
Akkalkot Teacher Protest against
कट्टीमनी यांनी दिलेल्या निवेदनानुसार, अक्कलकोटचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे पदभार स्वीकारल्यापासून शिक्षकांच्या प्रतिनियुक्त्यांसह विविध बाबतीत मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप आहे. या कथित प्रतिनियुक्त्यांविरोधात त्यांनी सप्टेंबर २०२४ मध्ये जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यानंतर प्रशासनाने चौकशी समिती नियुक्त करून चौकशी केली. या चौकशी समितीने १६ जानेवारी २०२५ रोजी चौकशी अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर केल्याचा दावा कट्टीमनी यांनी केला आहे. मात्र, त्यानंतरही संबंधित फाईलवर निर्णय झालेला नसल्याचा आरोप त्यांनी केला. शिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आलेल्या फाईलचा जावक क्रमांक १९१६२०९ असून, त्याची तारीख ४ ऑगस्ट २०२५ असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. एवढा कालावधी उलटूनही कारवाई झालेली नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.कट्टीमनी यांनी यापूर्वीही संबंधित अधिकाऱ्यांविरोधात उपोषणे केली असून, तब्बल ४० दिवस आंदोलन केल्याचा दावा केला आहे. या काळात आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. मात्र, प्रशासनाकडून अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आंदोलनादरम्यान शिक्षणाधिकाऱ्यांकडून प्रशासनास वेठीस धरू नये, अशा आशयाची पत्रे देण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यांविरोधात काही महिला शिक्षकांनी तक्रारी केल्या असून, त्यावरही अद्याप निर्णय झालेला नसल्याचा आरोप कट्टीमनी यांनी केला आहे. तसेच केंद्रप्रमुख व विस्तार अधिकाऱ्यांच्या माध्यमातून वसुली केली जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी निवेदनातून केला आहे. यासंदर्भातील कथित ऑडिओ रेकॉर्डिंग तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम आणि तत्कालीन शिक्षणाधिकारी कादर शेख यांना ऐकविल्याचेही त्यांनी म्हटले आहे. इतके आरोप व पुरावे सादर करूनही संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई का होत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
या प्रकरणामागे कोणाचा वरदहस्त आहे, याचीही चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, प्रशासनाने या सर्व आरोपांची निष्पक्ष चौकशी करून चौकशी अहवालाच्या आधारे तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. २ ऑक्टोबरपर्यंत निर्णय न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा कट्टीमनी यांनी दिला असून, त्यांच्या आत्मदहनाच्या इशाऱ्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनासमोर आता गंभीर पेच निर्माण झाला आहे.
सप्टेंबर २०२४ : प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यांविरोधात तक्रार
१६ जानेवारी २०२५ : चौकशी समितीचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर
४ ऑगस्ट २०२५ : शिक्षणाधिकाऱ्यांकडे फाईल पाठविल्याचा जावक क्रमांक १९१६२०९२
ऑक्टोबर २०२६ : निर्णय न झाल्यास आत्मदहनाचा इशारा
चौकशी अहवाल सादर होऊनही कारवाईला विलंब का?
संबंधित अधिकाऱ्यांविरोधातील तक्रारींवर निर्णय कधी?
शिक्षकांनी सादर केलेल्या कथित पुराव्यांची स्वतंत्र चौकशी होणार का?
अत्यंत दिलासादायक! Pune Mhada चा मोठा निर्णय; ‘या’ तारखेपर्यंत देण्यात आली मुदतवाढ