Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akola News : महापुरुषांचा अपमान खपवून घेणार नाही! माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांचा इशारा

“महापुरुषांचा अपमान आता सहन केला जाणार नाही,” असा इशारा माजी राज्यमंत्री Gulabrao Gavande यांनी दिला. महापुरुषांबाबत वारंवार आक्षेपार्ह वक्तव्ये होत असून त्यावर कारवाई होत नसल्याने समाजात संताप वाढत असल्याचे म्

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 06, 2026 | 09:15 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

Akola News : “महापुरुषांचा अपमान यापुढे अजिबात सहन केला जाणार नाही,” असा इशारा माजी राज्यमंत्री Gulabrao Gavande यांनी दिला आहे. सध्या काही लोक विनाकारण दैवतांचा आणि महापुरुषांचा अवमान करत असल्याबद्दल त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. या पार्श्वभूमीवर गुरुवारी जाहीर निषेध सभा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Sunreta Pawar: मोठी बातमी! सुनेत्रा पवार यांचा राज्यसभा खासदारकीचा राजीनामा; बारामतीतील ऐतिहासिक विजयानंतर विधानसभेवर स्वारी!

बहुजन जागृती महासंघाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, पुरोगामी महाराष्ट्रात वारंवार महापुरुषांबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये केली जात आहेत, मात्र अनेक वेळा अशा प्रकरणांमध्ये ठोस कारवाई होत नाही. त्यामुळे समाजात नाराजी आणि संताप वाढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “किती दिवस गप्प बसायचे?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी आता सहनशीलतेची मर्यादा संपल्याचेही नमूद केले.

नागपूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात Chhatrapati Shivaji Maharaj यांच्याबाबत करण्यात आलेल्या अपमानास्पद विधानाचा त्यांनी उल्लेख केला. यासोबतच काही व्यक्तींनी महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले तसेच संत परंपरेतील महान व्यक्तींबाबतही आक्षेपार्ह वक्तव्ये केल्याचे त्यांनी सांगितले. अशा घटनांमुळे समाजातील भावनांना ठेच पोहोचत असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

वारंवार होणारा हा अवमान म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशावर थेट आघात असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. त्यामुळे यापुढे अशा प्रवृत्तींना कठोर उत्तर देण्यासाठी ठोस कृती कार्यक्रम राबवला जाईल, असा इशारा त्यांनी दिला. निषेध सभेद्वारे सरकार आणि प्रशासनाचे लक्ष वेधले जाणार असून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येणार आहे.

मुंबई पुन्हा दहशवाद्यांच्या निशाण्यावर? ताज आणि ट्रायडेंट हॉटेलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; पोलीस हाय अलर्टवर

या निषेध सभेत मराठा सेवा संघ, अखिल भारतीय माळी महासंघ, बौद्ध समाज महासंघ, Sambhaji Brigade, Jijau Brigade यांसह विविध समाज संघटनांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग राहणार आहे. त्यामुळे ही सभा व्यापक स्वरूपात पार पडण्याची शक्यता असून, महापुरुषांच्या सन्मानासाठी एकत्र येण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

Web Title: Insults to great personalities will not be tolerated former minister of state gulabrao gavande warns

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2026 | 09:15 PM

Topics:  

  • Akola
  • Buldhana
  • Washim

संबंधित बातम्या

Maharashtra Drought : मुख्यमंत्र्यांकडून पुन्हा ‘या’ गोष्टीचा पुनरुच्चार, बळीराजाला दिलासा मिळणार
1

Maharashtra Drought : मुख्यमंत्र्यांकडून पुन्हा ‘या’ गोष्टीचा पुनरुच्चार, बळीराजाला दिलासा मिळणार

Harshwardhan Sapkal on Drought: देवेंद्र फडणवीस कोणत्या मुहूर्ताची वाट पाहतात?; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
2

Harshwardhan Sapkal on Drought: देवेंद्र फडणवीस कोणत्या मुहूर्ताची वाट पाहतात?; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल

Buldhana News : दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन; ‘भीक मांगो’ करत सरकारविरोधात आक्रोश
3

Buldhana News : दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन; ‘भीक मांगो’ करत सरकारविरोधात आक्रोश

Washim News: धावपट्टी, थाळीफेक स्पर्धेत म्हसणीच्या विद्यार्थ्यांची बाजी; तालुकास्तरीय विविध स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक
4

Washim News: धावपट्टी, थाळीफेक स्पर्धेत म्हसणीच्या विद्यार्थ्यांची बाजी; तालुकास्तरीय विविध स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.