Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यात कामगारांसाठी ‘नाका शेड’ ची उभारणी करणार, आकाश फुंडकर यांची माहिती

नाक्यावर थांबून आपल्या कामासाठी जाणाऱ्या कामगारांना बसण्यासाठी शेडची आवश्यकता असते. अशा ठिकाणी जागेची उपलब्धता तपासून नाका शेडची उभारणी करण्यात येईल,अशी माहिती कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी विधानसभेत दिली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 05, 2025 | 06:15 PM
राज्यात कामगारांसाठी 'नाका शेड' ची उभारणी करणार, आकाश फुंडकर यांची माहिती

राज्यात कामगारांसाठी 'नाका शेड' ची उभारणी करणार, आकाश फुंडकर यांची माहिती

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यात मोठ्या शहरांप्रमाणेच छोट्या शहरांमध्ये नाक्यांवर कामगार मोठ्या प्रमाणावर असतात. नाक्यावर थांबून आपल्या कामासाठी जाणाऱ्या कामगारांना बसण्यासाठी शेडची आवश्यकता असते. अशा ठिकाणी जागेची उपलब्धता तपासून नाका शेडची उभारणी करण्यात येईल, अशी माहिती कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

बांधकाम कामगारांच्या मागण्यांबाबत सदस्य सत्यजित देशमुख यांच्या प्रश्नाला कामगार मंत्री फुंडकर यांनी उत्तर दिले. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य भास्कर जाधव,अमित देशमुख, राम कदम, विकास ठाकरे, योगेश सागर, अतुल भातखळकर यांनी सहभाग घेतला. राज्य शासनामार्फत बांधकाम कामगारांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या माध्यमातून त्यांचे जीवनमान अधिक सुकर करण्यासाठी या योजना अधिक गतिमान पद्धतीने राबविण्यात येणार असल्याचे सांगत कामगार मंत्री फुंडकर णाले, बांधकाम कामगारांची नोंदणी जलदगतीने होण्यासाठी प्रत्येक तालुक्यात सेतू केंद्रावर व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी बांधकाम कामगाराच्या कागदपत्रांची केवळ पडताळणी करण्यात येते. सध्या मंडळाकडून ३२ विविध प्रकारच्या कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनांपासून कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही, याची काळजी शासन घेत आहे.

Ladki Bahin Yojana : “2100 रुपये लगेच नाहीत…,”, आदिती तटकरेंचं सभागृहात महत्त्वाचं वक्तव्य

बांधकाम कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यावर विशेष भर दिला जात आहे. बांधकाम कामगारांच्या मृत्यू, अपघात आणि विमा लाभांसाठी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे अशा लाभांची प्रक्रिया एका महिन्यात पूर्ण होईल आणि संबंधित कुटुंबियांना आर्थिक मदत वेळेत मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

बांधकाम कामगारांना घरकुल वाटप गतीने करण्यात येईल. या प्रक्रियेत बदल करून प्रत्येक पात्र बांधकाम करणारा घरकुलाचा लाभ मिळेल. बांधकाम कामगार घरकुल लाभार्थ्यांची यादी ग्रामसभेसमोर ठेवण्याबाबत शासनाचा विचार आहे. माध्यान भोजन योजना बंद करण्यात आली आहे. याबाबत नेमलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर योजनेला पर्याय शोधण्यात येईल.

बांधकामाच्या ठिकाणी पाळणाघर उभारण्याची आवश्यकता असलेली ठिकाणे निश्चित करण्यात येत आहे. आवश्यकता असलेल्या ठिकाणी पाळणाघर देण्यात येणार आहे. कामगारांना ईएसआय रुग्णालयात उपलब्ध होत असलेल्या आरोग्य सेवा प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आदी ठिकाणी कामगारांना विशेषत्वाने आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत शासन कार्यवाही करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Rahul Gandhi : राहुल गांधींना न्यायालयाने ठोठावला दंड, सावरकरांवर केलं होतं वादग्रस्त वक्तव्य

Web Title: Akash fundkar demands setting up of naka shed for workers in the state

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2025 | 06:15 PM

Topics:  

  • maharashtra

संबंधित बातम्या

जगातील सर्वात मोठे ‘सद्भावना वृध्दाश्रम’ भारतभर १५१ कोटी झाडे लावणार
1

जगातील सर्वात मोठे ‘सद्भावना वृध्दाश्रम’ भारतभर १५१ कोटी झाडे लावणार

Mhada Lottery : स्वस्तात घर खरेदी करण्याची शेवटची संधी, ४१८६ घरांसाठी म्हाडाची लॉटरी, शेवटची तारीख कधी?
2

Mhada Lottery : स्वस्तात घर खरेदी करण्याची शेवटची संधी, ४१८६ घरांसाठी म्हाडाची लॉटरी, शेवटची तारीख कधी?

महाराष्ट्रात फार्मसीच्या तृतीयांश जागा रिक्त! गुणवत्तेचा अभाव, कालबाह्य अभ्यासक्रम आणि अव्यवस्थित प्रवेश प्रक्रियेची मोठी समस्या
3

महाराष्ट्रात फार्मसीच्या तृतीयांश जागा रिक्त! गुणवत्तेचा अभाव, कालबाह्य अभ्यासक्रम आणि अव्यवस्थित प्रवेश प्रक्रियेची मोठी समस्या

Mumbai Climate Week 2026: मुंबईतून सुरू होणार 2026 चा हरित क्रांतीचा प्रवास! मुंबई क्लायमेट वीकने सुरू केला इनोव्हेशनची महास्पर्धा
4

Mumbai Climate Week 2026: मुंबईतून सुरू होणार 2026 चा हरित क्रांतीचा प्रवास! मुंबई क्लायमेट वीकने सुरू केला इनोव्हेशनची महास्पर्धा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.