Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : सातारा बँक निवडणुकीत बोगस महिला निरीक्षकाचा शिरकाव; पोलिसांनी घेतले ताब्यात

Satara News : सातारा जिल्हा बँक निवडणुकीदरम्यान १ नोव्हेंबर रोजी माण तालुक्यात निवडणूक निरीक्षक असल्याचे भासवून मतदान केंद्रांवर फिरणाऱ्या वैशाली देशपांडे या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. बनावट ओळखपत्राच्या संशयावरून दहिवडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Nov 02, 2026 | 08:21 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • निवडणूक आयोगाचे ओळखपत्र दाखवून मतदान केंद्रात प्रवेश
  • पोलिसांच्या संशयामुळे बोगसगिरीचा पर्दाफाश
  • चालकासह दोघांची चौकशी; दहिवडी पोलिसांत गुन्हा दाखल
Satara News : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीदरम्यान माण तालुक्यात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. निवडणूक निरीक्षक अधिकारी असल्याचे भासवून विविध मतदान केंद्रांवर वावरणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले.

विशेष म्हणजे, या महिलेने भारत निवडणूक आयोगाचे ओळखपत्र गळ्यात घालून मतदान केंद्रांमध्ये प्रवेश केला होता. अनेक अधिकाऱ्यांसोबत छायाचित्रेही काढल्याने सुरुवातीला तिच्या ओळखीबाबत कोणालाही संशय आला नाही. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघड झाला.

निवडणूक आयोगाचे ओळखपत्र दाखवून मतदान केंद्रात प्रवेश

मिळालेल्या माहितीनुसार, १ नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे १०.४५ वाजता दहिवडी येथील महात्मा गांधी विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमधील मतदान केंद्र क्रमांक आठच्या परिसरात पांढऱ्या रंगाची इनोव्हा क्रिस्टा कार आली. या कारमधून उतरलेल्या महिलेच्या गळ्यात भारत निवडणूक आयोगाचे नाव असलेले ओळखपत्र होते. आपण निवडणूक निरीक्षक अधिकारी असल्याचे सांगत तिने हे ओळखपत्र दाखवले आणि मतदान केंद्रात प्रवेश केला.

वैशाली अशोक देशपांडे (रा. पाषाण-सुस रोड, पुणे) असे या महिलेचे नाव आहे. तिने केवळ एका मतदान केंद्रापुरती उपस्थिती न ठेवता इतर केंद्रांवरही निरीक्षक अधिकारी असल्याचे सांगून भेटी दिल्याची माहिती समोर आली आहे. अनेक अधिकाऱ्यांसोबत तिने छायाचित्रेही काढली.

Buldhana: दुष्काळात अळीचा घाला! तुरीच्या शेंगा पोखरल्या, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला

पोलिसांच्या संशयामुळे बोगसगिरीचा पर्दाफाश

निवडणूक बंदोबस्तावर असलेल्या कोरेगाव उपविभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी आणि पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांना महिलेच्या पदाबाबत संशय आला. त्यांनी तिच्या ओळखपत्राची तपासणी केली असता त्यावर ‘इलेक्टोरल रजिस्ट्रेशन ऑफिसर, २०९ शिवाजीनगर असेंब्ली, पुणे’ असा उल्लेख असल्याचे दिसून आले.

मात्र, सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी तिची निरीक्षक म्हणून कोणतीही नियुक्ती झाली नव्हती. चौकशीत २०२३ मध्ये पुण्यातील शिवाजीनगर परिसरात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून काम करताना हे ओळखपत्र बनवून घेतल्याची माहिती तिने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

BMC भाजपच्या दावणीला बांधली आहे का? Dia Mirza यांच्या व्हिडीओवरून Kishori Pednekar यांचा घणाघाती सवाल

चालकासह दोघांची चौकशी; दहिवडी पोलिसांत गुन्हा दाखल

महिलेसोबत एमएच १२ वायए ९९९७ क्रमांकाची इनोव्हा क्रिस्टा कार होती. ही कार भाड्याने घेतल्याचे तिने सांगितले. चालक मारुती छगन एकतपुरे आणि त्याच्यासोबत असलेले तुकाराम शिवलिंग पाटोळे यांचीही माहिती पोलिसांनी घेतली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने महिलेला ताब्यात घेतले. पोलीस हवालदार अजय रामचंद्र झुंजार यांच्या तक्रारीवरून दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी पुढील तपास करीत आहेत. या प्रकारामुळे निवडणूक केंद्रांच्या सुरक्षेचा आणि ओळखपत्र पडताळणीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

Web Title: Url satara bank election fake woman observer police custodycp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 08:21 PM

Topics:  

  • Marathi News
  • Police Action
  • Satara District Bank Election

संबंधित बातम्या

Breaking News :युरोपमधील सुपरमार्केटच्या फ्रिजवर सायबर हल्ला ;अन्नसाठा झाला पूर्ण खराब
1

Breaking News :युरोपमधील सुपरमार्केटच्या फ्रिजवर सायबर हल्ला ;अन्नसाठा झाला पूर्ण खराब

Trump News : तिसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होण्याची ट्रम्प यांची इच्छा; मात्र कायदेशीर अडचणींचीही कबुली
2

Trump News : तिसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होण्याची ट्रम्प यांची इच्छा; मात्र कायदेशीर अडचणींचीही कबुली

Mumbai News : दुष्काळग्रस्त महिलांना स्वयंरोजगारासाठी मदत; शिलाई मशीनसाठी १५ लाखांचा धनादेश
3

Mumbai News : दुष्काळग्रस्त महिलांना स्वयंरोजगारासाठी मदत; शिलाई मशीनसाठी १५ लाखांचा धनादेश

World Breaking : ७ नोव्हेंबरकडे जगाचे लक्ष; इराणवर अणुहल्ल्याच्या तयारीत अमेरिका; टकर कार्लसन यांचा दावा
4

World Breaking : ७ नोव्हेंबरकडे जगाचे लक्ष; इराणवर अणुहल्ल्याच्या तयारीत अमेरिका; टकर कार्लसन यांचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.