Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajit Pawar : ‘या’ पोलीस कुटुंबीयांच्या वारसांना 7.5 लाखांची मदत, अजित पवारांनी घेतला निर्णय

अवैध मद्यविक्री करणाऱ्या आरोपींच्या वाहनाचा पाठलाग करीत असताना राज्य उत्पादन शुल्क नाशिक यांच्या भरारी पथकाच्या वाहनाला आरोपींच्या वाहनाने धडक दिली व त्यामध्ये एका जवानाचा मृत्यू झाला होता.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 04, 2025 | 02:39 PM
'या' पोलीस कुटुंबीयांच्या वारसांना 7.5 लाखांची मदत, अजित पवारांनी घेतला निर्णय

'या' पोलीस कुटुंबीयांच्या वारसांना 7.5 लाखांची मदत, अजित पवारांनी घेतला निर्णय

Follow Us
Close
Follow Us:

अवैध दारू विरोधी कारवाईत मृत्युमुखी पडलेल्या नाशिक येथील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयातील जवान तथा वाहन चालक कैलास गेणू कसबे यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून विशेष बाब म्हणून साडेसात लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे.तसेच भविष्यात अशा प्रकरणांमध्ये सत्वर मदत होण्याच्या दृष्टीने गृह विभागाच्या धर्तीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कायमस्वरुपी धोरण तात्काळ करण्याचे निदेशही देण्यात आले आहेत अशी माहिती, उपमुख्यमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांनी दिली.

अधिकाऱ्यांचा झाला होता मृत्यू

नाशिक राज्य उत्पादन शुल्क विभाग भरारी पथक क्र.१ मधील अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात अवैधपणे मद्यविक्री करणाऱ्या ढाब्यावर ७ जुलै २०२४ रोजी रात्री कारवाई केली होती. अवैध मद्यविक्री करणाऱ्या आरोपींच्या वाहनाचा पाठलाग करीत असताना राज्य उत्पादन शुल्क नाशिक यांच्या भरारी पथकाच्या वाहनाला आरोपींच्या वाहनाने धडक दिली व त्यामध्ये जवान तथा वाहनचालक कैलास गेणू कसबे यांचा मृत्यू झाला होता.

Pune News: “… त्यानंतरच शहरातील वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागेल”; मंत्री चंद्रकांत पाटलांची माहिती

यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या खात्याचा कार्यभार घेताच या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घातले. त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे सन २०१४ मध्ये गृह विभागाने केलेल्या मदतीच्या धर्तीवर (पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय ठरल्याप्रमाणे साडेसात लाख रुपये) राज्य उत्पादन शुल्क विभागातील दिवंगत जवान कैलास कसबे यांच्या वारसांना विशेष बाब म्हणून ७.५० रुपये लाख नुकसान भरपाई मंजूर केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

अवैध मद्यसाठा घेऊन वेगाने जाणार्‍या अज्ञात वाहनाचा पाठलाग करतांना राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभागाचे सरकारी वाहन उलटले. यात राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभागाचा १ कर्मचारी जागीच ठार झाला, तर दोन पोलीस घायाळ झाले आहेत. यावेळी ‘‘संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. मृत्‍यूमुखी पडलेल्‍या कुटुंबाला विभागाकडून साहाय्‍य देऊ.’’, राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभागाचे मंत्री शंभूराज देसाई म्‍हणाले, असं म्हटलं होते. याचप्रकरणी आता उपमुख्यमंत्र्यांकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

मध्यरात्रीच्या सुमारास गुजरातहून नाशिककडे मद्यसाठा नेणार्‍या वाहनाला सरकारी वाहन मागे टाकत होते. त्या वेळी त्या वाहनाने सरकारी वाहनाला ‘कट’ मारल्याने (जवळून नेल्याने) सरकारी चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन रस्त्याच्या कडेला शेतात जाऊन उलटले. या अपघातात चालक कैलास कसबे जागीच ठार झाले. वाहनाला पकडण्‍यासाठी नाशिक जिल्‍ह्यात पोलिसांनी नाकाबंदी केली आहे.

लग्नाआधीच मुलगी राहते सासरी, महाराष्ट्रातील ‘या’ समाजात विवाहसंस्कृतीतील अनोखी प्रथा नेमकी काय?

Web Title: Ajit pawar on compensation of rs 75 lakh to the heirs of the state excise department soldier who died in the anti illegal liquor operation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2025 | 02:39 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Nashik
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

मोठी बातमी! पार्थ पवारांच्या ‘त्या’ प्रकरणात अंजली दमानिया करणार ‘मोठा गौप्यस्फोट’
1

मोठी बातमी! पार्थ पवारांच्या ‘त्या’ प्रकरणात अंजली दमानिया करणार ‘मोठा गौप्यस्फोट’

Local Body Election: माळेगाव नगरपंचायत निवडणुकीत ट्विस्ट; अजित पवारांना मिळणार ‘या’ व्यक्तीची साथ
2

Local Body Election: माळेगाव नगरपंचायत निवडणुकीत ट्विस्ट; अजित पवारांना मिळणार ‘या’ व्यक्तीची साथ

Maharashtra Politics: नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर झाली अन्…; राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये एकच खळबळ
3

Maharashtra Politics: नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर झाली अन्…; राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये एकच खळबळ

Sharad Pawar : “काँग्रेस लवकरच फुटेल…”, बिहार निकालानंतर पंतप्रधानांच्या भविष्यवाणीवर शरद पवारांचे मोठे विधान
4

Sharad Pawar : “काँग्रेस लवकरच फुटेल…”, बिहार निकालानंतर पंतप्रधानांच्या भविष्यवाणीवर शरद पवारांचे मोठे विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.