Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्य अन् केंद्र शासनाच्या शेतकऱ्यांच्या विषयीच्या सर्व योजना फसव्या; शिवसेना प्रवक्ते लक्ष्मण हाके यांचा आरोप

भारतीय जनता पार्टीच्या शेतकऱ्यांविषयीच्या असणाऱ्या सर्व योजना या फसव्या असून, सर्व स्तरातून शेतकऱ्यांची फक्त आणि फक्त पिळवणूक होत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्याचे प्रवक्ते लक्ष्मण हाके यांनी माळशिरस तालुक्यातील मळोली व तांदुळवाडी या ठिकाणी बोलताना केला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 11, 2023 | 10:03 AM
राज्य अन् केंद्र शासनाच्या शेतकऱ्यांच्या विषयीच्या सर्व योजना फसव्या; शिवसेना प्रवक्ते लक्ष्मण हाके यांचा आरोप
Follow Us
Close
Follow Us:

माळशिरस : भारतीय जनता पार्टीच्या शेतकऱ्यांविषयीच्या असणाऱ्या सर्व योजना या फसव्या असून, सर्व स्तरातून शेतकऱ्यांची फक्त आणि फक्त पिळवणूक होत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्याचे प्रवक्ते लक्ष्मण हाके यांनी माळशिरस तालुक्यातील मळोली व तांदुळवाडी या ठिकाणी बोलताना केला.

केंद्र व राज्य शासनाच्या फसव्या योजनांचा भांडाफोड करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली होऊदे चर्चा अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधायला राज्याचे प्रवक्ते लक्ष्मण हाके यांनी सुरुवात केली असून, ते माळशिरस तालुक्याच्या दौऱ्यावरती होते यावेळी त्यांनी तांदूळवाडी व मळोली या ठिकाणी ग्रामस्थ शेतकरी दूध उत्पादक ऊस उत्पादक कष्टकरी शेतमजूर त्याचबरोबर छोटे मोठे व्यावसायिक यांच्यासोबत विविध विषयांवर संवाद साधला.

यावेळी एक रुपया मध्ये पिक विमा या योजनेबाबत शेतकऱ्यांशी चर्चा करताना हजारो शेतकऱ्यांनी फॉर्म भरूनही या दुष्काळी परिस्थितीत कोणत्याच शेतकऱ्यांना पीक विमा मिळाल्या नसल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं तर एक रुपयांनी दूध दर वाढवला मात्र एस एन एफ द्वारे शेतकऱ्यांची पिळवणूक सुरूच असल्याचं दूध उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितलं त्याचबरोबर एफआरपी न देता फक्त शोषण व काटामारी या दोनच योजना साखर कारखान्यांकडून सध्या मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचं ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी या होऊदे चर्चा अंतर्गत स्पष्ट केलं.

त्याचबरोबर युरिया लिंकिंग द्वारे इतर खतांची गोण्या घेतल्या तरच युरिया मिळेल असा युरियाचा सर्रास काळाबाजार कृषी मंत्र्यांच्या आशीर्वादाने माळशिरस तालुक्यात सुरू असल्याचेही यावेळी बोलताना शेतकऱ्यांनी सांगितलं तर जनधन खात्याची फसवी योजना याबाबत ही होऊदे चर्चा अंतर्गत शेतकऱ्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते लक्ष्मण हाके यांच्यासोबत चर्चा केली.

माळशिरस तालुका हा ऊस उत्पादकांचा तालुका म्हणून संपूर्ण राज्यात ओळखला जातो मात्र यंदा पावसाने दडी मारल्याने पाण्याची मोठी टंचाई झाली असून यामुळे यावर्षीचा उसाचा गळीत हंगाम लवकरात लवकर सुरू व्हावा पाणीटंचाई व वाढते तापमान लक्षात घेता उन्हाळ्यामध्ये उसाचे पीक जगणं मुश्कील असल्याचे मत यावेळी शेतकऱ्यांनी प्रवक्ते लक्ष्मण हाके यांच्यासमोर मांडले.

शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्य प्रवक्ते लक्ष्मण हाके यांनी केंद्र सरकार व राज्य सरकारचा चांगलाचं समाचार घेतला. केंद्राच्या व राज्याच्या शेतकऱ्यांविषयीच्या असणाऱ्या सर्व योजना फसव्या असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला तर या सरकारला फक्त आणि फक्त शेतकऱ्यांमधून शोषण करून महसूल गोळा करायचा आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी बोलताना लगावला आहे.

यावेळी माळशिरस तालुकाप्रमुख संतोष राऊत, उपतालुकाप्रमुख डॉ निलेश कांबळे, शहरप्रमुख अरुण मदने, अनिल बंदपट्टे, शिवसैनिक बाबूलाल तांबोळी, लक्ष्मण डोईफोडे, उमेश जाधव, प्रा सतीश कुल्हाळ, संदीप कदम, शाखाप्रमुख आप्पासाहेब कांबळे, दत्ता काशीद, धनाजी कदम, शिवसैनिक महेश कदम, कांतीलाल कदम, योगेश काकडे, नामदेव मिले, अशोक मिले, भारत कदम, नाना दुधाट, दादा जाधव, शिवाजी चव्हाण, रोहित जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

शिवसेनेसोबत या पक्षांचा शेतकऱ्यांच्या सुरात सूर ! 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबतच वंचित बहुजन आघाडी, शेतकरी संघटना, रयत क्रांती शेतकरी संघटना यांनीही होऊदे चर्चा अंतर्गत शेतकऱ्यांसोबत फसव्या योजनांवर बोलताना चर्चेत सहभाग घेतला.

Web Title: All schemes of state and central government regarding farmers are fraudulent allegation of shiv sena spokesperson laxman hake nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2023 | 10:03 AM

Topics:  

  • cmomaharashtra
  • DCM Devedra Fadnavis
  • Laxman hake
  • maharashtra
  • Malshiras
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित
1

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले
2

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत
3

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन
4

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.