फोटो सौजन्य: I Stock
हिंदू धर्मात लग्नसोहळ्याला मोठं महत्त्व प्राप्त आहे. या लग्नसोहळ्यात राज्यातील विविध कानाकोपऱ्यात वेगवेगळ्या प्रथा आहेत. विवाहसंस्था म्हटलं की थोरा मोठ्यांच्या सल्ल्याने आणि त्यांच्या आशिर्वादाने वधु आणि वराची ओळख करुन देत त्यांचं लग्न लावलं जातं. मात्र आता पाहण्याच्या कार्यक्रमात काळानुरुप बदल होत गेले. खरतरं पुर्णत: विवाह संस्थेत देखील आता शिक्षणामुळे काही चांगले बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. सध्याची तरुण पिढी ही लग्नाआधी लिविंगमध्ये राहणं पसंत करतात. आयुष्याचा जोडीदार कसा असावा कींवा समोरची व्यक्ती आपवल्या योग्यतेची आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी लग्नाआधी एकत्र राहत एकमेकांना समजून घेण्यासाठी अनेक जण लिविंगमध्ये राहणं पसंत करतात. या वेस्टर्न कल्चरच्या कॉन्सेप्टला काही जण विरोध दर्शवतात तर काही जण पाठींबा देतात. मात्र तुम्हाला माहितेय का महाराष्ट्रात असा एक समाज आहे, जिथे लग्नाआधी मुलगी सासरी राहते. ही अनोखी प्रथा नेमकी कोणत्या समाजाची आहे ते जाणून घेऊयात.
स्वप्नात गुलाबाचे फूल दिसणे कशाचे आहेत संकेत, जाणून घ्या शुभ की अशुभ
सर्वसाधारणपणे भारतीय विवाह संस्कृतीत प्राचीन परंपरा, धार्मिक सोहळे पाहायाला मिळतात. राज्य आणि जिल्हायानुसार लग्नाबाबत अनोख्या प्रथा पाहायला मिळतात. अशीच एक प्रथा आहे आदिवासी समाजात. लग्न हा आयुष्यातला महत्त्वाचा निर्णय आहे, त्यामुळे याबाबत मुलीच्या मनात तिचा नवरा आणि सासरच्या मंडळींविषयी अनेक संभ्रम असतात. हाच मुद्दा लक्षात घेत आदिवासी समाजात लग्नाआधी मुलगी काही दिवस तिच्या सासरच्या मंडळींबरोबर राहते. यायाबत सविस्तर माहिती वेडींग घर या इन्सटाग्राम या अकाउंटवरुन देण्यात आली आहे.
आदिवासी समजात मुलगी मुलाच्या घरी जाऊन राहते त्यांचं लग्न ठरेपर्यंत. त्यानंतर घरच्यांच्या सहमतीने त्यांचे लग्न लावून दिले जाते. ही प्रथा पाश्चात वाटली तरी आदिवासी जमाजातली ही जुनी प्रथा आहे. आदिवासी समाजात मुलगा आणि मुलीच्या पसंतीने लग्न ठरविले जाते. त्यातील एक परंपरा म्हणजे घर घुसणे. या प्रथेनुसार मुलगी आपल्या आवडत्या मुलाला पसंत करते. त्यानंतर त्याच्या घरी जाऊन राहते. त्यानंतर पंच तिला विचारतात की, की तुला इथे का आलीस ? त्यावर ती मुलगी म्हणते की माझे घर आणि या घरातल्या माणसांना मी माझं समजून इथे आली आहे. त्यानंतर पंच मुलाच्या वडिलांची सहमती घेतात. ते तयार झाले की, घरातली मंडळी त्या मुलामुलीचं लग्न ठरवतात. लग्न ठरविल्यावर मुलाकडच्या मंडळींनी आणलेल्या मोहाच्या दारुचं सेवन करतात. त्यानंतर लग्न ठरलं असं जाहीर करतात.