'माळेगाव'च्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच अजित पवारांची 'मेगा मीटिंग'; सर्व कामकाजासह कारखान्याच्या स्थितीची घेतली माहिती (Photo Credit- Social Media)
पुणे: गेल्या काही दिवसांत गुइलेन बॅरी सिंड्रोम या दुर्मिळ आजाराचे रुग्ण वाढले आहेत. आतापर्यंत या आजारामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर रुग्णसंख्या 74 पर्यंत पोहचली आहे. काही रुग्ण व्हेंटिलेटरवर असून, या आजारावर उपचाराचा खर्चही मोठा आहे. यामुळे या आजारावर मोफत उपचार मिळावेत अशी मागणी होत होती, त्यानंतर उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी या आजारावर मोफत उपचार दिले जाणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.
पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यानंतर पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, गुइलेन बॅरी सिंड्रोमवरील उपचार पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयात मोफत केले जातील. या संदर्भात महापालिकेच्या आयुक्तांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, नागरिकांना घाबरून न जाऊन काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
गुइलेन बॅरी सिंड्रोम (GBS) या आजारावर पुणे महानगर पालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात मोफत उपचार उपलब्ध होणार आहेत. सध्या पुण्यात GBS चे 74 रुग्ण आहेत, त्यापैकी 14 रुग्ण व्हेंटिलेटरवर असून पाच रुग्णांना डिस्चार्ज दिला जाणार आहे. प्रशासनाने या आजारासाठी सर्व आवश्यक तयारी केली आहे. नागरिकांनी घाबरून जावू नये, काळजी घ्यावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
कमला नेहरू रुग्णालयात GBS साठी 50 बेड आणि15 आयसीयू बेड आरक्षित करण्यात आले आहेत. पुणे महापालिका आयुक्त लवकरच सर्व आरोग्य विभागांची बैठक घेणार आहेत.
GBS चे रुग्ण ज्या खासगी रुग्णालयांत आहेत, तिथे महापालिकेचे मेडिकल ऑफिसर नियुक्त केले जातील. नवले हॉस्पिटल, पूना हॉस्पिटल, भारती हॉस्पिटल, दीनानाथ रुग्णालय या ठिकाणी रुग्णांच्या बिलांवर लक्ष ठेवले जाईल. पुण्यातील सिंहगड रोडवरील नांदेडगाव आणि किरकटवाडी परिसरात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत, त्या ठिकाणी महापालिका शुद्ध पाणी पुरवठा करणार आहे.