Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Census 2026 Maharashtra: शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनो सावधान! जनगणनेच्या कामात हलगर्जीपणा केल्यास थेट गुन्हे दाखल होणार

Census 2026 Maharashtra: छत्रपती संभाजीनगरमध्ये जनगणनेचे काम टाळणाऱ्या शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश आयुक्त अमोल येडगे यांनी दिले आहेत. कामावर हजर न राहणाऱ्यांचे निलंबन आणि पगार कपात होणार.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 12, 2026 | 03:04 PM
जनगणनेच्या कामात हलगर्जीपणा केल्यास थेट गुन्हे दाखल होणार (Photo Credit- X)

जनगणनेच्या कामात हलगर्जीपणा केल्यास थेट गुन्हे दाखल होणार (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनो सावधान!
  • जनगणनेच्या कामात हलगर्जीपणा केल्यास थेट गुन्हे दाखल होणार
  • मनपा आयुक्त अमोल येडगे यांचा कडक कारवाईचा इशारा
छत्रपती संभाजीनगर, (शहर प्रतिनिधी): देशभर सुरू असलेल्या जनगणना प्रक्रियेत कसूर करणाऱ्या शिक्षक व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा देत महानगरपालिकेचे आयुक्त अमोल येडगे यांनी प्रशासनाला सतर्क केले आहे. जनगणनेच्या कामासाठी आदेश मिळूनही काही शिक्षक ड्युटीवर हजर राहत नसल्याचे समोर आल्याने त्यांनी याची गंभीर दखल घेतली.
सोमवारी सकाळी झालेल्या आढावा बैठकीत आयुक्त येडगे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, जनगणनेचे काम टाळणाऱ्यांविरुद्ध थेट गुन्हे दाखल केले जातील. तसेच महानगरपालिका शाळांतील अनुपस्थित शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

जनगणना ही राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची प्रक्रिया असून त्यात कोणतीही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असे त्यांनी नमूद केले. आदेश मिळालेल्या सर्व शिक्षकांनी कर्तव्यावर रुजू होऊन संबंधित अहवाल सादर करावेत, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. जनगणनेसाठी नियुक्ती आदेश मिळूनही ड्युटीवर अनुपस्थित राहणाऱ्या शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

आता मनपा शिक्षकांवर निलंबनाची कारवाई

महानगरपालिका शाळांमध्ये कार्यरत असलेले आणि जनगणनेच्या आदेशानंतरही कामावर हजर न राहणाऱ्या शिक्षकांवर निलंबनाची कारवाई केली जाईल. शिक्षण विभागालाही याबाबत तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

छत्रपती संभाजीनगरकरांची तहान भागणार! नव्या योजनेतून जॅकवेलचे पंपिंग सुरू; १२ जूनपर्यंत शहराला मिळणार अतिरिक्त पाणी

कर्मचाऱ्यांच्या पगारावर गंडांतर येणार

मनपा आस्थापनेवरील जे कर्मचारी अद्याप स्वगणना प्रक्रियेत सहभागी झाले नाहीत, त्यांची माहिती संकलित करून त्यांच्या पगारातून कपात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रशासनाकडून यावर स्वतंत्र लक्ष ठेवले जाणार आहे.

कामावर रुजू व्हा

ज्या शिक्षकांना जनगणनेचे आदेश प्राप्त झाले आहेत त्यांनी विलंब न करता कर्तव्यावर रुजू व्हावे व संबंधित अहवाल वेळेत सादर करावा, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले. नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई अटळ असल्याचा इशारा प्रशासनाने सर्वांचे लक्ष लागल्याचे दिसत आहे. दिला आहे. त्यामुळे आता काय कारवाई होते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

पावसाळ्यात वीज गुल होणार नाही! महावितरणचा ‘ॲक्शन प्लॅन’ तयार; ३० मे पर्यंत मान्सूनपूर्व कामे पूर्ण करण्याचे आदेश

Web Title: Chhatrapati sambhajinagar municipal commissioner action against teachers census duty

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 03:04 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Digital Census
  • maharashtra

संबंधित बातम्या

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
1

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक
2

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
3

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Kolhapur Ganesh Visarjan: विद्युत तारेला स्पर्श अन् क्षणात 21 फुटी गणेशमूर्ती कोसळली; कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला गालबोट
4

Kolhapur Ganesh Visarjan: विद्युत तारेला स्पर्श अन् क्षणात 21 फुटी गणेशमूर्ती कोसळली; कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला गालबोट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.