Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यात उष्णतेचा कहर; अकोला पुन्हा तापला, तापमानाचा पारा 46 अंश पार

परभणीचे तापमान दोन दिवसांपासून ४२ अंशावर गेले आहे. यातच साडूला भेटण्यासाठी आलेल्या नाशिक येथील ३७ वर्षीय इसमाचा येथे उन्हाचा तडाखा बसल्याने मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 27, 2026 | 08:11 AM
देशातील अनेक भागांत तापमानात वाढ; राजधानी दिल्लीत उष्णतेने 15 वर्षांचा रेकॉर्डच मोडला, पुढील 7 दिवस...

देशातील अनेक भागांत तापमानात वाढ; राजधानी दिल्लीत उष्णतेने 15 वर्षांचा रेकॉर्डच मोडला, पुढील 7 दिवस...

Follow Us
Follow Us:

अकोला : राज्यभर उष्णतेचा पारा प्रचंड वाढताना दिसत आहे. विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात उन्हाचा तडाखा चांगलाच बसत आहे. दुपारच्या वेळेत रस्ते ओस पडत आहेत. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, रविवारी अकोला येथे ४६.९ अंश तापमानाची नोंद झाली, जे राज्यातील सर्वांत उष्ण ठिकाण ठरले. भंडारा ४४.०, गोंदिया ४४.४, गडचिरोली ४४.६, ब्रह्मपुरी ४४.२ आणि वाशिम ४४.६ येथेही तीव्र उष्णतेचा परिणाम जाणवला.

मुंबईतही उन्हाचा तडाखा वाढला आहे. मुंबईसह लगतच्या जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. जळगावातही तापमान ४३ अंशांच्या पुढे गेल्याने महानगरपालिकेने शहरातील प्रमुख चौकांमध्ये टँकरद्वारे पाणी मारण्याची मोहीम राबवली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांतील स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. बहुतेक जिल्हा रुग्णालयांमध्ये कोल्ड वॉर्ड उभारण्यात आले आहेत.

Heat Wave : देशभरात तीव्र उष्णतेचा लाट अन् हवामानाचा इशारा, १३ राज्यांमध्ये हवामान बदलणार

दरम्यान, परभणीचे तापमान दोन दिवसांपासून ४२ अंशावर गेले आहे. यातच साडूला भेटण्यासाठी आलेल्या नाशिक येथील ३७ वर्षीय इसमाचा येथे उन्हाचा तडाखा बसल्याने मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवाजी बबन कांबळे असे मृताचे नाव आहे. शिवाजी हे दिवसभर उन्हात फिरले. त्यातच त्यांना चक्कर आली आणि एका खड्यात पडले. शोधाशोध केल्यावर त्यांचा मृतदेहच हाती लागला. याप्रकरणी त्यांच्या भावाने नानलपेठ पोलिसांना माहिती दिली.

रात्रीच्या वेळीही उकाड्यापासून दिलासा नाहीच

२८% ते ६०% दरम्यान राहिले आहे. यामुळे हवेतील उकाडा वाढून उन्हाच्या झळा अधिकच बसू लागल्या आहेत. अनेक ठिकाणी रात्रीचे तापमान २४ ते ३० अंश सेल्सिअस दरम्यान नोंदवले गेले. परिणामी, रात्रीच्या वेळीही नागरिकांना उष्म्यापासून दिलासा मिळू शकलेला नाही.

लहान मुलांचीही घ्या विशेष काळजी

लहान मुलांची शारीरिक प्रतिकारशक्ती कमी असते. तसेच त्यांची त्वचा अतिशय नाजूक असते. त्यामुळे उष्णतेमुळे त्यांना त्वचारोग, घामोळे, उष्माघात (हीट स्ट्रोक), तसेच शरीरातील पाण्याची कमतरता (डिहायड्रेशन) यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. काही वेळा ही स्थिती गंभीर होऊ शकते, त्यामुळे पालकांनी विशेष सतर्कता बाळगणे गरजेचे आहे

काय घ्यावी खबरदारी…

– सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत अत्यावश्यक कामांशिवाय बाहेर पडू नका.
– भरपूर पाणी प्या, रसाळ फळांचे सेवन करा

– उष्णतेपासून बचावासाठी पूर्ण काळजी घ्या

Web Title: Akola heats up again the mercury crosses the 46 degree mark

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 08:11 AM

Topics:  

  • akola news
  • Weather Update

संबंधित बातम्या

देशातील अनेक राज्यांत पुन्हा पावसाचा अलर्ट; मुसळधार पावसामुळे उत्तर प्रदेश, छत्तीसगडमध्ये जनजीवन विस्कळीत
1

देशातील अनेक राज्यांत पुन्हा पावसाचा अलर्ट; मुसळधार पावसामुळे उत्तर प्रदेश, छत्तीसगडमध्ये जनजीवन विस्कळीत

‘पश्चिम विदर्भात कोरडा दुष्काळ जाहीर करा’; भारतीय किसान संघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
2

‘पश्चिम विदर्भात कोरडा दुष्काळ जाहीर करा’; भारतीय किसान संघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

उत्तर प्रदेश चक्रीवादळाच्या विळख्यात; 42 जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचाही इशारा, मेघगर्जनेसह…
3

उत्तर प्रदेश चक्रीवादळाच्या विळख्यात; 42 जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचाही इशारा, मेघगर्जनेसह…

Rain Update : पुण्यात पावसाची विश्रांती; ढगाळ वातावरण कायम, आज तापमान…
4

Rain Update : पुण्यात पावसाची विश्रांती; ढगाळ वातावरण कायम, आज तापमान…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.