Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai University : मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागात प्रवेशाची संधी; संशोधनपूरक आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांची

Mumbai University : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार संशोधनपूरक आणि रोजगाराभिमुख शिक्षणाला प्राधान्य देत University of Mumbai च्या इतिहास विभागात विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 12, 2026 | 11:48 AM
मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागात प्रवेशाची संधी; संशोधनपूरक आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांची पसंती

मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागात प्रवेशाची संधी; संशोधनपूरक आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांची पसंती

Follow Us
Follow Us:
  • मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागात प्रवेशाची संधी
  • राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार संशोधनपूरक, रोजगाराभिमुख अभ्यासक्रम
  • भविष्य घडवण्याची सुवर्णसंधी या निमित्ताने विद्यार्थ्यांना उपलब्ध
नीता परब, मुंबई: ऐतिहासिक वारसा जतन करणे आणि त्याकडे आधुनिक दृष्टिकोनातून पाहणारे संशोधक घडवणे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ ची प्रवेश प्रक्रिया जाहीर केली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची प्रभावी अंमलबजावणी करत इतिहास विभागाने या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांसाठी अनेक वैशिष्ट्यपूर्ण संशोधानपूरक, रोजगाराभिमुख आणि लवचिक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. केवळ पदवी मिळवणे नव्हे, तर इतिहासाच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्य घडवण्याची सुवर्णसंधी या निमित्ताने विद्यार्थ्यांना उपलब्ध झाली आहे.

विद्यार्थ्यांना मल्टिपल एन्ट्री-एक्झिट सुविधा

यात मल्टिपल एन्ट्री-एक्झिट सुविधा देण्यात आली असून, विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार त्यांना पहिल्या वर्षानंतर पदव्युत्तर डिप्लोमा घेऊन बाहेर पडण्याचा पर्याय उपलब्ध आहे, तसेच एम.ए. च्या दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सोयही करण्यात आली आहे. संशोधनावर आधारित पदवी मिळवण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांचा सीजीपीए ७.५ पेक्षा अधिक आहे, त्यांच्यासाठी ‘बी.ए. इतिहास ऑनर्स विथ रिसर्च’ हा विशेष चार वर्षांचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे.

Nari Shakti Award: तुम्हीही विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करताय? मग ‘नारी शक्ती अवॉर्ड २०२६’ साठी आजच अर्ज करा!

दर आठवड्याला ‘विशेष व्याख्यानमाला’

इतिहास विभागाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या विभागात इतिहातील वेगवेगळ्या विषयातील तज्ज्ञ प्राध्यापकांडून नेहमी विद्यार्थ्यांना वर्गाच्या शिकवणी व्यतिरिक्त संशोधन, वेगवेगळ्या प्रशासकीय नाेकरी मधील संधी यावर मार्गदर्शन केले जाते. केवळ पाठ्यपुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता, दर आठवड्याला आयोजित केली जाणारी ‘विशेष व्याख्यानमाला’ यामध्ये इतिहासातील दुर्लक्षित पैलू, जागतिक ते प्रादेशिक, स्थानिक इतिहास आणि नवीन संशोधन पद्धतींवर चर्चा करण्यासाठी देशभरातील नामवंत संसाधन व्यक्ती आणि तज्ज्ञांना पाचारण केले जाते. या प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील ऐतिहासिक घडामोडी आणि आधुनिक संशोधन तंत्रांची थेट ओळख होते. एम.ए. सह पीएच.डी. प्रवेशाची संधी संशोधनाचा कल असणाऱ्या भारतासह जगातील सर्व विद्यार्थ्यांना असून, संशोधक विद्यार्थ्यांना येथे संशोधन पूर्ण उच्च दर्जाचे मार्गदर्शन केले जाते.

इत विभागाला प्रत्यक्ष भेट देण्याचे आवाहन

विद्यापीठाच्या विद्यानगरी कलिना कॅम्पसमध्ये शैक्षणिक व संशोधनासाठी सर्व सोयीसुविधा, समृद्ध डिजिटल ग्रंथालय आणि दुर्मिळ हस्तलिखितांसह संशोधनासाठी पोषक वातावरण उपलब्ध आहे. शैक्षणिक, संशोधन , प्रशासकीय, वस्तुसंग्रहालयशास्त्र आणि पुरातत्व क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी एम.ए. (इतिहास) आणि ‘बी.ए. इतिहास ऑनर्स विथ रिसर्च’ च्या प्रवेशासाठी या गुगल लिंकवर पूर्व नोंदणी https://forms.gle/ybbsspLNCyVEGvjz7 आणि विद्यापीठाच्या https://muadmission.samarth.edu.in या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करावी किंवा शंकांचे निरसन करण्यासाठी विद्यानगरी कलिना कॅम्पस सांताक्रूझ (पूर्व) येथे या प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक स्पष्टता येण्यासाठी विभागातर्फे विशेष समुपदेशन सत्रे घेतली जात आहेत. इतिहास विभागाला प्रत्यक्ष भेट देऊन विशेष समुपदेशन सत्रांचा लाभ घ्यावा, असे आवाहन इतिहास विभागप्रमुख डॉ. लक्ष्मी साळवी यांनी केले आहे.

BMC School : पालिकेच्या विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी! गुणवंतांचा भव्य सत्कार; आयुक्त अश्विनी भिडे यांचा विद्यार्थ्यांशी संवाद

Web Title: Mumbai university history department admission research employment oriented courses

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 11:48 AM

Topics:  

  • maharashtra
  • Mumbai
  • Mumbai University

संबंधित बातम्या

Mumbai University : अपार आयडीशिवाय हॉलतिकीट नाही; १९-२० ऑगस्टला मुंबई विद्यापीठाचे विशेष शिबिर
1

Mumbai University : अपार आयडीशिवाय हॉलतिकीट नाही; १९-२० ऑगस्टला मुंबई विद्यापीठाचे विशेष शिबिर

मादाम कामा महिला वसतिगृहातील पाणीप्रश्नावर अभाविप आक्रमक; ‘आश्वासन नको, कृती हवी’, विद्यार्थिनींच्या तक्रारींकडे दुर्लक्षाचा आरोप
2

मादाम कामा महिला वसतिगृहातील पाणीप्रश्नावर अभाविप आक्रमक; ‘आश्वासन नको, कृती हवी’, विद्यार्थिनींच्या तक्रारींकडे दुर्लक्षाचा आरोप

स्वातंत्र्यदिनी मुंबई बनली विद्यार्थ्यांची ‘क्लासरूम’! Cityflo आणि Salaam Bombay Foundationचा अनोखा उपक्रम
3

स्वातंत्र्यदिनी मुंबई बनली विद्यार्थ्यांची ‘क्लासरूम’! Cityflo आणि Salaam Bombay Foundationचा अनोखा उपक्रम

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल
4

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.