Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

साखर कारखान्याच्या संचालकपदापासून ते उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेतेपदापर्यंत…असा आहे अजित पवारांचा राजकीय प्रवास

महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्रातील बड्या नावांपैकी एक नाव म्हणजे अजित पवार (Ajit Pawar). राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते (NCP Senior Leader) म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचे शालेय शिक्षण देवलाळी प्रवरा येथे पूर्ण झाले. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील काटेवाडी गावातील त्यांचे कुटुंबिय आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 04, 2023 | 01:30 PM
ajit pawar

ajit pawar

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्रातील बड्या नावांपैकी एक नाव म्हणजे अजित पवार (Ajit Pawar). राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते (NCP Senior Leader) म्हणून त्यांची ओळख आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. त्यानंतर आता पक्षाध्यक्ष कोण असेल, अशी चर्चा सुरु असताना अजित पवार आणि सुप्रिया सुळे या दोन्ही नावांची जोरदार चर्चा सुरु आहे.

अजित पवार यांचे शालेय शिक्षण देवलाळी प्रवरा येथे पूर्ण झाले. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील काटेवाडी गावातील त्यांचे कुटुंबिय आहे. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे तर शरद पवार यांचे ज्येष्ठ बंधू अनंतराव पवार यांचे पुत्र आहेत.

अजित पवार हे सध्या महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. त्यांनी महाराष्ट्रात विविध खात्याचे मंत्री म्हणून काम पाहिले. ते महाराष्ट्राचे आठवे उपमुख्यमंत्री होते. त्यांनी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपदही भूषवले आहे. सध्या अजित पवार हे बारामती मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रिपदासोबतच महाराष्ट्राचे अर्थमंत्रिपदही भूषविले.

जाणून घ्या राजकीय प्रवास…

१९८२ पासून राजकारणात प्रवेश.

भवानीनगर (तालुका इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदापासून राजकीय कारकिर्द सुरू.

१९९१ साली पहिल्यांदा अजित पवार बारामतीमधून लोकसभेवर निवडून गेले. नंतर काका शरद पवार यांच्यासाठी त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर शरद पवार पी. व्ही. नरसिंहराव सरकारमध्ये संरक्षणमंत्री झाले.

अजित पवार त्यानंतर १९९५, १९९९, २००४, २००९ आणि २०१४ असे सलग पाचवेळा ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले.

१९९५ साली महाराष्ट्रात (भाजप+शिवसेना) या युतीचे सरकार आले. त्यानंतर १९९९ साली पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार आले.

महाराष्ट्राच्या विलासराव देशमुख सरकारमध्ये त्यांना बढती देऊन कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. ऑक्टोबर १९९९ ते डिसेंबर २००३ पर्यंत जलसिंचन खाते त्यांच्याकडे होते. डिसेंबर २००३ ते ऑक्टोंबर २००४ या काळात त्यांच्याकडे ग्रामीण विकास खात्याचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला.

२००४ साली आघाडी सरकार (कॉंग्रस + राष्ट्रवादी काँग्रेस + इतर) पुन्हा सत्तेवर आले तेव्हा जलसिंचन खाते अजित पवारांकडेच होते. २००४ साली त्यांना पुण्याचे पालकमंत्री बनवण्यात आले. २०१४ पर्यंत राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार होते तोपर्यंत ते पुण्याचे पालकमंत्री होते.

आणखी कोणती पदं भूषविली?

– विश्वस्त : विद्या प्रतिष्ठान, बारामती

– संचालक : छत्रपती शिक्षण संस्था, भवानीनगर, ता. इंदापूर, जिल्हा, पुणे

– संचालक : श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना, भवानीनगर, जिल्हा, पुणे

– संचालक : माळेगांव सहकारी साखर कारखाना, जिल्हा पुणे

– संचालक : सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, जिल्हा पुणे

– संचालक : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे

– संचालक : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, पुणे

– संचालक : महाराष्ट्र राज्य सहकारी दूध उत्पादक संघ, पुणे

– संचालक : रयत शिक्षण संस्था, सातारा

Web Title: Ajit pawars political journey from the directorship of a sugar factory to the post of deputy chief minister nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2023 | 01:30 PM

Topics:  

  • ajit pawar
  • maharashtra
  • NCP Resign
  • supriya sule

संबंधित बातम्या

Sanjay Nirupam: “पंतप्रधानांनी काय आता पायी चालावे का?”; इंधन बचतीच्या आवाहनावरून विरोधकांना संजय निरुपम यांचे सडेतोड उत्तर
1

Sanjay Nirupam: “पंतप्रधानांनी काय आता पायी चालावे का?”; इंधन बचतीच्या आवाहनावरून विरोधकांना संजय निरुपम यांचे सडेतोड उत्तर

Census 2026 Maharashtra: शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनो सावधान! जनगणनेच्या कामात हलगर्जीपणा केल्यास थेट गुन्हे दाखल होणार
2

Census 2026 Maharashtra: शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनो सावधान! जनगणनेच्या कामात हलगर्जीपणा केल्यास थेट गुन्हे दाखल होणार

Pratap Sarnaik : ओला, उबर, रॅपिडो अडचणीत? महाराष्ट्र सरकारने सायबर विभागाकडे केली FIR ची मागणी
3

Pratap Sarnaik : ओला, उबर, रॅपिडो अडचणीत? महाराष्ट्र सरकारने सायबर विभागाकडे केली FIR ची मागणी

Mumbai University : मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागात प्रवेशाची संधी; संशोधनपूरक आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांची
4

Mumbai University : मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागात प्रवेशाची संधी; संशोधनपूरक आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांची

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.