अपघातांचे सत्र कायम! १० महिन्यांत १५७ जणांचा मृत्यू (Photo Credit - X)
अपघातांच्या आकडेवारीने चिंता वाढवली
गत तीन वर्षात रस्ते अपघातात ६५३ जणांचा बळी गेला. त्यामध्ये हेल्मेट परिधान न केल्याने अनेक दुचाकी चालकांना आपल्या प्राणास मुकावे लागले. २०२२-२०२४ दरम्यान गेल्या तीन वर्षांत ६५३ जणांचा बळी गेला, यातून अपघातांची वाढती संख्या दिसून येते. गत १० महिन्यात २०२५ मध्ये राष्ट्रीय महामार्गावर १६६, राज्य महामार्गावर ३० तर इतर रस्त्यावर १७७ असे एकूण ३७३ अपघात घडले आहेत. २०२३ मध्ये २८८ अपघात झाले होते आणि त्यात ७५ जण मृत्यूमुखी पडले होते तर २०२४ मध्ये एकूण ४२९ अपघात घडले ज्यामध्ये १७४ जणांचा मृत्यू झाला.
हे देखील वाचा: Akola Crime: अकोल्यातून तीन अल्पवयीन मुले गायब; रात्री घराबाहेर पडले आणि…
अकोल्यात ‘हिट अॅण्ड रन’चा थरार
अकोल्यातल्या मोठी उमरी भागातील जिल्हा परिषद शाळेसमोर हा संपूर्ण हिट अॅण्ड रनचा थरार घडला होता. या कार चालकाने तब्बल एक किमी पर्यंत या दुचाकीला फरफटत नेले. इतकेच नव्हे तर पुढे चार ते पाच दुचाकी वाहनांना उडवले. या अपघात दोन पेक्षा जास्त जण जखमी झाले. संतप्त नागरिकांनी या कारचा चालकाला बेदम चोप दिलाय.
मागील दोन वर्षात ‘हिट अँड रन’च्या तीन घटना
एप्रिल २०२५ (मोठी उमरी): एका कारने जिल्हा परिषद शाळेसमोरून जाणा-या अनेक दुचाकीना धडक दिली आणि एका दुचाकीला तब्बल दीड किलोमीटरपर्यंत फरफटत नेले. यात अनेकजण जखमी झाले आणि संतप्त जमावाने कार चालकाला मारहाण केली.
ऑगस्ट २०२४ (ध्याळा): राष्ट्रीय महामार्गावर व्याळाजवळ एका भरधाव कारने दुचाकीला धडक दिली, ज्यात एका महिलेचा आणि तिच्या ९ महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाला, तर वडील आणि मुलगा जखमी झाले.
जुलै २०२४ (कुरणखेड): बोरगाव मंजु पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र मोरे यांना कुरणखेडजवळ भरधाव कारने धडक दिली, ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.






