागरिकांना मदत करण्यात येईल, असे प्रतिपादन पवार यांनी यावेळी केले.

पवार यांनी सकाळी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ परिसरातील इमारती, कन्हेरी वनोद्यान, कन्हेरी काटेवस्ती येथील नीरा डावा कालवा, सोनगाव, ढेकळवाडी, इंदापूर तालुक्यातील सणसर, निंबोडी, शेटफळगढे, मदनवाडी आणि भिगवण येथील बसस्थानक परिसरात झालेल्या नुकसानीची पाहणी करुन संबंधित अधिकाऱ्याकडून माहिती घेतली.

पवार म्हणाले, बारामती, इंदापूर आणि दौंड तालुक्यातील वार्षिक पर्जन्यमानाची सरासरी १४ इंच असून काल २५ मे रोजी एकाच दिवशी ७ इंच पाऊस झाला आहे. नीरा डावा कालवा लिमटेक आणि काटेवाडी आणि भवानीनगर दरम्यान दोन ठिकाणी कालवा फुटला होता. कालव्यामधील पाणी कमी होत आहे. या दोन्ही तालुक्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

या अतिवृष्टीमुळे घराचे, पिकांचे, शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. या भागातील नागरिकांची अल्पोहार, जेवण आणि राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. रस्त्यावरील साचलेला गाळ काढण्याचे काम सुरु आहे, रस्त्यावरील खड्डे भरुन काढण्यासह परिस्थितीचा अंदाज घेऊन बंद असलेले रस्ते सुरु करण्यात येत आहेत. अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या वतीने सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यापूर्वी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभ मिळालेले परंतु या आपत्तीत घराचे नुकसान झालेल्या नागरिकांना विशेष बाब म्हणून घरकुल मंजूर करण्याबाबत विचार करण्यात येईल. एकही नागरिक बेघर राहणार नाही, अशी ग्वाही पवार यांनी दिली.

नागरी वस्तीमध्ये रोगराई पसरु नये याकरीता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून औषधे फवारणी करावी. कालवा फुटलेल्या ठिकाणी दुरुस्तीची कामे करावी. ओढ्यामधील अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करुन ओढा रुंदीकरण, खोलीकरणाचे काम करण्यात येणार असून, नागरिकांनी सहकार्य करावे. याकरिता निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.

चारीच्या मध्यभागापासून रस्त्याच्या बाजूला ५९ टक्के आणि दुसऱ्या बाजूला ४० टक्के क्षेत्र आरक्षित असून, या क्षेत्रातील अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करावी. शेतकऱ्यांना शेतात ये-जा करण्याकरिता रस्त्याची नितांत गरज असते, आगामी काळात चाऱ्यात अतिक्रमण करु नये. संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या दरम्यान येणाऱ्या चारीच्यावरती संरक्षक भिंतीचे काम पूर्ण करण्याचा सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिल्या. पाणी कमी झाल्यानंतर महावितरणने विद्युत पुरवठा सुरु करावा. ज्याठिकाणी आवश्यकता आहे त्याठिकाणी उपरस्ता करण्यात येईल. सर्व संबंधित यंत्रणेने खबरदारीचा उपाय म्हणून समन्वयाने काम करावे. नागरिकांना धीर देऊन त्यांना आवश्यक ती मदत करावी, अशा सूचना पवार यांनी दिल्या.

बारामती शहरातील ३ इमारतीच्या बाजूला भेगा पडल्या असून नगर परिषदेने तात्काळ संरक्षणात्मक लेखापरीक्षण करावे. या इमारतीचे लेखापरीक्षण होईपर्यंत नागरिकांनी राहण्यासाठी जाऊ नये. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सूचनांचे नागरिकांनी पालन करावे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार आगामी काळातही अतीमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे, नागरिकांनी काळजी घ्यावी, अडीअडचणीच्या काळात प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन पवार यांनी केले. इंदापूर तालुक्यातील भिगवण बस्थानकाच्या दुरुस्तीचे काम करावे. शेटफळगडे येथील ओढ्याची उंची वाढवावी. सणसर परिसरातील बाजारपेठ विचारात घेऊन सेवा रस्ता तयार करावा, अशाही सूचना पवार यांनी दिल्या.

यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार, बारामती तहसीलदार गणेश शिंदे, इंदापूर तहसीलदार जीवन बनसोडे, गट विकास अधिकारी अनिल बागल, सचिन खुडे आदी उपस्थित होते.

Web Title: Ajit pawar has inspected the damaged areas in baramati and indapur talukas

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2025 | 04:03 PM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • baramati news
  • CM Devedra Fadnavis
  • Cmomaharasahtra
  • Farmers

संबंधित बातम्या

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे
1

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे

Bhaskar Jadhav : रत्नागिरीतील सर्व तालुक्यांचा दुष्काळग्रस्तांमध्ये समावेश करा, भास्कर जाधवांचे मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र
2

Bhaskar Jadhav : रत्नागिरीतील सर्व तालुक्यांचा दुष्काळग्रस्तांमध्ये समावेश करा, भास्कर जाधवांचे मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र

हिंजवडी मेट्रोच्या उद्घाटनाची प्रतीक्षा लांबणीवर, आयटी कर्मचारी नाराज; ‘हा’ टप्पा तातडीने सुरू करण्याची मागणी
3

हिंजवडी मेट्रोच्या उद्घाटनाची प्रतीक्षा लांबणीवर, आयटी कर्मचारी नाराज; ‘हा’ टप्पा तातडीने सुरू करण्याची मागणी

Drought Affected: टीकेनंतर दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी; ‘मदत की डॅमेज कंट्रोल?’ वाढदिवसावरील टीकेनंतर पालिकेची तिजोरी उघडली
4

Drought Affected: टीकेनंतर दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी; ‘मदत की डॅमेज कंट्रोल?’ वाढदिवसावरील टीकेनंतर पालिकेची तिजोरी उघडली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.