Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकरी कर्जमुक्तीसाठी सरकारकडून तब्बल 7 हजार कोटींचा निधी; रक्कम लवकरच कर्जखात्यात होणार जमा

सहकार आयुक्त व निबंधक (सहकारी संस्था), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी सादर केलेल्या लाभार्थी यादीच्या आधारे निधी वितरणाची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या पुरवणी मागण्यांत योजनेसाठी २०५५२ कोटींची तरतूद करण्यात आली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 31, 2026 | 08:29 AM
शेतकरी कर्जमुक्तीसाठी सरकारकडून तब्बल 7 हजार कोटींचा निधी; रक्कम लवकरच कर्जखात्यात होणार जमा

शेतकरी कर्जमुक्तीसाठी सरकारकडून तब्बल 7 हजार कोटींचा निधी; रक्कम लवकरच कर्जखात्यात होणार जमा

Follow Us
Follow Us:

अकोला : राज्यात शेतकऱ्यांना दिलासा देत राज्य शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ अंतर्गत पात्र शेतकरी कर्जखात्यांना लाभाची रक्कम वितरित करण्यासाठी 7 हजार कोटींच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय सहकार विभागाने काढला आहे. योजनेतील पात्र शेतकऱ्यांची रक्कम थेट कर्जखात्यांत जमा करण्यात येणार आहे.

सहकार आयुक्त व निबंधक (सहकारी संस्था), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी सादर केलेल्या लाभार्थी यादीच्या आधारे निधी वितरणाची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या पुरवणी मागण्यांत योजनेसाठी २०५५२ कोटींची तरतूद करण्यात आली असून, त्यातील पहिल्या टप्प्यात ७ हजार कोटी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. निधी वितरणाची जबाबदारी सहकार आयुक्त व निबंधक यांच्या नियंत्रणाखाली पार पडणार असून, पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम वेळेत जमा करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना आहेत.

Yavatmal News : पीकविमा अर्जप्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव ! परिसरातील शेतकरी संभ्रमात; नुकसानभरपाईबाबत अनिश्चितता

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी १७ लाख शेतकऱ्यांची पहिली लाभार्थी यादी तयार झाली असून, १० ऑगस्टला दुसरी यादी जाहीर केली जाईल, अशी माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. राज्यातील ५६ लाख पात्र शेतकऱ्यांपैकी ३२ लाखांना कर्जमाफी, तर २४ लाखांना प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे. प्रोत्साहन लाभार्थ्यांची स्वतंत्र यादी सप्टेंबरमध्ये प्रसिद्ध होईल.

कर्जमाफीसाठी २०.२१ लाख शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून, तर सुमारे ६ लाखांनी व्यावसायिक बँकांकडून पीक कर्ज घेतले आहे. लाभार्थ्यांची पात्रता निश्चित करण्यासाठी त्यांचा डेटा आयकर विभागाकडे पडताळणीसाठी पाठवण्यात आला आहे. तसेच, दोन लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी (ओटीएस) योजना सुरू करण्यात येणार आहे. कर्जमाफी, ओटीएस आणि प्रोत्साहन लाभ या तिन्ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

पीकविमा अर्जप्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव

पीकविमा अर्ज भरताना अटी-शर्तीची पुरेशी माहिती न दिल्याने अनेक शेतकरी भविष्यात विमा दाव्यांपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त करत असून, प्रक्रियेत पारदर्शकतेची मागणी जोर धरत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील हजारो शेतकरी दरवर्षी पीकविमा काढत असले तरी अर्ज भरताना असलेल्या अटी व शर्तीबाबत अनेकांना पुरेशी माहिती दिली जात नसल्याची बाब समोर आली आहे. विशेषतः कॉमन सव्र्व्हिस सेंटर (सीएससी) मार्फत अर्ज भरताना नियम, घोषणापत्र आणि संमतीपत्रातील बाबी समजावून सांगितल्या जात नसल्याची तक्रार शेतकरी करत आहेत.

Web Title: Government allocates a massive 7000 crore fund for farm loan waivers the amount will soon be credited to loan accounts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 08:29 AM

Topics:  

  • akola news
  • Farmer Loan Waiver
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

Farmers Issue : शेतकऱ्यांचे 5 महिन्यांचे अनुदान रखडलेलेच; APL कार्डधारक त्रस्त
1

Farmers Issue : शेतकऱ्यांचे 5 महिन्यांचे अनुदान रखडलेलेच; APL कार्डधारक त्रस्त

मोठी बातमी ! कागदी शिधापत्रिका होणार आता इतिहासजमा; 1 लाख शिधापत्रिका ‘ऑनलाईन’
2

मोठी बातमी ! कागदी शिधापत्रिका होणार आता इतिहासजमा; 1 लाख शिधापत्रिका ‘ऑनलाईन’

पोपटखेड पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस; धरणाचे दोन दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना…
3

पोपटखेड पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस; धरणाचे दोन दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना…

वीज केंद्राचे काम रखडल्याने शेतकरी त्रस्त; वर्षभरापासून काम थंड, पिके वाचवण्याचे शेतकऱ्यांसमोर आव्हान
4

वीज केंद्राचे काम रखडल्याने शेतकरी त्रस्त; वर्षभरापासून काम थंड, पिके वाचवण्याचे शेतकऱ्यांसमोर आव्हान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.