Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News : अलिबाग पंचायत समितीच्या निधी नियोजनावर भर; 15 व्या वित्त आयोगाच्या निधीचा सुयोग्य वापर होणार

अलिबाग तालुक्‍यासाठी पंचायत समितीला उपलब्‍ध झालेला 15 व्‍या वित्‍त आयोगाच्‍या निधीचा योग्‍य विनियोग केला जाणार आहे. त्‍यासाठी प्रत्‍येक पंचायत समिती सदस्‍याला कामे सुचवण्‍यास सांगण्‍यात आले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 26, 2026 | 02:48 PM
Raigad News : अलिबाग पंचायत समितीच्या निधी नियोजनावर भर; 15 व्या वित्त आयोगाच्या निधीचा सुयोग्य वापर होणार
Follow Us
Follow Us:
  • अलिबाग पंचायत समितीच्या निधी नियोजनावर भर
  • 15 व्या वित्त आयोगाच्या निधीचा सुयोग्य वापर होणार
अलिबाग : अलिबाग तालुक्‍यासाठी पंचायत समितीला उपलब्‍ध झालेला 15 व्‍या वित्‍त आयोगाच्‍या निधीचा योग्‍य विनियोग केला जाणार आहे. त्‍यासाठी प्रत्‍येक पंचायत समिती सदस्‍याला कामे सुचवण्‍यास सांगण्‍यात आले आहे. विकास निधीचा वापर तालुक्‍यातील सर्व भागांसाठी करण्‍याचा प्रयत्‍न आहे. त्‍यासाठी सुयोग्‍य नियोजन सुरू असल्‍याची माहिती अलिबाग तालुका पंचायत समिती सभापती भाग्‍यता पाटील यांनी दिली.

अलिबाग तालुका पंचायत समितीच्‍या शुक्रवारी झालेल्‍या मासिक सभेतील निर्णयांची माहिती देण्‍यासाठी आज पत्रकार परीषद आयोजीत करण्‍यात आली होती. शुक्रवारी झालेल्‍या सभेत विविध विषयांवर चर्चा झाली. मागील मार्च महिन्‍याच्‍या मासिक सभेत पंचायत समिती सेस फंडाच्‍या कामांना तात्‍पुरती स्‍थगिती देण्‍याचा निर्णय सर्वानुमते झाला होता. परंतु इतिवृत्‍तात याचा उल्‍लेख नव्‍हता. याबाबत शुक्रवारी झालेल्‍या मासिक सभेत सदस्‍यांनी याबाबतचा जाब गटविकास अधिकारी यांना विचारला मात्र त्‍यावर त्‍यांनी काहीच उत्‍तर दिले नाही.

यावर समाधानकारक उत्‍तर मिळावे असा आग्रह सदस्‍यांनी धरून त्‍यासाठी सभा काही काळ स्‍थगित करण्‍यात आली मात्र त्‍याचा काही लोक विपर्यास करून चुकीची माहिती पसरवत असल्‍याचा आरोप सभापती भाग्‍यता पाटील यांनी दिला. स्‍थगितीचा निर्णय सर्वसंमतीने झाला होता. त्‍यामुळे त्‍यावर कुणाचा आक्षेप असण्‍याचे कारणच नाही असेही भाग्‍यता पाटील यांनी स्‍पष्‍ट केले.

Raigad News: कर्जत तालुक्यात तीव्र पाणीटंचाई; २० गावे व ३९ आदिवासी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू

15 व्‍या वित्‍त आयोगाच्‍या निधीचा योग्‍य विनियोग करण्‍याच्‍या दृटीने नियोजन सुरू आहे. त्‍यासाठी सर्व सदस्‍यांकडून कामांचे प्रस्‍ताव मागवण्‍यात आले आहेत. हा निधी तालुक्‍याच्‍या सर्वांगीण विकासासाठीच वापरला जाईल यात कुठलाही दुजाभाव होणार नाही याची काळजी घेतली जात असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

अलिबाग पंचायत समितीच्‍या गटविकास अधिकारी या दिव्‍यांग आहेत. असे असताना त्‍यांच्‍यावर तीन कामांचा प्रभार सोपवण्‍यात आला आहे. त्‍यामुळे त्‍यांना आपल्‍या कामावर लक्ष केंद्रीत करता येत नाही. शिवाय दिव्‍यांग असल्‍यामुळे त्‍यांना कामात मर्यादा येत आहेत, ही बाब लक्षात घेवून अलिबाग तालुका पंचायत समितीसाठी पूर्णवेळ गटविकास अधिकारी द्यावा, अशी मागणीही सर्व सदस्‍यांनी लावून धरली आहे.

अलिबाग तालुक्‍याच्‍या काही भागात विशेषतः खारेपाट भागात पाणीटंचाई भेडसावते आहे. हे लक्षात घेवून या भागातील टंचाईग्रस्‍त गावांना टँकरव्‍दारे पिण्‍याचे पाणी उपलब्‍ध करून दिले जात आहे. तसेच टंचाईचा आढावा घेवून नळपाणी योजनांची दुरूस्‍ती, बोअरवेल दुरूस्‍तीची कामे हाती घेण्‍याच्‍या सूचना संबंधित विभागाला देण्‍यात आल्‍याचे शिवसेनेचे गटनेते प्रकाश पाटील यांनी सांगितले.

अलिबाग पंचायत समितीकडील 15 व्‍या वित्‍तआयोगाच्‍या निधीवाटपात आमदार महेंद्र दळवी यांचा हस्‍तक्षेप सुरू असल्‍याचा आरोप होत आहे. या आरोपांचे भाग्‍यता पाटील यांनी खंडन केले. आ. महेंद्र दळवी हे मतदार संघात करोडो रूपयांची कामे मंजूर करून विकास करीत आहेत. त्‍यामुळे पंचायत समितीच्‍या निधी वाटपात त्‍यांना लुडबुड करण्‍याची गरज नाही. यासाठी त्‍यांनी आम्‍हाला सर्वाधिकार दिले असल्‍याचे भाग्‍यता पाटील यांनी स्‍पष्‍ट केले.

Mahabaleshwar News : पोलादपूर चेक नाक्यावर वनविभागाची मोठी कारवाई! खैराच्या लाकडासह तिघांना रंगेहात पकडले

Web Title: Alibaug news alibaug panchayat samiti focuses on fund planning 15th finance commission funds will be utilized properly

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 02:48 PM

Topics:  

  • Marathi News
  • navrashtra news
  • Raigad News

संबंधित बातम्या

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित
1

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित

Ambani Ganpati Celebration Fashion: अंबानींच्या गणपती सोहळ्यातील लुक्सवर फिदा? कमी खर्चात मिळवा तसाच स्टाइलिश अंदाज
2

Ambani Ganpati Celebration Fashion: अंबानींच्या गणपती सोहळ्यातील लुक्सवर फिदा? कमी खर्चात मिळवा तसाच स्टाइलिश अंदाज

Ganesh Festival : शिक्षणातील गैरप्रकारांवर बाप्पाच्या देखाव्यातून प्रहार; ‘NEET पेपरफुटी’वर नेतिवलीच्या राजाकडून जनजागृती
3

Ganesh Festival : शिक्षणातील गैरप्रकारांवर बाप्पाच्या देखाव्यातून प्रहार; ‘NEET पेपरफुटी’वर नेतिवलीच्या राजाकडून जनजागृती

Viral Video: निषेधासाठी थेट पालिका कार्यालयात कुत्र्यांची ‘Entry’; निफाडमधील व्हिडिओ व्हायरल
4

Viral Video: निषेधासाठी थेट पालिका कार्यालयात कुत्र्यांची ‘Entry’; निफाडमधील व्हिडिओ व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.