मुंबई : शिंदे गटाने बंड केल्यानंतर शिवसेना व शिंदे गटासाठी कालचा पहिलाच दसरा मेळावा होता. दरम्यान, दसरा मेळाव्यावरुन (Dasara melava) शिवसेना व शिंदे गटात (Shinde group) आरोप-प्रत्यारोप, टिका, टिपण्णी तसेच यावर राजकारण होताना सर्वांनी पाहिले. शिवाजी पार्कवर (Shivaji Park) दसरा मेळावा (Dasara Melava) उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा झाला, तर बीकेसीत (BKC) शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार झाला. त्यामुळ कोणत्या दसरा मेळाव्याला जास्त गर्दी होती. कोणाचे भाषण गाजले यावर तर्कवितर्क लढविले जात आहेत.
[read_also content=”मुलायम सिंह यादव यांची प्रकृती चिंताजनक https://www.navarashtra.com/india/mulayam-singh-yadav-condition-is-alarming-333157.html”]
दरम्यान, दसरा मेळाव्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे, तसेच एकनाथ शिंदेंनी (Eknath shinde) केलेले आरोप सुद्धा अजित पवार यांनी खोडून काढले आहेत. शिंदेंच्या भाषणावर बोलताना पवार म्हणाले की, काहींची भाषणं नको इतकी लांबली. कोणाची ते तुम्ही ठरवा, असं म्हणत अजित पवार यांनी एकनाथ शिंदेंवर टिका केली. तसेच आता जनेतनं ठरवायचे आहे की, कोणाच्या पाठिशी उभं राहायचं? मूळ शिवसेना पक्ष कोणाचा आहे? आता वेळ आली आहे की, महाराष्ट्रातील मतदारांनी व शिवसैनिकांनी निर्णय घ्यायचा आहे. असं म्हणत पवारांनी एकनाथ शिंदेंवर टिका केली.