Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अकोल्यात ‘१०८’ रुग्णवाहिका ठरली ‘देवदूत’! २ लाख नागरिकांचे प्राण वाचवण्याचा विक्रमी टप्पा पार

Akola 108 Ambulance Record: अकोला जिल्ह्यात १०८ आपत्कालीन रुग्णवाहिका सेवेने २५ ऑक्टोबरपर्यंत तब्बल १.९७ लाखांहून अधिक नागरिकांचे प्राण वाचवण्याचा विक्रमी टप्पा गाठला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 12, 2025 | 03:53 PM
अकोल्यात ‘१०८’ रुग्णवाहिका ठरली ‘देवदूत’! (Photo Credit - X)

अकोल्यात ‘१०८’ रुग्णवाहिका ठरली ‘देवदूत’! (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:

 

 

  • अकोल्यात ‘१०८’ रुग्णवाहिकेचा विक्रम
  • २ लाख नागरिकांचे वाचवले प्राण
  • आत्महत्येच्या प्रयत्नातील १८५ जणांना जीवदान
Akola 108 Ambulance Record Marathi News: आपत्कालीन प्रसंगी तातडीने धाव घेऊन जीवदान देणारी १०८ आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा (108 Emergency Ambulance Service) अकोला जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेचा मजबूत आधारस्तंभ ठरली आहे. सेवा सुरू झाल्यापासून ते २५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत, १०८ च्या पथकाने जिल्ह्यामध्ये तब्बल १ लाख ९७ हजार ९५० हून अधिक नागरिकांचे प्राण वाचवण्याचा विक्रमी टप्पा गाठला आहे. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागासाठी मोठा दिलासा देणारा हा आकडा १०८ सेवेच्या उत्कृष्ट कार्यक्षमतेचा पुरावा आहे.

वैद्यकीय आणि अपघातग्रस्तांसाठी धावली

जिल्ह्यात वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांसाठी १०८ ही पहिली निवड ठरत असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते. अचानक प्रकृती बिघडणे, श्वसनाचा त्रास किंवा बेशुद्ध पडणे अशा विविध वैद्यकीय स्थितीमध्ये तब्बल १ लाख १२ हजार १६६ रुग्णांना वेळेवर उपचार मिळाले. अपघात (७,८४३), पॉली ट्रॉमा (५,२४८), रस्त्यावर पडून झालेल्या जखमा (२,५३०) आणि मारहाणीची प्रकरणे (१,५७५) अशा घटनांमध्ये तातडीच्या मदतीमुळे अनेकांचे प्राण वाचले. विषबाधा (६,७३१) आणि हृदयविकाराचे झटके (१,७७०) आलेल्या रुग्णांना तातडीने प्रतिसाद देत रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हे देखील वाचा: Road Accident: शहरात अपघातांचे सत्र कायम! १० महिन्यांत १५७ जणांचा मृत्यू; वाढत्या ‘हिट अँड रन’ घटनांनी चिंता वाढवली

गर्भवतींसाठी ‘मोबाईल लाइफलाइन’

गर्भवती महिलांसाठी १०८ रुग्णवाहिका गेल्या काही वर्षांत ‘मोबाईल लाइफलाइन’ ठरली आहे. तातडीच्या प्रसूतीवेळी शहरी व ग्रामीण भागातील ४१,९६२ महिलांना सुरक्षित रुग्णालयापर्यंत पोहोचवण्यात यश आले. विशेष म्हणजे, ९२९ महिलांची प्रसूती रुग्णवाहिकेतच सुरक्षितरीत्या पार पडल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

आत्महत्येच्या प्रयत्नातील १८५ जणांना जीवदान

विविध कारणांनी संकटात सापडलेल्या १७ हजार २३२ रुग्णांना १०८ सेवेमुळे मदत मिळाली. यामध्ये, आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या १८५ जणांना वेळेत उपचार मिळून जीवदान मिळाले आहे. आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे की, प्रशिक्षित पॅरामेडिकल स्टाफची तत्परता, प्राथमिक उपचारांची सुविधा, सज्ज रुग्णवाहिका आणि तातडीचा प्रतिसाद यामुळे १०८ सेवा आरोग्यव्यवस्थेचा मजबूत कणा ठरली आहे. अत्यावस्थ २० रुग्णांचे व्हेंटिलेटरवर व्यवस्थापनही रुग्णवाहिकेतच करण्यात आले.

हे देखील वाचा: Akola Crime: अकोल्यातून तीन अल्पवयीन मुले गायब; रात्री घराबाहेर पडले आणि…

Web Title: 108 ambulance becomes angel in akola record milestone of saving 2 lakh lives crossed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 12, 2025 | 03:52 PM

Topics:  

  • Akola
  • akola news

संबंधित बातम्या

Road Accident: शहरात अपघातांचे सत्र कायम! १० महिन्यांत १५७ जणांचा मृत्यू; वाढत्या ‘हिट अँड रन’ घटनांनी चिंता वाढवली
1

Road Accident: शहरात अपघातांचे सत्र कायम! १० महिन्यांत १५७ जणांचा मृत्यू; वाढत्या ‘हिट अँड रन’ घटनांनी चिंता वाढवली

Akola Crime: अकोल्यातून तीन अल्पवयीन मुले गायब; रात्री घराबाहेर पडले आणि…
2

Akola Crime: अकोल्यातून तीन अल्पवयीन मुले गायब; रात्री घराबाहेर पडले आणि…

नाफेड खरेदी केंद्राच्या ‘कठीण अटीं’मुळे शेतकरी संतप्त; बाळापूर तालुक्यात रास्ता रोको आंदोलन
3

नाफेड खरेदी केंद्राच्या ‘कठीण अटीं’मुळे शेतकरी संतप्त; बाळापूर तालुक्यात रास्ता रोको आंदोलन

Akola Operation Prahar: अकोला पोलिसांचे ‘ऑपरेशन प्रहार’ यशस्वी; ६ महिन्यांत हजारावर कारवाई, इतक्या लाखांचा मुद्देमाल जप्त!
4

Akola Operation Prahar: अकोला पोलिसांचे ‘ऑपरेशन प्रहार’ यशस्वी; ६ महिन्यांत हजारावर कारवाई, इतक्या लाखांचा मुद्देमाल जप्त!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.